दोघेही नोकरी करत असतील आणि संसार अडत असल्यास नेमकी चूक कोणाची?
मयुरी महाजन
जीवनाची जीवन गाथा ही स्त्री पुरुष दोघांशिवाय अपूर्णच, पुरुषही महत्त्वाचा आहेच, आणि स्त्री सुद्धा ,आपल्या भारताचा जर आपण विचार केला तर आपल्या समाज व्यवस्थेमध्ये पूर्वी स्त्री ला शिक्षण घ्यायलाही परवानगी नव्हती ,त्यावेळेस सावित्रीबाई फुले व ज्योतिबा फुले यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रचला, चूल आणि मूल या पलीकडेही विश्व आहे, हे बघण्याची संधी स्त्री ला मिळाली, आणि आज स्त्री कुठल्याही क्षेत्रात मागे राहिलेल्या नाहीत ,आज प्रत्येक क्षेत्र स्त्री ने काबीज करून दाखविले आहे, परंतु हे सर्व करून सुद्धा तिला तिचा संसार कधी सुटला नाही,
आजची स्त्री कितीही शिकलेली असली, तरी संसार आणि घर सांभाळण्याची जबाबदारी हे तिच्या एकटीचीच आहे ,असे बऱ्याच ठिकाणी गृहीत धरले जाते ,स्त्रीने शिक्षण अर्जित केले, व त्या आधारे ती स्वबळावर अर्थाजन करण्यासाठी सक्षम झाली, जर स्त्रीने कधी पुरुषाला काही काम सांगितले, तर बऱ्याच घरांमध्ये अजूनही तू कमावतेस म्हणून काय रुबाब दाखवशील का ??असं ऐकावं लागतं ,जर संसाराची गाडी चालवताना काही अडलं तर ती तुझी जबाबदारी आहे, तू ते व्यवस्थित पार पाडायला हवी, असेही ऐकावे लागते,
आजच्या आपल्या आधुनिक जीवनमानात प्रत्येकाला आपापल्या भविष्याची व पुढच्या अनेक आर्थिक संकटातून आपली सुटका होण्यासाठी, अर्थार्जण करणे क्रमप्राप्त आहे, त्यासाठी जो तो जीवाच्या आकांताने प्रयत्न करतोच ,परंतु आपण हेही लक्षात घ्यायला हवं ,पैसा किती कमावला तरी तो कुठेतरी कमीच पडतो,
आज पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करणारी स्त्री आपल्या जबाबदाऱ्या व आपली कर्तव्य पार पाडण्यात कुठेच कमी नाही, तसेच पुरुष सुद्धा ज्या घराच्या पालनपोषणासाठी जीवाचा आटापिटा करतो, त्याच घराला घरातील आपल्या कुटुंबीयांना एकंदरीत आपला गोड आणि आंबट अशा संसाराला कंटाळलेल्या दृष्टीने न बघता आपल्या पुढ्यात असलेले सुख न पाहता कुठल्यातरी अनामिक सुखाची अपेक्षा करत असतो ,
जर दोघेही नोकरी करणारे असतील, आणि त्यात संसार अडत असल्यास ,नेमकी चुक कोणाची ???खरंतर प्रश्न दोघी बाजूने आहे ,तसेच उत्तर सुद्धा दोघ बाजूनेच आहे, त्यासाठी कुणा एकावरती त्याचे दडपण टाकणे योग्य नाही, कारण संसार जसा दोघांचा आहे, तसाच तो सांभाळण्याची जबाबदारी सुद्धा दोघांचीही बरोबरीने असायला हवी,
असे म्हणतात की संसार हा एकमेकांचे वाभोडे काढण्यासाठी नाही ,तर जिथे आपला जोडीदार कमी पडेल ,तेथे एकमेकांसाठी उभे राहण्याचे नाव आहे, संसार कसा कप आणि बशी सारखा असावा, एकातून सांडलं तरी दुसऱ्याने ते सावरून घ्यायला हवं, आणि सर्वात महत्त्वाचं की आपण जेंडर च्या बाबतीत जास्त हुकूमत न गाजवता आपण स्त्री आहोत, किंवा पुरुष आहोत, या आधी आपण एक माणूस आहोत हे स्वीकारायला हवं,
दोघेही नोकरी करतात, अर्थाजन करतात, मान्य ,पण आपण जे काही करतोय ते कशासाठी संसारासाठी ,आणि हा संसारचं जरं त्यात अडत असेल, तर प्रश्न जिथे निर्माण होतोय, तो शेवट तिथेच येऊन थांबतो, यासाठी समंजसपणा असायला हवा, जेणेकरून संसार अडत असायला, कुणाची चुकी म्हणून एकमेकांवरती त्याच्या आरोप व्हायला नको, संसार बनतो तो सुद्धा एकमेकांनीच, आणि संसार सुखाचा व आनंदाचा होतो, तो सुद्धा एकमेकांच्या साथीनेच, परंतु त्याचं संसाराची ती गोडी जर चाखता येत नसेल, आपण एकमेकांसाठी असण्याचे महत्त्व जाणंत नसालं, तर फक्त अर्थार्जण करून आपण खूप काही मिळवतोय, असा भ्रम ठेवू नका ,कारण प्राणी मात्र सुद्धा आपापला उदरनिर्वाह चालवतात, ते सुद्धा कुठल्याही अडचणी शिवाय ,ते सुद्धा आपल्या पिल्लांच्या पालनपोषणाची जबाबदारी पार पाडतात, आणि अतिशय सलोख्याने जीवन जगतात, आपण त्या प्राणी आणि पक्षांकडून ते शिकायला हवे, की जीवनाला एकमेकांच्या संगतीने आणि एकमेकांसाठी जगायचे असते ,
ज्या घरातील आई आपल्या मुलांना स्त्री पुरुष समानता यानुसार वागणूक देते, तेथे घडणारी मुले ही घरातील कामे करण्यात कधीच कमीपणा मानत नाही ,आणि मानावे तरी का? कारण की शिक्षणासाठी मुलीला जास्त शिक्षण करून काय करायचे आहे ,मुलाला शिकवायला हवे, असे म्हणाणारे पालक सुद्धा आपल्या मुलासाठी जास्त शिकलेली मुलगीच हवी असे विचार ठेवतात, जर आपल्याला आपल्या भविष्यात काही बदल हवा असेल, तर त्याची सुरुवात आपल्याला प्रत्येकाला आपल्या घरातूनच करावी लागेल,
संसारा वाटतो, तितका सोपा नाही, पदोपदी संघर्ष आहे, पदोपदी कुठल्यातरी अडचणी आहेत, पण या सर्वात दोघांचाही एकमेकांवर विश्वास व त्याला एकमेकांच्या कष्टाची व संघर्षाची जोड मिळाली, ना तर संसारासारखा दुसरा स्वर्ग नाही, हे मात्र नक्की, बरे वाईट प्रसंग तर येतच राहणार, पण संसार डगमगायला नको, आपण हे करू शकलो तरी भरपूर आहे ,आपल्या सर्वांसाठी …..व आपल्या संसारासाठी…..
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!
