समजून घेणारं कोणीच नसेल तर स्वतःलाच बळ देणाऱ्या या १० क्लृप्त्या नक्की वाचा.
हर्षदा पिंपळे
समजून घेणं खरं तर एका कलेप्रमाणे आहे. आणि प्रत्येक कलेमध्ये प्रत्येकजण पारंगत असतोच असं नाही. कुणाला केवळ रांगोळी काढायला छान जमतं तर कुणाला चित्रकला छान जमते.अगदी तसच समजून घेण्याची कला ही प्रत्येकालाच छान जमते असं नाही. कुणी समजून घेतं तर कुणी अजिबात समजून घेत नाही. आयुष्यात सगळ्यांनीच आपल्याला समजून घ्यावं असं आपल्याला वाटत नाही.पण कुणीतरी एकाने आपल्याला समजून घ्यावं असं नक्कीच वाटतं.अनेकदा आपण आपली माणसं आपली माणसं करत फिरत असतो.पण आपल्याला समजून घेणारी अशी आपली माणसं असतात तरी किती…?
हां आता कधी कधी आपणही यामध्ये मोडतोच.आपणही कधी कधी इतरांना समजून घेण्यास कमी पडतो.म्हणजे कधी कधी तसं पहायला गेलं तर आपल्या स्वतःला समजून घेणारं आपल्या जवळ कोणीच नसतं.प्रत्येकवेळी कोण समजून घेणारं नं…? प्रत्येकवेळी आपल्या मनातील गरळ कोण ऐकत बसणार…? इतका वेळ हल्ली कुणाकडे असेन असं वाटत नाही.आयुष्यात अनेक वाईट प्रसंग येतात.मनाला ते प्रसंग त्रस्त करून जातात. कधी कधी आपली बाजू चुकीची नसते हे आपल्याला इतरांना पटवून द्यायच असतं.अशावेळेस मनातील भावना कुणालातरी शेअर कराव्याशा वाटतात.पण कधी कधी नेमकं त्याचवेळी आपल्याला समजून घेणारं कोणीच नसतं.आपण खूप एकटे एकटे पडतो.
तर मग अशावेळेस आपणच आपल्याला समजून घ्यायला हवं नं..? दुसरं कुणी नसतानाही आपण स्वतःला समजून घेऊच शकतो नं..? मित्रांनो, आयुष्यात स्वतःसारखा दुसरा सुंदर सोबती कुणी नाही. वेळप्रसंगी आपणच आपला सोबती व्हायला हवं.
तर असच समजून घेणारं कोणीच नसेल तर स्वतःलाच बळ देणाऱ्या काही क्लृप्त्या आपण पाहूयात.
१)कितीही काहीही झालं तरी ‘आपल्यासाठी आपणच’ असतो हे कायम लक्षात ठेवणे.त्यामुळे स्वतःलाच स्वतःचा सुंदर सोबती बनवणे.
२)आपण इतरांना ज्याप्रकारे समजून घेतो त्याप्रकारे स्वतःला समजून घेण्याचा प्रयत्न करणे.इतरांसाठी /इतरांना समजून घेताना जसा जीव कळवळून येतो अगदी तसच स्वतःला समजून घेणे.
३)स्वतःला शोधण्याची हीच सुवर्णसंधी आहे असं समजून स्वतःला शोधायचा प्रयत्न करणे.स्वतःमधील दडलेले सुप्त गुण शोधणे. जेणेकरून स्वतःला जाणून घेता येईल, समजून घेता येईल.
४)स्वतःवर प्रेम करणे.स्वतःची काळजी घेणे. कारण जोपर्यंत आपण स्वतःवर प्रेम करत नाही, स्वतःची पुरेशी काळजी घेत नाही तोपर्यंत आपण स्वतःला व्यवस्थित समजून घेऊ शकत नाही.म्हणून सेल्फ केअर आणि सेल्फ लव हे मस्ट आहे.
५)स्वतःच मूल्यमापन करणे. स्वतःला समजून घ्यायच असेन तर स्वतःच मूल्यमापन होणं तितकच आवश्यक आहे. स्वतःच्या मूल्यमापन केल्यानंतर आपल्या बऱ्याच गोष्टी लक्षात येतील.
६)स्वतःकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहणे.सकारात्मक दृष्टिकोन असेन तर गोष्टी इझिली हाताळता येऊ शकतात.
७)स्वतःवर विश्वास ठेवणे. (आपण इतरांना समजून घेऊ शकतो तर स्वतःला का नाही…? हा प्रश्न एकदा स्वतःला विचारून पहा.)आणि कोणत्याही परिस्थितीत स्वतः स्वतःला निश्चितच समजून घेऊ शकतो हा विश्वास मनी बाळगणे.
८)ज्या कठीण गोष्टींना न डगमगता सामोरे गेला आहात त्या गोष्टी आठवून पहाणे. (जेणेकरून स्वतःच्या ताकदीची जाणीव नव्याने होईल.स्वतःमध्ये स्वतःला समजून घेण्याच नवं बळ मिळेल.)
९)काहीतरी प्रॉडक्टीव्ह करण्याचा प्रयत्न करणे. ज्यामधून समाधान आणि आनंद दोन्ही मिळेल. एक आत्मविश्वास निर्माण होईल.
१०)परिस्थिती बदलणार आहे का…? याचा विचार करून योग्य तो निर्णय घेणे.आणि शक्यतो मनःस्थिती बदलण्याचा प्रयत्न करणे.कारण परिस्थिती बदलत नसेल तर मनःस्थिती बदलवणं गरजेचं असतं.तेव्हाच परिस्थिती बदलायला सुरुवात होते.
कुणीच समजून घ्यायला नसलं म्हणून काय झालं….? नेहमी आपण दुसऱ्यांनाच समजून घेत रहायच का…? कधीतरी आपल्याला स्वतःलाही समजून घेता यायला हवं नं…?
स्वतःच स्वतःचा आधार व्हायला शिकायला हवं नं..?
स्वतःची ताकद आपणच ओळखायला हवी नं..?
त्याशिवाय पंखात बळ येणार तरी कसं…?
पहा,या काही प्रश्नांची उत्तरं शोधा. शांतपणे विचार करा.हळुहळू स्वतःला समजून घ्यायला शिका. कितीही काहीही झालं तरीही “नव्या उजेडाचा नवा सूर्य व्हायचय तुला ” (-unknown) असं स्वतःला निःक्षून सांगायला विसरू नका.
आनंदी रहा,उत्साही रहा…
कुणी नसलं म्हणून काय झालं.
स्वतःसाठी स्वतःच आहोत
हे लक्षात ठेवा….
नव्या उजेडाचा सूर्य
तुम्ही नव्याने पहा…!
मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

खुप छान आहे वाचताना लहानपणापासून आतापर्यंत च सगळं आयुष्य डोळ्यासमोर रुन गेलं इतकी सवय झाली कि आता असं वाटतं की फक्त शरीर आहे तरी कधी कधी सल येते संधी मिळाली कि बंद खोलीत खूप रडून घेतो
Best
He bolayLa sops She pratekshat Utaarvane kathin. Ahe ..
खूपचं सुंदर 👍👍👍