संघर्षातच माणूस एकटा असतो, यशात सारे जग बरोबर असतं.
सोनाली जे.
प्रत्येक व्यक्तीची काही स्वप्ने असतात. मग शिक्षण असेल, नोकरी विषयी असेल , नवीन काही शिकणे असेल, जोडीदार असा असावा तसा असावा. आपल्या संसाराची , घराची , मुलांची , त्यांचं शिक्षण, त्यांची नोकरी ,करियर , त्यांचे लग्न असे खरे तर न संपणारी यादी म्हणजे स्वप्न किंवा इच्छा असते म्हणले तरी चालेल.
आयुष्यात येणारे चढ उतार , प्रत्येक गोष्ट मिळविण्यासाठी किंवा मनाजोगते करण्यासाठी कायम संघर्ष हा करावा लागतो. आणि तरच ठरविलेले ध्येय , इच्छा , स्वप्ने साकार करणे शक्य होते.
संघर्ष करावा लागतो म्हणून काहीच न करणारी आहेत. पण मग त्या व्यक्ती जे मिळेल ते समाधान मानावे लागते अशा परिस्थिती मध्ये जगतात. आणि जरी त्यांच्याकडे क्षमता असतील तरी केवळ त्याचा वापर न केल्याने किंवा भीतीपोटी किंवा comfort zone न सोडता आहे त्यात रूटीन चालू ठेवतात अशा व्यक्ती बरेचदा स्वतः चे नशीब आणि देव यांना दोष देत राहतात.
पण काही व्यक्तींची वृत्ती ही असते की काही असो किती ही त्रास झाला तरी आपण एखादी गोष्ट ठरविली आहे तर ती करायची म्हणजे करायची च. त्याकरिता किती ही त्याग करावे लागू देत, किती ही त्रास मग शारीरिक त्रास असोत अथवा मानसिक त्रास ते सहन करायचे. आणि हे संघर्ष तीच व्यक्ती करत असते जिला इप्सित साध्य करायचे असते.इतर अगदी जवळचे असून ही त्याचा seriousness , ती आच समजू शकत नाहीत.
अशावेळी त्याच्या प्रयत्नात , वारंवार अपयश आले तरी त्यातून न खचता परत उभे राहणे म्हणजे परत परत प्रयत्न करणे , आलेल्या बर्या वाईट अनुभवांची मदत पुढे चुका सुधारण्यात करणे हे करत असताना संघर्षातच माणूस एकटा असतो, यशात सारे जग बरोबर असतं. कारण त्या व्यक्तीचे यश मात्र सगळ्यांना दिसते. आणि तेव्हा अगदी घरचे ही म्हणतात आम्ही सोबत होतोच.
पण त्यांना काय माहिती नुसते घरात सोबत असून तुम्ही आपल्या व्यक्तीची धडपड , त्याचे त्रास , संघर्ष यातला एक टक्का भाग ही समजू शकले नसता. उलट जेव्हा जेव्हा प्रयत्न करून ही हाती अपयश येते.निराशा येते तेव्हा घरचे ही साथ देण्याऐवजी तुमच्यावर टीका च करत असतात. कशाला पाहिजे हे नसते उद्योग ..जे सहज जमेल , झेपेल ते करावे .असे म्हणून मानसिक खच्चीकरण च करत असतात. मग बाहेरच्या लोकांचे तर काय विचारता.. घरचे आपले असून बाहेरचे तर मजा बघणारे , टीका करणारे . आणि नकारात्मक च दिसतात.
