Skip to content

समाधानी आयुष्याचा मूलमंत्र काय?

समाधानी आयुष्याचा मूलमंत्र काय?


काव्या धनंजय गगनग्रास

(समुपदेशक)


आपल्या आयुष्यात समाधान कोणाला नको असत? सर्वांना ते हवं असत. आता ही गोष्ट आहे की प्रत्येकाचं समाधान वेगवेगळ्या गोष्टींवर अवलंबून असत. व्यक्तिपरत्वे ते बदलत जात.

पण असमाधानी राहायला मात्र कोणाला आवडत नाही. पण अस होत का? नाही. अशी बरीच लोकं असतात जी सर्व असून असमाधानी असतात. याउलट काही मात्र थोड थोडक असूनही खुश, समाधानी असतात. हा फरक पडतो कश्याने? काही नसताना आनंदी असणे व सर्व काही असूनही खिन्न वृत्ती, असमाधानी असण हे अस का होत?

परिस्थिती इथे खरच कारण ठरतं आहे का? तस असेल कमी गोष्टीत माणूस कसा समाधानी राहील? काय कारण आहे इथे? तर दृष्टी. माणसाची दृष्टी हा फरक निर्माण करते. म्हणून हा आनंद येतो आणि म्हणूनच ही असमाधानता येते.

लोक सर्व कमवायचा प्रयत्न करतात. जे होईल ते प्रयत्न करतात ज्यातून त्यांना वाटेल की हा माझ्याकडे सर्व आलंय आता मी खुश आहे. अगदी हा प्रयत्न आयुष्याच्या शेवटपर्यंत पण चालतो. पण यातून काही होत नाही. कारण हे लक्षात येत नाही की ही समधानता, तृप्ती आपल्याला बाहेरच्या गोष्टीतून मिळणार नाही. ती आपल्या आत आहे. आपल्या पाहण्यात आहे, आपल्या दृष्टिकोनात आहे.

हे समजलं की, आपण एकदा आपलं आत्मअवलोकन केल की समजेल की कसं आपण आता आपल्याकडे असलेल्या गोष्टींना कमी महत्त्व देतो. Cbt मध्ये याला “disqualifying the positive” असं म्हणतात. जी एक वैचारिक चूक आहे. माझ्याकडे two wheeler आहे पण कार हवी होती. सुंदर घर असून, घरात सर्व माणसं एकत्र आहेत तरी आलिशान फ्लॅट पाहिजे होता. ८०%मार्क्स आहेत पण अजून चार टक्के अजून हवे होते.

ही जी वृत्ती आहे ती आपल्याला असमाधानी करते. फक्त नाही त्याला जास्त महत्त्व द्यायचं जे आहे त्याला डावलून. आपण हा विचार करत नाही की अनेक जणांकडे हे पण नसत. त्या दृष्टीने विचार केला तर आपण समाधानी राहू शकतो.

म्हणून रोज दिवस संपल्यावर जसा काय नाही याचा विचार डोक्यात येतो तस काय काय आहे याचा देखील विचार करायचा. त्या गोष्टी लिहून काढायच्या. त्याबद्दल कृतज्ञ राहायचं, त्यालादेखील तितकच महत्व द्यायचं. ज्या गोष्टी नाहीत त्या प्रयत्न करून कष्ट करून, आपल्या क्षमता ओळखून मिळवायचा रस्ता आखायचा.

पण त्यासाठी आहे त्यात समाधानी राहायला शिकायचे. जे आहे त्याचा मनमुराद आनंद घेऊन. त्याचे आभार मानून. हाच असेल समाधानी आयुष्याचा मूलमंत्र.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!