Skip to content

समोरच्या व्यक्तीविषयी आपला अंदाज चुकला की खूप त्रास होतो.

समोरच्या व्यक्तीविषयी आपला अंदाज चुकला की खूप त्रास होतो.


पुजा सातपुते


आपल्या आयुष्यात आपण बऱ्याच लोकांच्या संपर्कात येतो. त्यांचं व्यक्तिमहत्व आपल्याला अट्ट्रॅक्ट करतं पण म्हणतात ना “दिसतं तसं नसतं म्हणूनच जग फस्त”.

काही जण दाखवतात वेगळं आणि वागतात वेगळं. सुरवातीला एवढं कळत नाही. हळू हळू जेव्हा ओळख व्हायला लागते तेव्हा खरं रूप समोर येतं आणि समोरच्या व्यक्तीविषयी आपला अंदाज चुकला असं वाटतं आणि त्याचा खूप त्रास होतो.

कधी कधी असंही होतं की परिस्थिती किव्हा कुठला वाईट प्रसंगामुळे ती व्यक्ती अशी वागते. काही जण चांगले असतात पण वेळ किव्हा वाईट अनुभव त्या व्यक्तीला तसं वागण्यास भाग पाढतं आणि आपला त्या व्यक्तीविषयी गैरसमज होतो. कुठेतरी मिसअंडरस्टँडिंग होते. नेगेटिव्ह विचार यायला लागतात, स्वतःवरचा कॉन्फिडन्स कमी होतो, आपण व्यक्ती ओळखण्यात चूक केली असतं वाटतं आणि दुसऱ्यांवर असलेला भरवसा कमी व्हायला लागतो.

हे सगळं होणं साहजिक आहे पण नको तो विचार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा जर आपण सरळ त्या व्यक्तीशी बोलून मोकळे झालो तर किती बरं होईल. यात आपला बराच वेळ वाचेल आणि विनाकारण आपलं डोकं आणि आयुष्य खराब नाही होणार. सत्य जर वेळेतच समोर आलं तर आपल्याला आपलं आयुष्य पुढे नेण्यास मदत होईल. जर त्या व्यक्तीचा मूळ स्वभाव फसवण्याचा असेल तर त्यात आपण काही करू शकत नाही. एक वाईट अनुभव समजून विसरून जायचं आणि त्यातनं शिकायचं. जर ती व्यक्ती मुळात चांगली असेल आणि परिस्थितीमुळे तशी वागली असेल तर बोलून त्यावर वेळीच तोडगा काढला तर त्रास होणार नाही आणि आयुष्यात पुढे जाण्याची संधी निर्माण होईल.

आयुष्यात बरेचदा आपला अंदाज चुकतो आणि त्या चुकातून आपण शिकतो. चूक झाली म्हणून डिप्रेस होऊन, त्रास करून घेऊन काही उपयोग नाही. त्या चुकातून तुम्ही काय शिकलात हे महत्वाचं आहे. त्या चुकातून तुम्ही तुमचं आयुष्य कसं घडवता हे महत्वाचं आहे. स्वतःला दोष देऊन किव्हा समोरच्या व्यक्तीला दोष देऊन तुमचं आयुष्य तुम्ही थांबवलं तर आयुष्यातल्या आनंदावर फुल्लस्टॉप लावल्यासारखं होईल. त्यापेक्षा अंदाज घ्या, खरं काय ते ऍक्सेप्ट करा आणि पुढे जा.

तुमचे जर कर्म चांगले असतील आणि मनापासून नातं जपण्याचा प्रयत्न केला असेल तर ते कधीच वाया जाणार नाही. प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे फळ मिळत असतं. तुमच्या बरोबर कोणी वाईट केलं असेल तर त्याला त्याचं फळ मिळणार. तुम्ही स्वतःला बदलू नका. तुमचे चांगले कर्म थांबवू नका, नेगेटिव्ह विचार करून स्वतःचं आयुष्य खराब करून घेऊ नका.

मान्य आहे हे बोलण्यात जेवढं सोपं आहे तेवढं करण्यात कठीण. पण आपण चुकलो म्हणून आपलं आयुष्य तर थांबवू शकत नाही ना. अंदाज चुकला तर संचिन तेंडुलकर पण झीरो वर आऊट झाले आहेत म्हणून त्यांनी क्रिकेट खेळणं बंद केलं का? उलटं चुकानमधून शिकून त्यांनी वर्ल्ड रेकॉर्ड बनवला.

अंदाज चुकतात, त्रास होतो, आयुष्य वळण घेतं, नवीन लोकं भेटतात, त्यांच्या कडून खूप काही चांगलं वाईट शिकायला मिळतं, आपलं आयुष्य बदलतं, आपल्यात कॉन्फिडन्स येतो, आपली स्वप्न पूर्ण होण्यास मदत होते, आपण दुसऱ्याला मदत करायला लागतो, त्यांना डिप्रेशन मधून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो आणि एक पॉसिटीव्हिटी पसरवतो.

आता विचार करा, तुमचा अंदाज चुकला म्हणून तुम्ही त्याचा जर नुसता त्रास करून घेतला तर  तुमची प्रगती थांबणार आणि तुमच्या बरोबर तुमच्या जवळच्या लोकांची पण प्रगती थांबणार. आपलं आयुष्य कसं जगायचं हे पूर्ण पणे आपल्या हातात आहे आणि ते खराब करण्यापेक्षा त्याला पॉसिटीव्ह टच दिलेला कधीही चांगलं! नाही का?

आपलं आयुष्य खूप सुंदर आहे आणि त्याला सुंदरच ठेवा. निसर्ग आपल्याला आपल्या आयुष्यात पॉसिटीव्ह बदल आणण्याची रोज  संधी देत असतो, त्याचा आदर करून फायदा घ्या आणि एक सुंदर एक्साम्पल सेट करा.


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!