समोरच्या व्यक्तीमध्ये बदल घडवून आणायचा तर बोलण कसं असावं?
काव्या धनंजय गगनग्रास
(समुपदेशक)
आपण अनेक माणसांमध्ये वावरत असतो. वेगवेगळी नाती निभावत असतो. मग ती जवळची असतील, औपचारिक असतील, मित्रपरीवार असेल. माणसं वेगळी, त्यांचे स्वभाव वेगळे. गरजेचं नाही प्रत्येक जण आपल्या मनाप्रमाणे वागेल. न सांगता आपल्याला पाहिजे त्या प्रमाणेच काम करेल. मोठ मोठ्या कंपनी मध्ये तर employees ना सांभाळणं, त्यांच्या कडून योग्य प्रकारे काम करून घेणं हे जबाबदारीच काम आहे. ज्याला योग्य ती कौशल्य पाहिजेत.
आपल्या मनात कितीही इच्छा असली तरी आपण कोणाला कंट्रोल करू शकत नाही. आपल्याला त्यांच्यावर प्रभाव टाकावा लागतो. ज्यासाठी काही कौशल्य वापरावी लागतात, काही strategy वापरावी लागते. आपण बरेचदा समोरच्याने अस वागावं, अस वागू नये हे सरळसोट एका शब्दात सांगून मोकळे होतो. पण फक्त बोलण आणि संवाद करण यात फरक आहे. संवाद हा दोन्ही बाजूनी असावा लागतो. त्याचप्रमाणे ते एक कौशल्य आहे. तुमचं बोलणं, तुमचा संवाद जर प्रभावी असेल तर त्याचा समोरच्यावर परिणाम होण्याची शक्यता जास्त असते.
त्यामुळे असा संवाद करताना, communication करताना काही पद्धती वापराव्या लागतात. अर्थात या एका दिवसात जमत नाहीत. त्याची आपल्या वागण्यातून जितकी प्रॅक्टिस होईल तितक्या चांगल्या त्या जमतात. अशीच एक पद्धत चांगल्या प्रकारे संवाद व्हावा, त्यातून समोरच्या व्यक्तीमध्ये काही बदल घडावा यासाठी वापरता येते.
“Change talk” ही motivational interviewing मधली एक पद्धत आहे. मोटिव्हेशन म्हणजे प्रेरणा. अशी ऊर्जा जी व्यक्तीला काहीतरी करण्यासाठी उद्युक्त करते. आता आपल्याला समोरच्या माणसाला त्यात काहीतरी बदल घडावा, तो त्याचा त्याने घडवून आणावा यासाठी प्रेरित करायचे आहे. त्यासाठी तसे बोलणे करायचे आहे. ते बोलणे म्हणजे “change talk”. बदल व्हावा यासाठी केलेलं बोलण.
आपण काय करतो तर समोरच्या माणसाने ती गोष्ट केली तर त्याचे काय फायदे होतील किंवा नाही केली तर त्याचे तोटे काय तिथे होतील इथपर्यंत बोलण करतो. पहिल्यापासून अस होत आलेले आहे. पालक आणि त्यांच्या मुलामध्ये हे अस बोलण जास्त होताना दिसत. उदा. तू अभ्यास केला ना तर तुला खाऊ मिळेल, काहीतरी गिफ्ट मिळेल आणि नाही केला तर काय? मस्त मार. आपण सर्व यातून गेलेलो आहोत. पण त्याचा कितपत प्रभाव पडतो? पडला तरी किती टिकतो? म्हणून आपल्या बोलण्यात बदल केला पाहिजे. म्हणून हा change talk. हे बोलण फायद्या तोट्याच्या पलीकडे असत. त्याच्या काही पायऱ्या आहेत.
• Disadvantages of status quo(परिस्थितीचे तोटे)
• Advantages of status quo (परिस्थितीचे फायदे)
• Ability to change(बदलाची क्षमता)
• Intention to change(बदलाचा हेतू)
यातील बदल करण्याबाबत असलेला हेतू आणि ते करण्याबद्दल असणारी क्षमता या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. प्रत्येक व्यक्तीमध्ये या असतात. आपल्याला त्या त्यांना बोलण्यातून दाखवून द्यायच्या आहेत.
उदा. आई त्याच्या मुलाला एकाच बॉक्समध्ये खेळणी नीट ठेवायला सांगत आहे तर तिने त्याला न ओरडता काहीस अस बोलण केल पाहिजे. विनय तू तर आज हॉल मध्ये खेळत बसलास, बर केलंस. तुला पण वाटत की तुझी खेळणी हरवू नयेत(intention). किती जपून वापरली आहेस(ability). पण जसं तू आता इथे एका ठिकाणी बसून खेळालास तशी तुझी खेळणी एकाच बॉक्समध्ये नीट ठेवशील का? म्हणजे ती सुरक्षित रहातील(advantage). हरवणार नाही(disadvantage) आणि तुला पुढच्या वेळी परत खेळायला मिळतील.
अश्या पद्धतीने समोरच्या माणसाशी बोलताना बदल करण्याची त्याची क्षमता आहे तसच त्याच्याही मनात चांगला हेतू आहे हे दाखवून दिलं तर ती शक्यता वाढते. आणि आपण काहीतरी करु शकतो ही जाणीव होण हीच मोठी गोष्ट आहे प्रेरित होण्यासाठी.
So, let’s talk by changing the talk!!!
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!
