सर्व अनुत्तरित प्रश्नांची उत्तरे माहीत नसणं खूप चांगलं असतं.
काव्या धनंजय गगनग्रास
(एम.ए. समुपदेशन मानसशास्त्र)
अज्ञानात सुख असत अस म्हणतात ते काही खोटं नाही. आपल्या सर्वांनाच नवीन काहीतरी शिकण्याची, जाणून घेण्याची ओढ असते. प्रत्येक वेळी, क्षणाला आपल्याला अस काहीतरी उमगत असते ज्याबद्दल आपण काही वेळापूर्वी पूर्णपणे अजाणते असतो. अगदी लहान मुलांचं उदाहरण घ्या. त्यांना किती प्रश्न पडत असतात. आता एक तर नंतर दुसरा. एका प्रश्नाचं उत्तर दिलं तरी त्यातून दुसरा निर्माण होत असतो. पण त्यांचं पूर्णच समाधान झालेलं असत अस नाही. आणि ज्ञानाच्या बाबतीत अस पूर्ण समाधान कधी होऊ ही नये.
आपल्याला जर आपल्या सर्वच अनुत्तरित प्रश्नांची उत्तरं मिळाली तर आपल्याकडे राहणार काय? आपण कशाचा शोध घेणार? आपल्यात ती उत्सुकता, ती जिज्ञासा राहणारच नाही. आतापर्यंत जे काही मोठे शोध लागले त्याच्या मागे ही जिज्ञासा, ही ओढ होती. जर आपल्याला आपल्या सर्वच प्रश्नांची उत्तरं मिळत गेली तर आपण सर्व काही मिळवलं अशी एक भावना निर्माण होते ज्यातून stagnation येऊ शकत. यातून शिकण्याची इच्छा निघून जाते.
मूव्ही असुदे किंवा पुस्तक आपल्याला खिळवून कधी ठेवत? उत्कंठावर्धक कधी वाटतं? जेव्हा त्यात असे प्रसंग असे प्रश्न निर्माण होत असतात ज्याची उत्तरच आपल्याला समजत नसतात. ती हळु हळू उलगडत नेण हे त्याचं कौशल्य असत. ती जर एकाच वेळी समजली तर आपण पुढे पाहू का? नाही.
आपल्या आयुष्यात पण असे अनेक प्रश्न निर्माण होत असतात. पण सर्वांची उत्तरं आपल्याला मिळतीलच असे नाही. याचा अर्थ आपण त्याच्याच मागे धावल पाहिजे असा होत नाही. खरच त्या प्रश्नाचं उत्तर मिळाल्याने आपल्या आयुष्यात कितपत आणि कसा फरक पडणार आहे याचाही आपण विचार केला पाहिजे. आणि ते प्रश्न तिथेच सोडून दिले पाहिजेत. आणि वेळ आपल्याला सर्व देत असते. आपल्या प्रश्नांची उत्तर पण आपल्याला ती मिळवून देते. पण त्यासाठी आपण थांबलं पाहिजे. वाट पाहिली पाहिजे. अधीर न होता, उत्सुक झालं पाहिजे.
आणि काही प्रश्नांची उत्तर जेव्हा आपल्याला समजतात तेव्हा अस वाटत की आपण अज्ञानी होतो ते बर होत. कारण त्यातून तसा त्रास आपल्याला होतो. म्हणून कोणत्याही गोष्टीचा पाठलाग करण्याआधी त्याचा शेवट काय असणार आहे याचा पण विचार आपण केला पाहिजे.
आपण यातून काय सध्या करणार आहोत हे आपल्याला माहीत पाहिजे.
हे जेव्हा आपल्या लक्षात येईल तेव्हा समजेल की काही प्रश्नांची उत्तरं न मिळालेलीच बरी असतात.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

जीवनात कितीही काही केल तरी काहीच साध्य होत नसत. हेच जीवनाचं उत्तर आहे.