Skip to content

एखाद्याचा साधा स्वभाव म्हणजे कमीपणा नसतो, तर त्याच्यावर जडलेले संस्कार असतात.

एखाद्याचा साधा स्वभाव म्हणजे कमीपणा नसतो, तर त्याच्यावर जडलेले संस्कार असतात.


टीम आपलं मानसशास्त्र


एखाद्याचा स्वभाव म्हणजे काय असते बरे ?? तो चांगला आहे , वाईट आहे. म्हणजेच काय तर तो कसा वागतो. एखादा खूप चालू आहे बरं ! एखादा फारच साधा स्वभाव असलेला आहे बरं! ही लेबल्स कशी काय लागली किंवा लावली जातात ?  जन्मजात तरी कोणी कसे आहे हे समजत नाही च ..

प्रत्येक व्यक्ती मध्ये काही गुण दोष हे असतात. राग, लोभ, मद , मोह , मत्सर ,माया हे सहा रिपु म्हणजे षड रिपु याचे प्रमाण कमी जास्त झाले की माणसाचा स्वभाव बदलत जातो.

लहान असताना प्रत्येक जण खूप निरागस , निस्वार्थी असतो. पण आजू बाजूचे लोक कसे वागतात, वातावरण , काही अंशी जन्मजात गुण , आनुवंशिकता , आणि येत जाणारे बरे वाईट अनुभव, त्याच्यावरचे संस्कार  असे विविध घटक स्वभाव घडवत असतात.

व. पु. काळे यांनी म्हंटले आहे की , कुठलाही माणूस कायमचा वाईट नसतो, फक्त तो आपल्याला हवं तसं  वागत नसतो.

एखाद्याचा स्वभाव खरेच खूप साधा असतो. तो अगदी सरळ असतो परंतु आपला दृष्टिकोन तिरकस असेल तर मात्र तो कितीही साधा असला तरी आपल्याला त्यात काही तरी खोट दिसणार किंवा दोष दिसणार .किंवा त्याला आपण चालू म्हणणार.

शिरीष अतिशय चांगल्या संस्कारातून वर आलेला. आई वडील , भाऊ वहिनी सगळ्यांना कायम मान देणारा, बायकोला अतिशय जपणारा ,  इतकेच काय स्वतची दोन मुले शिवाय दोन  भावांची दोन दोन म्हणजे ती चार आणि त्याची दोन अशी सहा मुले स्वतची आहेत असे समजून त्यांना सगळ्यांना समान शिकवण , अनेक गोष्टींचं ज्ञान , माहिती करून देणे , जे काही आनंदी क्षण , ट्रीप सगळे एकत्र धमाल मस्ती करत. प्रत्येकवेळी काही तरी क्रिएटिव्ह गोष्टी शिकवत असे. स्वतः अतिशय हुशार , क्रिएटिव्ह , दूरदृष्टीचा , या व्यवहारी जगात कसे वागाव हे चांगले समजलेला. आणि मुलांवर ही स्वतः सारखे सतत चांगले संस्कार घडवत होता. अनेक मार्मिक उदाहरणे आणि अनुभव अतिशय सोप्या पण त्यांना समजेल अशा भाषेत सांगत असे.

कधी चिडचिड नाही, कधी राग नाही , अतिशय सहनशील , कोणाला कधी फडकन बोलणार नाही.एखादा चिडला तरी त्यावर प्रत्युत्तर किंवा लगेच प्रतिसाद देत नसे.  अतिशय संयम ठेवून शांत राहत असे. हे त्याच्यावर जडलेले संस्कार होते म्हणून च शक्य होते. याचा अर्थ एखाद्याचा साधा स्वभाव म्हणजे कमीपणा नसतो. तर त्याच्यावर सभोवताल हूंन , मोठ्यांच्याकडून चांगले संस्कार जडलेले असतात.