कठीण मार्गाने मार्गक्रमणा सुरू केल्यानंतर विरोध आणि विरोधक हे आवर्जून आपले पाय मागे खेचण्यासाठी , आपलं आत्मबल कमकुवत करण्यासाठी आतुर असतात. अशावेळी एकच गोष्ट करावी मुक-बधीरांसारखं रहावं आणि अशा नकारात्मक लोकांपासून स्वतःला शक्य तितकं लांब ठेवून आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करावं. कारण आपण निवडलेल्या मार्गाचं महत्त्व आपल्यापेक्षा अधिक कुणीच जाणत नाही….जेव्हा आपण आपल्या भुमिकेशी प्रामाणिक असतो तेव्हा “टीका” ही टोचत नाही…
वाल्या कोळी तर सर्व परिचित आहे. तो पाप करून , लुटमार करून आपल्या बायको मुलांना सुखात ठेवत असे. एकदा नारदमुनी त्याला विचारतात तू हे सगळे तुझ्या बायको मुलांच्या करिता करत आहेस पण तुझ्या या पापात तुझे कुटुंब , बायका पोरे भागीदार होतील का विचार? जेव्हा वाल्या आपल्या बायको मुलांना विचारतो तेव्हा ते नाही म्हणतात. मग नारदमुनी त्याला तपस्या करून त्याची पापातून मुक्तता होईल सांगतात. वाल्या घोर तपस्या करू लागतो त्याच्या भोवती मुंग्याचे वारूळ तयार होते. अन्न नाही पाणी नाही. ऊन , वारा , पावूस, थंडी या कशाचाही परिणाम तो स्वतः वर होवू देत नाही .त्याचा पापातून मुक्त होण्याचा संघर्ष वर्षानुवर्ष सुरूच असतो. पण त्याची बायको मुले एकदाही येवून बघत नाहीत की आपले बाबा काय करत आहेत .कुठे आहेत कसे आहेत.हेच पुढे वाल्मिकी ऋषी ज्यांनी रामायण लिहिले ते म्हणजेच वाल्या कोळी.
पण या संघर्षात ते एकटेच होते. तसेच आहे. ध्येय प्राप्ती करिता संघर्ष करताना स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही हेच खरे.
सुहास एका मध्यम वर्गीय कुटुंबातून गावाकडून शहरात शिक्षण घेण्यासाठी आलेला ..शिक्षण घेताना ही बचत करण्याची वृत्ती. भविष्यकालीन तरदुद करण्याचे प्रयत्न .तेव्हा गुंतवणूक , lic, मेडिकल पॉलिसी या सारख्या गोष्टी ही जागरूकपणे केल्या होत्या. अतिशय दूर दृष्टिकोन. शिक्षण पूर्ण झाल्यावर एक दोन जॉब करून त्यात ही येणारे अनुभव लक्षात घेवून आपल्याला नक्की काय करायचे हे ठरवून तसे शिक्षण आणि स्किल develop करत स्वतः ला बदलून मग एकदम मोठ्या IT company मध्ये जॉब मिळाला. हे करत असताना लग्न होवून दोन गोंडस मुलेही .. बायको.मुलांची जबाबदारी पार पाडताना स्वतच्या घरात secure फील करू म्हणून एक छोटेसे स्वतः चे घर घेतले.
नोकरी मध्ये स्थैर्य येत गेले .परदेशात जाण्याची संधी मिळाली. मग मोठे घर , गाडी ही घेतली. पण हे करत असताना एकरकमी पैसे देणे शक्य नव्हते म्हणून कर्ज काढले. बरं पगार ही भरपूर असला तरी कर्जाचे हप्ते, घरखर्च, मुलांचे शिक्षण , मुला बायकोची हौस मौज हे करताना पैसे कसे manage करत असे सुहास हे त्याचे त्याला माहिती. कधी ही बायको किंवा मुले किंवा अगदी आई वडिलांना ही त्याचे जी धडपड सुरू होती, ती कधी ही त्याने कोणाला जाणवू दिली नाही.
घराचे , कर्जाचे हप्ते कमी करण्यासाठी , मुलांचा , बायको चा आनंद वाढविण्यासाठी , त्यांना कायम secure Life जगता यावे म्हणून हा सतत धडपड करत असे.
दर तीन वर्षांनी प्रोजेक्ट करिता onsite परदेशात जावून तिकडे एकटे राहून, मग सगळे घेवून येणे, स्वैपाक भांडी ,कपडे आपण धुणे , सगळी साफ सफाई , टापटीप हे करणे. बरे नसेल तरी पर्याय नसे. करावेच लागे. त्यातून परत ऑफिस चे काम. या सगळ्यातून ही तो आनंदी , उत्साही राहत असे याची दोन कारणे १ . त्याचे करियर उंचावत होते. नवनवीन संधी मिळत होत्या. परदेशात काम करण्याची , तिथल्या लोकांच्या कामाची पद्धत , विचारसरणी , ideas , तिथले culture , वागणूक सगळे त्याच्या दृष्टीने अनुभव देणारे चांगले ठरत होते. शिवाय नोकरी मधली बढती.
आणि २ म्हणजे m tonic. Money .. भारतात मिळणारा पगार शिवाय प्रोजेक्ट चा onsite पगार .भरपूर पैसा हातात येत होता. कर्ज ही बरेच फेडले गेले.
