Skip to content

सर्व खोटं-खोटं सांगून गोड-गोड बोलणारी माणसं कशी ओळखावी?

सर्व खोटं-खोटं सांगून गोड-गोड बोलणारी माणसं कशी ओळखावी?


मयुरी महाजन


खरं तर माणसं ओळखंण ही एक कलाच आहे, ती कला विकसित करता येते, सर आम्हाला शिकवत असताना नेहमी म्हणायचे, दोन-चार गोष्टी नाही करता आल्या तरी चालतील, परंतु माणसं ओळखायला शिका, तेव्हा त्या गोष्टी तितक्या प्रमाणात गरजेच्या वाटल्या नाहीत, परंतु आज जेव्हा दुनियादारीच्या बाजारात वावरतो ,तेव्हा कळायला लागलं, सर खरंच तसं का म्हणत होते ,

आता खरं काय असतं, आणि खोटं काय असतं, याचा अभ्यास करायचा म्हटलं ,तर जेव्हा आपण आपल्या लहानपणीच्या दुनियेतून फिरून येऊ, तेव्हा आपल्याला त्याची मुळ सापडतील, बघा दोन लहान मुलं खेळत असतात, जर एखादी वस्तू तुटली,फुटली किंवा आपल्या हातून काहीतरी सांडलं गेलं, तर आई आल्यावर मुलांना बघितल्यावर ते दोघेही एकमेकांकडे बोट दाखवतात ,मी नाही याने केलं, त्यातील एक जण खरं सांगत असतो, आणि एक खोटं, सर्वात आधी जो सांगतो मी नाही यानेच केलं. खरतर ते उपद्रव त्यानेचं केलेले असतात, परंतु खोट्या गोष्टींचा आश्रय का घेतला जातो, स्वतःच्या संरक्षणासाठी आपल्याला त्या गोष्टींचे ब्लेमिंग होऊ नये ,म्हणून हि झाली साधी उदाहरण…

तसेच मोठे व्यक्तींचेही आहे ,खोटं खोटं सांगत असताना ते इतक्या गोडीगुलाबीने सांगत असतात, की समोरच्या व्यक्तीला ते पटायलाच पाहिजे, खरं तर माणूस खोटे तेव्हाच बोलतो, जेव्हा त्याची खर्‍याला सामोरे जाण्याची ताकद कमी पडते, परंतु सर्व खोटं खोटं सांगून गोड गोड बोलणारी माणसं कशी ओळखावी????

जेव्हा कुणीही व्यक्ती संभाषण करत असताना आपल्या नजरेला नजर मिळवत नसून जर इकडे-तिकडे बघत असेल, तर समजून जायचं ती व्यक्ती खोटे बोलत आहेत, अशी माणसं नेहमीच आपल्या स्वार्थाशी जोडलेली असतात, आणि त्याचा स्वार्थ पूर्ण करणे इतकेच त्यांचे उद्दिष्ट असते,

जेव्हा एखाद्याच्या बोलण्यात नेहमी त्यांच्या स्वार्थाला महत्त्व दिलेले बघायला मिळत असेल तर ,अशी माणसे आपल्या स्वार्थासाठी खोटे बोलून तो साध्य करण्याचा प्रयत्नात असतात ज्या व्यक्तींना फक्त आपला स्वार्थ साधायचा असतो, ते नेहमीच गोड गोड बोलताना दिसतात आणि आपल्यासाठी काय चांगले आणि काय वाईट ही माणसं त्याबद्दल आपल्याला कधीच काही सांगत नाही, खोट्याचा आधार केव्हा घेतला जातो ,जेव्हा खर्‍याला सामोरे जाण्याची ताकद नसते,

सर्व खोटं खोटं सांगून गोड बोलणारी व्यक्ती ओळखायचे असेल तर ,त्यांची विचारधारा लक्षात घ्यायला हवी ,कारण अशी माणसं कधीही दुसऱ्याच्या चांगल्याचा विचार करीत नाही, अशी माणसं दुसऱ्याच्या चांगल्यात सुद्धा असलेली कमतरताच लक्षात घेतील, आणि त्या गोष्टीला अन्य लोकांजवळ हसून सांगण्यातच आपला आनंद मिळतील,

अशा प्रकारची माणसं परंतु अशी माणसे स्वतःच्या बाबतीत मात्र वरचढपणे सांगण्याचा प्रयत्न करतात ,जसे की त्यांची एखाद्या गोष्टीतील चांगली बाजू उदोउदो करून सांगत सुटतात, मग त्याला कोणाची काही प्रतिक्रिया असो नसो, आपल्या गोष्टीला प्रत्येकाची प्रतिक्रीया असावी आणि दुसऱ्याच्या सांगितलेल्या निगेटिव्ह असलेली प्रतिक्रिया यांना मात्र आनंद देणारे देणारी असते ,आणि अशी माणसं त्यांची नेगेटिव्ह बाजूलाच लक्षात ठेवतात, ही त्यांची सर्वात मोठी चूक असते ,

आपलं खोटं सुद्धा गोड बोलून पटवून सांगणारी माणसं कुठलीही गोष्ट फिरवण्यात खूप पटाईत असतात, जी गोष्ट प्रत्यक्षात घडलेली सुद्धा नसते ,अशा गोष्टी यातून प्रत्येक वेळी दुसऱ्याचा अपमान चांगल्या व्यक्तींमधील काही चांगलं यांना सहन होत नाही, तेव्हा ते इतरांच्या मनात त्यांच्याविषयी चुकीचा गैरसमज पसरवतात हे करत असताना ते इतक्या शिताफीने त्या गोष्टी करतात की त्या करताना कोणाला त्यांच्या गोड बोलण्यावर कधी शंकासुद्धा येत नाही,

गोड बोलून फसवणारी माणसं आपल्या खोट्याला खरं करण्यासाठी तसेच पुरावे सुद्धा देताना दिसतात ,अशी खोटी बोलतात तसेच खोटे पुरावेही मिळवतात, परंतु त्यांच्या खोट्याचा हा पराक्रम जास्ती दिवस चालणारा नसतो ,त्यामुळे त्यांना एका प्रकारची भीती सुद्धा असते, जी त्यांच्या डोळ्यात दिसते ,अशा माणसांना ओळखायचे असेल, तर त्यांच्या संभाषणाच्या चाली वरती आपण जर लक्ष दिले, तर आपल्या ते लक्षात येते, व आपण ते ओळखू शकतो ,

हे काही पॉइंट होते जे आपल्याला नक्कीच खोटे बोलणाऱ्या माणसांचा मागोवा घ्यायला मदत करतील…


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!