शिरीष कष्टातून मोठ्या IT company मध्ये senior पदावर काम करत होता.  त्याचे कुटुंब विभक्त होते पण भाऊ त्याचे कुटुंब जवळच , आई वडील जवळच राहत होते त्यामुळे सगळ्यांचे जाणे येणे कायम होत असे . सगळे सण वार, वाढदिवस एकत्र साजरे करत. खूप छान सुरू होते सगळ्यांचे.

त्यात शिरीष ची भेट त्याची शालेय  मैत्रीण सुप्रिया तिच्याशी झाली. तेव्हा ही एकमेकांना दोघे आवडत असत. एव्हढे वर्षानंतर भेटल्यावर परत त्या आठवणी जाग्या झाल्या. हळूहळू भेटी वाढू लागल्या. त्यातून ते खूप जवळ येत गेले. सुप्रिया च लग्न झाले होते  , दोन मुलं ही होती पण तिच्या संसारात  प्रॉब्लेम्स जास्त होते. तिच्या नवऱ्याचे आणि तिचे कधीच पटत ही नव्हते आणि संबंध ही नव्हते. मुलं ही केवळ मेडिकल हेल्प मुळे झाली ते ही सुप्रिया चा अट्टाहास म्हणून . आर्थिक बाजू ही नवऱ्याची strong नव्हती. नाही शारीरिक दृष्ट्या सुख देत नव्हता.  सुप्रिया तरी ही अतिशय उत्साही , अनेक गोष्टी करण्याची आवड , याउलट तिच्या नवऱ्याला कोणतीच आवड नाही. कसे बसे संसार ढकलणे सुरू होते. केवळ मोठ्यांच्या धाका मूळ आणि सुप्रिया चे वडील heart patient असल्या मुळे ते विभक्त झाले नाहीत एवढेच काय ते.

अशात शिरीष आणि सुप्रिया चे अधुरे प्रेम परत सुरू झाले. सुप्रिया ला भरभरून बोलणे आवडत असे. आणि शिरीष तिची प्रत्येक गोष्ट शांतपणे ऐकत असे.  तिला सल्ला देत असे. समजून घेत असे. अशात संवादाची भुकेली z आपल्या माणसाच्या प्रेमाची भुकेली , एक खंबीर साथ हवी असलेली सुप्रिया हळूहळू शिरीष मध्ये जास्त गुंतत गेली. समजत होते त्याचा संसार आहे .मुले आहेत. पण तरी ही मन आणि शरीर या दोन्ही ने ती खूप गुंतली त्याच्यात. शिरीष ही प्रत्येक गोष्ट तिला सांगत असे. घरातले , ऑफिस मधल्या गोष्टी , अडचणी , आई बाबा त्यांची तब्येत अशावेळी सुप्रिया ही मदत करत असे.

शिरीष ने त्याचा संसार ही चांगला सांभाळून सुप्रिया ला समजून घेवून साथ दिली. खरे तर हे कायद्या विरूद्ध होते पण माणुसकी म्हणून शिरीष कुठे चुकला नव्हता. कारण हे तर त्याचे स्वतः चे प्रेम होते आणि त्यावर चा अन्याय सहन होत नव्हता त्याला. काही तरी करावे अशी प्रचंड इच्छा होती. पण पैसा हा पाहिजे ना सगळ्याला. तो दुर्दैवाने नव्हता त्याच्याकडे. जो होता त्यात बायको मुले त्यांचे घरखर्च , शिक्षण ,घर  कर्जाचे हप्ते यात खर्च होत तरी त्यातून तो सुप्रिया करिता ही खूप खर्च करत असे. तिच्या आवडी निवडी जपत असे. त्याने तिच्याशी लग्न केले म्हणजे ते आपसात ..मंगळसूत्र ही घातले. आपल्या आई वडिलांशी ओळख करून दिली. .ती त्यांच्या घरी येत जात असे. शिरीष वर संस्कार होते म्हणून त्याने ही गोष्ट ही लपविली नाही.

पण इकडे शिरिशच्या बायको ला ही सगळे समजले आणि तिने मात्र त्याच्याशी संबंध ठेवणे बंद केले. एका घरात राहत असून दोघांचे बोलणे फक्त मुलांच्या पुरते , कामापुरते , आणि पैसे , आर्थिक व्यवहारिक गोष्टी पुरते मर्यादित राहिले असतील तरी शिरीष घरचे वातावरण कधी खराब होवु देत नसे. मुलांना कशाची ही जाणीव नाही.