पण अचानक युरोप मधला onsite project थांबला. कंपनी ने काम थांबविण्यास सांगितले. तरी handover करे पर्यंत पगार चालू होते. भारतातला तसाही सुरू होता. विसा शिल्लक होता . भारतात परत येणार नाही हेच सुहास चे. जवळचे एक दोन मित्र सोडल्यास प्रोजेक्ट थांबला ही गोष्ट कोणालाच माहिती नाही.
मुलांचं शिक्षण बाकी होते, आपले एक स्टेटस maintain करताना किंवा गरजा वाढविताना घर कर्ज , गाडी करिता कर्ज , घरातल्या गॅजेट्स करिता घेतलेले कर्ज हे सगळे फेडायला झटपट मार्ग म्हणजे परदेश हाच होता. बरं आता परत कंपनी onsite chance देणार का माहिती नव्हते कारण या प्रोजेक्ट मध्ये खंड पडला त्याची चौकशी नक्कीच होणार होती. त्यामुळे पुढचे काही माहिती नव्हते.
पाच सहा महिन्यात मिळालेल्या पैशातून बरेच कर्ज फेडले , मुलाची दोन अडीच लाख रुपये वर्षाची फी अशी चार वर्ष त्यातली काही भरली. काही शिल्लक ठेवले.
पण आता भारतात परत येणार नाही असा ठाम निश्चय केला होता सुहास ने. त्याची कारणे घरी माहिती नव्हती. किंवा प्रोजेक्ट विषयी ही काही घरी बोलला नाही त्यामुळे इकडे घरचे आनंदात , मजेत च होते. त्यांना काहीच फरक पडत नव्हता. सुहास चे जवळचे मित्र म्हणले ही घरी कल्पना दे. नाही म्हणाला तो. मित्र म्हणले अरे तू जे एवढी धडपड , संघर्ष करतो आहेस ते त्यांना ही कळू दे. जाणीव होवू दे. तेव्हा सुहास म्हणायचा मी हे करतो ते माझ्या करिता करतो. त्याचे ही बरोबर होते. वाल्या जसा पापात एकटाच होता. तसा कर्ज घेणे, बायको मुलांच्या गरज त्यांना सुरक्षितता देणे यात सुहास ची जबाबदारी होती.
सुहास ने युरोप मध्ये उत्साहाने घेतलेले घर , वस्तू सगळे त्याला देवून टाकावे लागले . ते सोडताना झालेले दुःख विसरण्या करिता त्याने तेव्हा दारूचा आधार घेतला पण घरच्यांच्या सोबत हे शेअर केले नाही . कारण काय तर घरच्यांना सगळे आनंदी चित्र दाखवायचे. त्याचे यश तेवढे माहिती त्यांना. बरेचवेळा तो म्हणायचा ही मी पैसे कमविण्याच मशीन आहे. आणि अचानक प्रोजेक्ट थांबल्यामुळे त्याचे पुढचे सगळे planning , calculations फिस्कटले होते. त्याची स्वप्ने , इच्छा , गर्जपूर्ती सगळेच तुटले. खुंटले.
त्याने त्याच्या मित्रा सोबत शेअरिंग मध्ये राहायचे ठरविले. तो तिकडे शिफ्ट झाला. शिफ्ट होताना प्रचंड त्रास झाला. जे एवढ्या उत्साहाने परदेशात येवून प्रयत्नपूर्वक उभे केले होते ते सोडून जाताना प्रचंड त्रास झाला. परदेशात च काय पण अपल्यादेशत ही एकट्यावर अशी वेळ कधी येवू नये. अगदी वैऱ्यावर ही अशी वेळ येवू नये.
