वारंवार चिडचिड करत असाल तर जवळची माणसं गमावण्याची नामुष्की ओढावून बसाल.
रोहिणी राधाकिसन
अस म्हणतात की “कुछ पाने के लीए ,कुछ खोना पडता है” स्वप्न पूर्ण करण्याकरीता जर रात्रीची झोप गमवावी लागत असेल तर ठीक आहे पण,जर चिडचिडेपनासाठी जवळची माणसं गमवावी लागत असतील तर हे गणित मात्र चुकतय . कारण परिस्थिती काहीही असो, चूक कोणाचीही असो नामुष्की मात्र बोलणाऱ्याचीच होते हो ना !मग आपलं कितीही बरोबर असुदया जर आपल बोलणं आपण समोरच्याला पटवून देऊ शकत नाही तर आपण शांत राहणं कधीही चांगल.
तुम्ही या गोष्टी अनुभवल्या असतील एका घरामध्ये जेव्हा दोन सुना असतात तेव्हा नेहमी एक खूप शांत स्वभावाची तर दुसरी खूप आगाऊ असल्याच लेबल लागलेली असते आणि हे प्रत्येक ठिकाणी असतच,याच कारण असं की, समस्या प्रत्येक ठिकाणी असतात फरक एवढाच असतो की तुम्ही त्या परिस्थितीमध्ये प्रतिक्रिया काय देता बरोबर ना! एक त्यावेळेस शांततेत तेथून निघून जाते तर दुसरी वाद घालते, ज्याचा काहीही उपयोग नसतो आणि याचा शेवट म्हणजे नात्यांमधला कडवटपणा ज्याला आपण कितीही प्रयत्न केला तरी सुधारू शकत नाही.
तुम्ही या गोष्टी टाळण्याकरिता काही सवयी बदलू शकता-
1)परिस्थिति जाणून न घेता बोलू नये.
2) परिस्थिति बघून शांत राहणे.
3)घातक व अपमानास्पद शब्दांचा वापर टाळणे.
4)समोरच्याकडे बोट करण्यापूर्वी स्वतःची चूक समजून घ्यावी.
5)बोलण्यापूर्वी ऐकण्याची मनस्थिति ठेवावी.
आजकाल पुरुष ,स्त्रिया दोघेही नोकरी करतात, दोघांनाही कामाचा तनाव असतो, परिवारीक जिम्मेदारी असते ,मुलांची जिम्मेदारी असते,आणि या सगळ्या दबावाखाली त्यांचा मानसिक तान हा वाढत असतो , मग एकमेकांवर तो तान ,चिडचिडीच्या रूपाने बाहेर पडतो आणि याचा परिणाम हा त्यांच्या कामावर ,नात्यांवर एवढंच नाहीतर कुटुंबावरही होऊ लागतो व त्यांच्या या वारंवार चिडचिडीमूळे मुलांच्या मानसिकतेवर परिणाम होऊ लागतो. शेवटी नातं काडीमोड घेण्यापर्यंत पोहचतं, ज्याचा परिणाम हा त्या दोघांपेक्षा जास्त मुलांना भोगावा लागतो.
आणि पूर्ण कुटुंबाला याची नामुष्की सहन करावी लागते. तर मुलांच्या नजरेतील आपल्याबद्दलच्या प्रेमाच रूपांतर भीतीत ,रागात होताना बघाव लागत.
मग हे सगळं कशासाठी आपण एकमेकांना सांभाळूनही घेऊ शकतो की , मी हे करतो ,तू ते कर असही करू शकतो ,तुला जास्तीचं काम आहे तर मी आज घरी वेळेत जाऊन मुलांना बघेन.
तुला काही अडचण आहे मी घर सांभाळेन,असही आपण एकमेकांना समजून प्रेमाने आयुष्य जगू शकतो.
प्रत्येकवेळी राग आला म्हणजे तो लगेच व्यक्त करणे , चिडचिड करून आपल्या आयुष्यातील जवळच्या , प्रेमाच्या व्यक्तींना दूर करून बदनामी व मनस्ताप करत बसायच की स्वतःवर ,स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेऊन , शांततेत तो क्षण घालवून एक संयमी व्यक्तिमत्व घडवायचं हे ज्याच त्यानेच ठरवाव. शेवटी या सगळ्यावर उपाय एकच तो म्हणजे
” मौनं सर्वार्थ साधनम् ”
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

खुप छान.