बायको खरे तर हक्काची .त्याने ठरविले असते तर जबरदस्ती ही करू शकला असता पण त्याच्यावर जडलेले संस्कार यामुळे तो तिच्या मनाविरुद्ध कोणती गोष्ट करत नसे. उलट सुट्टी दिवशी , बाहेर फिरायला , हॉटेल मध्ये कधी तीन चार दिवस बदल म्हणून ट्रीप ला मग सगळेच भाऊ वहिनी , सगळी मुले मिळून जात अस्त. तेवढ्या करिता मोठी गाडी सुधा घेतली शिरीष ने. पण तरी त्याची बायको त्याची विचारपूस ही करत नव्हती.

इकडे आई चा जीव शिरीष मध्ये गुंतलेला. त्याचे जेवणाचे हाल होतात, शरीर सुख ही नाही जे मिळेल ते कधी तरी सुप्रिया कडून . म्हणून त्या सुप्रिया ला ही सांगत त्याला सुख दे. पण बरेचवेळा तिला सांगत की तिच्यामुळे शिरीष आणि त्याच्या बायको मध्ये प्रोब्लेम सुरू झाले यावर पर्याय काय तर तू दूर राहा. विस्तव आणि लोणी याचे उदाहरण कायम देत. लोण्या जवळ विस्तव ठेवला तर लोणी पाघळणार च ना .. मग एखाद्याचा संसार का मोडावा. असे समजून ही सांगत.

शिरीष बायको मुलांच्या करिता किती करत असतो हे सुधा सांगत .. कधी म्हणत तो तुझ्या करिता काही करतो का नाही ना .. त्याच्या डोक्यात तरी येते का.. तू तरी का सोडते  त्याला तसेच .. त्याची बायको कसेही पैसे उधळत मग तू का नोकरी करते तू ही घे त्याच्याकडून ..
असे काही झाले की सुप्रिया खूप डिस्टर्ब होत असे. अरे खरेच की आपल्या करिता शिरीष चे काही कर्तव्य नाही का मग ? आपण नुसती नावाला बायको का ? तिला जर तो regular खर्चाला पैसे देतो तिचे सगळे खर्च उचलतो तर आपण काय केले .. अस विचार आले की एक होते ती हे मनात ठेवत नसे किंवा गोड बोलून तिला कधी असे काढणे जमत नसे. उलट मग शिरीष आणि सुप्रिया त्यांच्यात यावरून कायम वाद होत.

तरी ही शिरीष शांत राहत होता. जरी सुप्रिया कायद्याने , समाजाने बायको नव्हती तरी त्याने तिच्या अशा वाद घालण्यावरून तिला ही कधी अंतर दिले नाही. कायम तिला शांत करत असे. मग तिच्याही गरजा समजून त्या पूर्ण करत असे.

असे जेव्हा वारंवार घडू लगले तेव्हा शिरीष ला त्यातून मार्ग काढणे गरजेचे होते. त्याचा साधा स्वभाव म्हणजे कमीपणा घेणे नव्हते. तो  सरळ परदेशी निघून गेला.  तिकडून ही तो सगळ्यांना कॉन्टॅक्ट करत होता.  सगळे स्वतः करत होता. बाहेरून सामान घेवून येणे , स्वैपाक , भांडी , धुणे घर स्वच्छता आणि ऑफिस काम सगळे .  स्वतः सगळे त्याग करून गेला , त्रास सहन करत होता याचे कारण काय तर त्याच्यावर जडलेले संस्कार.

