Skip to content

सर्व काही सुरळीत होण्यासाठी सुद्धा काही वेळ जाऊ द्यावा लागतो.

सर्व काही सुरळीत होण्यासाठी सुद्धा काही वेळ जाऊ द्यावा लागतो.


मेराज बागवान


वेळ माणसाला सर्व काही शिकविते.वेळेपुढे कोणी लहान-मोठा नसतो. वेळेबरोबर सर्व गोष्टी समजतात. पण काही गोष्टींसाठी वेळेच यावी लागते.ते आपल्या हातात नसते. म्हणजेच,चांगल्या गोष्टी घडण्यासाठी देखील काही वेळ लागतो,तसेच काही वाईट गोष्टी सुधारण्यास देखील काही वेळ जाऊ द्यावा लागतो.लगेच,तुम्हाला वाटेल तेव्हा गोष्टी कधीच घडत नाहीत, पूर्वीसारख्या होत नाहीत.म्हणून काही वेळ जाऊ देणे अपरिहार्य असते.

काही तुमच्या आयुष्यात तुम्ही अत्यंत गरिबी अनुभवली असेल,किंवा आर्थिक संकटाला सामोरे तुम्ही गेले असाल.थोडा विचार केला ,तर एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल.ती म्हणजे,ह्या अशा परिस्थितीतुन पुन्हा उठून उभे राहण्यासाठी साहजिकच बराच कालावधी गेला असेल.तुम्ही त्या दरम्यान अनेक नवीन गोष्टी अनुभवल्या असतील.लोकांच्या बाबतीत अनेक चांगले-वाईट अनुभव आले असतील.कोणीतरी तुम्हाला ह्या कठीण काळात खूप मदत केली असेल,तर काही वेळेस अनेकांनी तोंड देखील फिरविल असेल.असे विविध अनुभव तुम्हाला त्या काळात आले असतील.आणि ह्या सर्व गोष्टींमध्ये काही वेळ,काळ नक्कीच गेला असेल.खरे तर तुम्हाला तुमची आणि इतरांची खरी ओळख पटण्यासाठी हा काळ तुमच्या खूप उपयोगी पडला. जर ही वेळ आली नसती तर तुम्ही कदाचित आज जितके मजबूत आहात तितके राहिले नसतात.म्हणून,थोडा काळ जाणे गरजेचे आहे.

नातेसंबंधांमध्ये काही जणांनी बरेच चांगले-वाईट अनुभव घेतले असतील.प्रेम संबंध किंवा नुकतेच लग्न झालेल्यांनी विविध समस्या पहिल्या असतील.एकमेकांचे दोष खुपत असतील,विभिन्न स्वभाव स्वीकारता आले नसतील,सतत मत भेद झाले असतील.पण मग ह्या सगळ्यात तुम्ही दोघे एकमेकांपासून थोडे दूर ही गेले असताल. कधी अबोला देखील धरला असेल.पण काही काळ गेल्यानंतर तुम्हाला तुम्ही चूक नक्की समजली असेल,तुम्ही तुमचा अहंकार थोडा बाजूला ठेवला असेल आणि मग सर्व गोष्टी पाण्यासारख्या स्पष्ट झाल्या असतील.कदाचित हा मधला काळ गेला नसता तर वाद कायम तसेच राहिले असते.

आयुष्य विविध गोष्टींनी भरलेले असते.सर्व गोष्टी नेहमी सुरळीत असतील असे कधीच नसते.कारण हे आयुष्य सुख आणि दुःख ह्या दोन्ही गोष्टींनी भरलेले आहे.गोड तसेच कडू आठवणी देखील आयुष्यात भरलेल्या आहेत.पण आयुष्यात कोणतीच गोष्ट कायम नसते.जसे सुख कायम नसते, तसेच दुःख देखील कायम नसते.आणि आयुष्याचे हे चक्र असेच अविरतपणे सुरूच असते.

बरेचदा होते काय की ,वाईट परिस्थिती आली की माणूस सतत त्या परिस्थितीला किंवा मग इतर कोणाला तरी दोष देत राहतो.पण त्याने काहीच उपयोग होत नाही.त्रास आणखीनच वाढतो. अशा वेळी स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा,स्वतःचा दृष्टिकोन बदलला पाहिजे.तुम्ही एखाद्या गोष्टीकडे,अडचणीकडे जसे पाहाल तशीच ती दिसत असते.जसे तुमचे विचार असतात,अगदी तसेच तुम्ही घडत जातात आणि जग देखील मग तुम्हाला तसेच दिसते.म्हणून दृष्टिकोन महत्वाचा.संयम महत्वाचा. स्वतःवरील विश्वास महत्वाचा.आणि ‘ही देखील वेळ निघून जाईल’ हा आत्मविश्वास खूप मोलाचा ठरतो.

चांगल्या आणि मोठ्या गोष्टी घडण्यासाठी वेळच जाऊ द्यावी लागते.कारण चांगल्या गोष्टी बनण्यासाठी वेळ लागतो.Great things takes time.म्हणून वेळेवर विश्वास हवा.वेळ प्रत्येकाची येते,असे आपण म्हणतो.पण त्या वेळेसाठी संयम किती जणांकडे असतो ,हा मोठा प्रश्न आहे.काही जण उगाच चीडचीड करतात, सतत राग राग करतात आणि त्यांचा संयम सुटतो.पण खरा कस संयम बाळगण्यात असतो.

काही माणसे खरच जगावेगळी असतात.कितीही मोठी संकटे आली तरी देखील निधड्या छातीने प्रत्येकवेळी त्याच जोमाने संकटांना, वादळांना हुसकावून लावत असते,लढत असतात. पण हार काही मानत नाहीत.आणि अशा व्यक्तींना कधी ना कधी यश हे मिळतेच.म्हणून वेळेचा आदर करा.वेळ तुम्हाला कधीच चुकीचे किंवा खोटे जग दाखवत नाही.वेळेत जी ताकद असते ती कोणत्याच गोष्टीत नसते.

So, Believe in Time and Never Give Up!


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!