समोरच्याला बोलायची संधी देत नसाल, तर तुम्हांला तुमच्या अडचणीत मनापासून कोणीच ऐकून घेणार नाही.
टीम आपलं मानसशास्त्र
मानवी स्वभाव आहे की समोरच्याने काही सांगण्यास सुरुवात केली की आपले घोडे पुढं दामटत राहायचे. समोरच्याचे बोलणे ऐकून घेण्याची मानसिकता च नसते. त्यानं काही दुखी सांगण्यास सुरुवात केली की लगेच आपल्याला किती दुःख , त्रास आहेत याचेच गाऱ्हाणे गायचे.
समोरच्याने ऑफिस मध्ये एखादे अवघड आणि कठीण काम कसे केले , त्याकरिता प्रयत्न काय केले आणि त्याचा अनुभव , शिक्षण , स्किल याचा अनुभव जेव्हा उत्साहाने सांगू लागतो तेव्हा दुसरी समोरची व्यक्ती त्याचे बोलणे अर्धवट मध्येच खंडित करते बोलायची संधी च देत नाही आणि त्यात काय एव्हढे माझ्या बाबतीत ही असेच झाले तेव्हा मी असे केले , तसे केले असे करून स्वतः ची फुशारकी मारते.
किंवा अगदी याउलट एखादी व्यक्ती काही सांगायला सुरुवात करते तेव्हा समोरची व्यक्ती त्याला बोलू न देताच निघून जाते. किंवा ignore करते.
स्नेहा आणि संजू यात प्रत्येकवेळी स्नेहाच बोलायची. संजू काही सांगू लागला तरी स्नेहा स्वतः चे घोडे दामटत असे. संजू ला बोलायची संधीच देत नसे. अनेक छोटे छोटे प्रसंग असे घडत की त्यातून स्नेहा संजू ला बोलूच देत नसे.
स्नेहाने संजू ला फोन केला बिझी होता तो नंतर फोन करतो म्हणाला , स्नेहा वाट बघत राहिली शेवटी मेसेज केला फोन करणार होतास , विसरलास ना . तेव्हा संजू ने मेसेज केला मित्र भेटला त्याच्याकडं आलों आहे. तरी ही तिचे शेवटपर्यंत एकच की मला फोन का केला नाही. म्हणजे मी महत्वाची नाही. एक मेसेज करता आला नाही का ? असे स्वतः च्या बाजूचे विचार .
यावर सुज्ञ संजूने कोणतेही explaination देणे सोडले . जेव्हा इतर ही गोष्टीविषयी स्नेहा बोलू लागली तेव्हा तेही बोलणे टाळू लागला. तिने किती ही वेगवेगळे विषय काढले तरी तो आता तिला बोलण्याची संधी देत नव्हता. प्रत्येक वेळी तिचे वागणे चुकीचे हेच पटवून देत होता. म्हणजे पण स्नेहा चे ही म्हणणं बरोबर होते की फोन करतो यात सकारात्मकता होती. वाट बघण्यात एक आशा होती .आणि ती सकारात्मक भावना होती.
याउलट फोन केला नाही. इतर कामात व्यस्त झाला संजू .कदाचित त्याच्याकडून खरेच तो कामात अडकला ही असेल पण स्नेहा मात्र फोनची वाट बघून निराश झाली ही निराशा म्हणजे नकारात्मक भावना झाली.
दोघेही दोघांच्या ठिकाणी योग्य असून ही समोरच्याला कधीच बोलायची संधी दिली नाही, आणि यातून एकमेकांत वाद वाढत गेले . तू तू मैं मैं. मी बरोबर तो चूक. ती चूक .एवढीशी गोष्ट समजून घेत नाही. हे त्याचे म्हणणे तिचे म्हणणे एवढीशी गोष्ट नाही ही. यातून मी कशी बरोबर , तुझे कसे चूक हेच वाद वाढवत गेले. आणि दोघेही एवढ्या टोकाला गेले की दोघांची ही मनस्थिती प्रचंड बिघडली. राग , चिडचिड , अविश्वास , insecurity अशा अनेक भावना वाढत गेल्या.