तिथे ही एक जॉब गेला तेव्हा त्याने सुप्रियाला कल्पना दिली. तेव्हा खूप डिस्टर्ब होता तो. दारू ही प्रसंगी. तेव्हा सुप्रियाने खूप चांगली साथ दिली. आई बाबांना ही थोडी कल्पना दिली जॉब विषयी.  आई ना सांगितले की निदान अशा वेळी तरी शिरीशच्या बायकोची त्याला साथ पाहिजे. तिने विचारपूस केली पाहिजे. त्याचे मानसिक स्वास्थ्य सांभाळले पाहिजे. तो काही करून तिकडे राहून घरी पैसे पाठवत होता. तिच्या आधाराची गरज आहे.

शिरीष ची आई सुप्रिया ला म्हणाली ही की ती समजावेल त्याच्या बायकोला .दोन दिवस राहायला जावून सगळे सुधारेल. पण तू जवळ असलीस तू संपर्कात असलीस की परत त्याला. तुझ्याकडे ही ओढा असेल. त्यामुळे शेवटी सुप्रिया म्हणाली ठिक आहे मी दूर राहते. त्यांचे सगळ्यांचे ,तुमचं जर यातून चांगले होणार असेल तर मी कायमची दूर राहते. पण मला विश्वास द्या की त्यांचे दोघांचे  तुम्ही परत बोलणे आणि पहिल्यासारखे नातं करण्यास प्रयत्न कराल.  त्याची आई हो म्हणाली.

शेवटी या प्रत्येक घटनेत शिरिष्चा साधा स्वभाव किंवा सुप्रिया चा साधा स्वभाव पडती बाजू घेणे किंवा काही न बोलता दूर निघून जाणे. मग शिरीष ची बायको ही तिने ही तर तेच केले होते ना.. की परिस्थितीनुसार तिच्या साध्या स्वभाव किंवा त्याच्या आईचा ही साधा स्वभाव की प्रत्येकाला जपणे. आई म्हणून तिला ही सगळ्या गोष्टीचा त्रास होत होता ना !! पण. तरी ही  तिने कधी कोणाला दोष दिला नाही. कधी  शिरीष वर चिडली नाही ,  कधी वाद घातले नाहीत.  तर कधी सुप्रिया घरी आली तरी जेवल्याशिवाय कधी पाठविले नाही. तिला ही मुली समान वागवत होती कायम. तर कधी शिरिष्याच्या बायको वर चिडली नाही , भांडली नाही.  या सगळ्यांचेच प्रत्येकाच्या परीने बरोबर होते. प्रत्येकाचा साधा स्वभाव यातून दिसतो आता परिस्थितीनुरूप त्यात सुप्रिया च कुठ बसत नव्हती म्हणून सुप्रिया ने ही दूर राहण्याचा निर्णय घेतला ना .. तिच्या जागी दुसरी कोणी असती तर ती कोणत्या ही थरा पर्यंत गेली असती. म्हणजेच हा साधा म्हणजे कमीपणा नसतो, तर  हे शिरीष , त्याची आई , त्याची बायको आणि सुप्रिया त्याच्यावर जडलेले संस्कार च तर होते. आणि त्या संस्कारातून च प्रत्येकाने मर्यादा , कंट्रोल आणि नातं टिकवून ठेवण्याचा तर प्रसंगी दूर होण्याचा ही निर्णय घेतला होता ना ??  परिस्थिती ही कोणावर ही कशी येते पण त्यातून मार्ग काढणे आणि आपल्या लोकांना जपणे . हे संस्कारच की.

म्हणून कायम लक्षात घ्या की , एखाद्याचा साधा स्वभाव म्हणजे कमीपणा नसतो, तर त्याच्यावर जडलेले संस्कार असतात.अनेक घरात कधी पुरुष तर कधी स्त्री हे त्यांच्या सध्या स्वभावामुळे शांत राहत असतात. एक कोणी तरी पडती बाजू घेत असते. एखाद्याची चूक नसेल तरी माफी मागून पुढे चक्र चालू राहते. यात कमीपणा नसतो तर सामंजस्य असते. त्यांचे संस्कार असतात म्हणूनच.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

2 thoughts on “एखाद्याचा साधा स्वभाव म्हणजे कमीपणा नसतो, तर त्याच्यावर जडलेले संस्कार असतात.”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!