Skip to content

Self development साठी वेळ दिला तर जग काय बोंब मारतय याकडे लक्ष राहत नाही…!

Self development साठी वेळ दिला तर जग काय बोंब मारतय याकडे लक्ष राहत नाही…!


कु.हर्षदा नंदकुमार पिंपळे


‘Self development’ …….हा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा विषय….! कुणाला या सेल्फ डेव्हलपमेंटच महत्त्व लवकर लक्षात येतं तर कुणाला उशिरा…. तर कुणाला कित्येक घाव सोसूनही त्याचं महत्त्व लक्षात येत नाही.पण वेळ गेल्यावर मात्र त्यांच्या लक्षात येतं की सेल्फ डेव्हलपमेंट ही किती महत्वाची आणि आवश्यक गोष्ट आहे.

स्वतःला कामात गुंतवून ठेवलं तर लोक काय म्हणतील किंवा आजुबाजुच्या जगात कोण काय बोंबा मारतय याकडे लक्ष जात नाही. म्हणून कित्येकजणं स्वतःला कामात किंवा इतर गोष्टींमध्ये गुंतून ठेवतात. तर एकदम याच्या विरूद्ध काही लोकं असतात जे की जग काय करतय , जग काय म्हणतय याकडेच जास्त लक्ष देतात.तिथेच अधिकाधिक वेळ घालवतात.पण तिथे वेळ घालवताना ते स्वतःला कदाचित विसरून जात असावे.

जगाच्या बोंबांकडे असं लक्ष देताना आपल्या आयुष्याची कळत नकळतपणे किती बोंब होते हे मात्र त्यांच्या लक्षात येत नाही. इतकच नाही तर…कित्येकांना समाजाची , रस्त्यांची डेव्हलपमेंट झाली पाहिजे हे समजतं पण स्वतःला सुद्धा कुठेतरी डेव्हलप करायची गरज आहे हे काही कणभरही कळत नाही.

आणि मग जेव्हा जग आपल्याकडे बोट दाखवायला सुरुवात करतं , आपल्याला काहीबाही बोलायला लागतं तेव्हा मात्र आपलं लक्ष जास्तीत जास्त तिथेच , त्या जगाकडे केंद्रित होत जातं.आपल्याला कुणीतरी असं-तसं बोलतय या विचारात आपण वाहवत जातो. त्यापेक्षा आपण सेल्फ डेव्हलपमेंटकडे लक्ष दिल पाहिजे म्हणजे जग काय बोलतय याकडे फारसं लक्ष जाणार नाही.

जसं आयुष्य हा प्रवास आहे , आणि प्रवासात चांगली वाईट दोन्ही माणसं भेटतात.आणि माणसाला किंवा कित्येकांना विकसित गोष्टी अधिक जवळच्या , अधिक चांगल्या वाटतात. आणि तसं ते काही चूकीचही नाही…पण मग कुठेतरी अशी वेळ येते की आपण काहीच डेव्हलप झालेलो नसतो , आपलं कशातच काही नसतं…आपल्याला डेव्हलप होण्याची खरच खूप गरज असते.

आणि लोकांना सवयच असते , कोणतीही गोष्ट डोळ्यात भरण्याची…चांगलही दिसतं , वाईट दिसतं , तरी दोन्हीकडून बोलणारी काही लोकं या जगात असतातच.मग लोकं अशी बोलताना आपण तिथेच आकर्षित होतो.त्यांच्या बोलण्याकडे आपण खेचले जातो.कुठेतरी सेल्फ डेव्हलपमेंट चा अभाव यामागे दिसून येतो. कदाचित सेल्फ डेव्हलपमेंट व्यवस्थित झाली असती तर जगाच्या बोंबांकडे आपण दुर्लक्ष केलं असतं किंवा मग आपलं त्याकडे लक्षच गेलं नसतं.

म्हणून ‘self development’ सुद्धा एक प्रवासच आहे आणि तो प्रत्येकाला करणं गरजेचच आहे. त्याशिवाय आयुष्य घडणार नाही. त्यामुळे कितीही काहीही झालं तरी ‘Self Development’ ही must आहे. जास्तीत जास्त लक्ष हे आपण स्वतःकडे दिलं पाहिजे किमान आपण लोकांच्या बोलण्याकडे तरी लक्ष देणार नाही…

मुळातच स्वतःची प्रगती करताना दुसऱ्याकडे आपलं लक्षच जाणार नाही अशा प्रकारे डेव्हलपमेंट करा. स्वतःला सुधारा..नवनवीन improvements ला प्राधान्य द्या. नवीन कौशल्य आत्मसात करा.नव्या गोष्टी शिकायला वेळीच सुरुवात करा.रस्त्यांचा जसा विकास होत नाही…खड्डे पडतात , नासधूस होते…तसच आपल्या स्वतःचा विकास झाला नाही तर या रस्त्यांसारखीच दुरदशा होईल. आणि बांधकाम करताना मजबूत बांधकाम करा नाहीतर केव्हा खड्डे पडतील कळणार नाही.

आणि सेल्फ डेव्हलपमेंट ला वेळ दिला तर स्वतःचच आयुष्यच अगदी साच्यासारख घडणार आहे.जग काय बोलेल याकडे लक्षच जाणार नाही. किंवा त्याने काही फरकही पडणार नाही. स्वतःला स्वतःची डेव्हलपमेंट करण्यात व्यस्त ठेवा ,तुम्ही इतरांकडे लक्ष देणार नाहीत आणि इतर लोकही तुमच्याकडे लक्ष देणार नाहीत.स्वतःला डेव्हलप करायच सोडून बसलाय तसाच हातावर हात मांडून…असं कोणी बोलत नाही.

आणि इतकच नाही तर….’सबसे बडा रोग , क्या कहेंगे लोग’ हा रोगही आपल्याला जडणार नाही. या रोगापासून जास्तीत जास्त लांब रहाल यात काही प्रश्नच येत नाही. एखाद्या गोष्टीची सवय लागली की लागतेच….तसच लोकं बोलत रहातात , समोरचा आपल्या बोलण्याकडे सतत लक्ष देतोय याचीही त्यांना सवय होते आणि ते बोलतच रहातात. आणि आपण ऐकत रहातो.पण मग असं इतरांच्या बोंबांकडे लक्ष देत राहिलात तर स्वतःकडे लक्ष द्यायला वेळच रहाणार नाही.

आयुष्य असच कसतरी जगाल.त्यापेक्षा हाच वेळ सेल्फ डेव्हलपमेंट साठी दिला तर….स्वतःची प्रगती होईल , आयुष्य घडेल…एक आत्मविश्वास निर्माण होईल. जग काय बोंबा मारतय याकडे लक्ष राहणार नाही….!

So …. Wake up , and start to develop yourself…


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “Self development साठी वेळ दिला तर जग काय बोंब मारतय याकडे लक्ष राहत नाही…!”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!