काही काळाने एकमेक परत जवळ येण्या करिता कारणे शोधू लागले . बोलण्याचा प्रयत्न करू लागले. होणारी मनाची घालमेल समजून सांगण्याचा स्नेहाने ही प्रयत्न केला पण संजू नेही तिची अडचण समजून घेतली नाही. आणि मग परत तिने ही समजून घेतले नाही. तिची आणि त्याची होणारी मानसिक कुचंबणा यातून मार्ग काढण्याचा आणि त्याला त्याच्या, तिला तिच्या अडचणीत मनापासून कोणीच ऐकून घेत नव्हते आणि मार्गही सापडत नव्हते. एकमेकांच्या आयुष्यात आलो ही चूक केली असे म्हणून दोघांनी दुरावा पत्करला.
यात एकमेकांनी समोरच्याला कधीच बोलायची संधी दिली नाही. आणि मनाच्या निराशाजनक अवस्थेत , राग , चिडचिड , एकमेकांविषयी posesiveness, अविश्वास, निराशा या सगळ्या मानसिक अडचणीतून जाताना दोघांनीही मनापासून एकमेकांचे ऐकून घेतले नाही. आणि ते वाद , ती निराशा एकमेकांच्या poseesiveness वरून वाद नकोत , चिडचिड ऐकून ही घ्यायला नको म्हणून एकमेकांपासून कायम दूर राहणे स्वीकारले.
असे बरेचदा होते ऑफिस मध्ये सहकारी सोबत काम करत असताना एकच कायम बोलत असतो दुसऱ्याला काही सांगण्याची संधी देत नसतो . भले तो दुसरा खूप अनुभवी असतो. शेखर असाच कायम स्वतः बद्दल बोलणारा , मी हा प्रोब्लेम असा solve केला तसा केला. त्याचा सहकारी विवेक ही अनुभवी आणि हुशार पण त्याला शेखर बोलूच देत नसे . विवेक काही सांगू लागला की मी हा असा . तसा . हेच. मग विवेक ने हळूहळू बोलणे ही कमी केले.
एकदा शेखर ऑफिस कामात खूप अडकला ..त्याचा प्रोब्लेम solve होत नव्हता. आणि त्याने विवेक ला सांगण्याचा आणि त्याच्याकडून मदतीची अपेक्षा केली तेव्हा पूर्व अनुभव लक्षात घेता विवेकने शेखरला आणि त्याला त्याच्या अडचणीत मनापासून कोणीच ऐकून घेतले नाही आणि मदत ही केली नाही. त्याची ऑफिस मधून निघण्याची वेळ झाली .विवेक शांतपणे उठून घरी निघून गेला. त्याला काही फरक पडला नाही शेखर अजून थांबला , अडचणीत आहे.
असेच नात्यात ही अनेकवला घडते. नवरा बायको मध्ये घडते. प्रियकर प्रेयसी यांच्यात ही घडते. भावंडांच्या मध्ये ही घडते. माझे खरे मी बरोबर असे म्हणून इतरांना बोलूच देत नाहीत.
एखाद्याने समोरच्याला कधीच बोलायची संधी दिली नसल्यास, त्याला त्याच्या अडचणीत मनापासून कोणीच ऐकून घेत नाही.
म्हणून आयुष्यात एकमेक खूप बोला. एकतर्फी संवाद नको. तर सुसंवाद असू द्या. कधी चुकलात तर चुकलो म्हणून कमी पडण्यात माफी मागण्यास कमी पडू नका. पण कायम पडती बाजू ही घेवू नका. तुम्हाला ही तुमचे मत आहे , अनुभव आहे , बोलण्याचा अधिकार आहे. आणि विचार करण्याची क्षमता आहे.
परिस्थिती चे तारतम्य आहे याची नक्की जाणीव करून द्या. माणूस आहोत. विचार करण्याची , बोलण्याची , ऐकण्याची , भावना व्यक्त करण्याची आपल्याला संधी लाभली आहे . तिचा योग्य वापर करा. समजून घेण्याचा प्रयत्न करा. स्वतः ला जसे बोलावे वाटत असते तसे दुसऱ्यांना ही वाटत असते. त्यांनाही बोलण्याची संधी द्या. अडचणीत एकमेकांना साथ द्या. त्या सोडविण्यााचा प्रयत्न करा. गुंता वाढविण्यापेक्षा सोडविण्याचा प्रयत्न करा. अपेक्षा ठेवली तर निराशा येणार त्यामुळे स्वीकार ही करण्याची तयारी ठेवा.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!