सुहास ज्या उत्साहाने इथे आला होता तो सुरुवातीचा त्याचा उत्साह कमी झाला. प्रत्येक गोष्टीत संघर्ष करणे , पटवून घेणे, जमवून घेणे सुरू झाले. मग खर्चात काटकसर . खाणे पिणे यात काटकसर , तिथे राहायचे हा अट्टाहास . भारतात परत येवून परत मर्यादित पगार मिळणार .. पैसा सगल्याकरिता पाहिजे हेच डोक्यात. पैसा नसेल तर काही नाही. म्हणून तिथे राहून. मिळेल ते काम करण्याची तयारी तो करत होता. एवढ्या मोठ्या कंपनी मध्ये काम करणारा .चांगल्या पोझिशन वरचा सुहास तिथे अगदी taxi driving करायचे किंवा एखाद्या मॉल मध्ये सेल्समन म्हणून जॉब करायचा इथेपर्यंत विचार करून तसे प्रयत्न करत होता. पण याची किंचित जाणीव ही तो घरच्यांना करू देत नव्हता.त्याच्या मित्राने त्याच्या आई बाबांना , बायको ला न राहवून सांगितले त्याचे struggle सांगितलं. तिथेच राहणार हे सांगितले तरी त्याच्या बायको ने त्याला परत ये असे सांगणे , त्याची विचारपूस करणे हे अपेक्षित होते तर ती उलट म्हणाली त्यात काय तिथे भरपूर जॉब मिळतात. हा गेला तर दुसरा मिळेल की जॉब हे तिचे बोलणे ऐकल्यावर मात्र मित्राला काळजात चर्र झालं. की आज केवळ हे सगळे सुख सोयी , आनंदात , चैनीत जगणे ..म्हणजे जे केवळ यश सुहासने मिळविले त्याचा उपभोग हे घेत आहेत मात्र त्याच्या रोजच्या संघर्षात , struggle तिथे जो तो दिवस काढत आहे, मानसिक त्रास , स्ट्रेस सहन करत आहे. , insecure life जगत आहे. एकटा आहे. किती ही खंबीर माणूस असेल तर अशा प्रसंगी नक्कीच कोलमडत असतो. शारीरिक कष्ट ही सहन करतो. प्रसंगी पोटाला चिमटे घेवून बचत करतो.
त्याच्या वरची परिस्थिती या चे काही देणे घेणे ही नाही त्याच्या आपल्या लोकाना . त्यात कुठेही त्यांना काय अडचण येते का असेही नाही.. अरे आपले च माणूस असून ही असे का ?
पण जिद्दीने सुहासने तिथे राहून , स्ट्रगल करून त्याची सगळी ध्येय प्राप्त केली. कर्ज कमी केले. मुलांच शिक्षण त्याकरिता पैसा उभा केला..आपल्या कुटुंबाच्या baisc गरजा तर पूर्ण केल्याचं पण ऐशो आराम ही दिला आणि परत secure life ही दिले.
आज त्याची बायको मुले म्हणतात मग आम्ही ही इथे एकटे राहून सगळे केलेच की. त्यामुळे सुहास म्हणतो हो तुम्ही साथ दिली म्हणूनच हे यश मिळाले ..सगळ्या यशाचे तुमची वाटेकरी आहात.
असे अनेकांच्या आयुष्यात घडते ..संघर्ष मात्र ती एकटी व्यक्ती सहन करते. आणि यशात वाटेकरी मात्र सगळे असतात. पडत्या काळात , एकट्यालाच उभे राहावे लागते. जे प्रसंग येतील त्याला टक्के टोणपे खावे लागतात.
आज झोपडपट्टीत , गरिबीत राहून अभ्यास करून वरची पदे , आयएएस म्हणा किंवा इतर पदावर पोहचलेल्या व्यक्तींचे कौतुक होते. पण त्यांना इथे पर्यंत पोहचण्यासाठी त्यांनी केलेला संघर्ष , त्यांच्या घरच्यांनी काढलेल्या खस्ता. परवडत नसताना कसेही करून , कर्ज काढून मुलांना शिकवण्याची धडपड हे तेव्हा कोणाला ही समजत नाही. कोणाला जाणीव नसते. मात्र जेव्हा त्यांची मुले मोठ्या पदावर नियुक्त होतात. यश संपादन करतात तेव्हा अगदी शेजार पाजार चे ही सांगतात की आम्ही पण त्यांना मदत केली. .
दुनियेची रीत च आहे ही. संघर्षातच माणूस एकटा असतो, यशात सारे जग बरोबर असतं. पण एकटे आहोत म्हणून डगमगू नका. तुमच्या स्वतः वर विश्वास ठेवा. सकारात्मक रहा. तुमच्यातल्या सामर्थ्याचे प्रदर्शन करण्याची हीच ती योग्य वेळ समजा.
आणि त्यालाच माहिती जो संघर्ष करतो त्याच्या दृष्टीने त्यातून तो बाहेर पडून आला हेच मोठे यश असते. बाकी गोष्टी या दिखावा असतात. आणि त्याचे क्रेडिट ही तो आपणहून आपल्या लोकांना देतो . का ? तर परत मानसिकदृष्ट्या आपल्या लोकांना ही बरे वाटावे. त्यांना proud फील व्हावे.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

Superb
खूपच छान 👌👌