Skip to content

रोज न बोलल्याने एखादं नातं संपत असेल तर ते नातं संपलेलच बरं! 

रोज न बोलल्याने एखादं नातं संपत असेल तर ते नातं संपलेलच बरं!


हर्षदा पिंपळे


“Communication is the lifeline of any relationship.” –

Elezabeth Borgurate

पहा ,इथे कम्युनिकेशनला नात्यांची लाईफलाईन म्हंटलं आहे.आणि त्यात नाकारण्यासारखं काहीही नाही. जे काही आहे ते अगदी योग्य आणि खरं आहे. जर कुठल्याही नात्यात कम्युनिकेशनच नसेल तर ते नातं किती काळ जिवंत राहू शकतं याची शाश्वती सहजासहजी देता येणं अशक्य आहे. मुळातच संवादाला नात्यांचा आत्मा म्हणून संबोधलं जातं. आणि हा आत्माच जर हरवला तर नाती जिवंत तरी कशी राहणार ?

नाती जितकी सुंदर असतात तितकीच कधी कधी ती त्याच्या विरूद्धही असतात.आता नातं म्हंटलं की कधी कधी वादविवाद हे होणारच.जसं एखाद्याचं नातं अगदी निखळ आणि सुंदर असतं तसचं एखाद्याचं नातं तितकच काटेरी, नकोनकोसं असणारं असतं.आता जिथे संवाद असेल त्या नात्याची गोष्टच वेगळी.पण जिथे संवादच नसेल त्या नात्याचं करायचं तरी काय ?

मित्रांनो,

रोज न बोलल्याने एखादं नातं संपत असेल तर ते नातं संपलेलच बरं! खरचं असं काही असतं का हो ? रोज न बोलल्याने एखादं नातं संपतं का ?आणि जर ते संपत असेल तर ते संपायलाच हवं हा अट्टाहासही गरजेचाच का ?

नक्कीच कुणीतरी यावर सकारात्मक उत्तर देईल आणि कुणीतरी नकारात्मक. अर्थात दोन माणसांची उत्तरं ही नक्कीच वेगळी असू शकतात. आणि ज्याच्या त्याच्या जागी जो तो बरोबरही असू शकतो. यात काही वादच नाही.

पण अगदी प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर रोज न बोलण्याने एखादं नातं सहजासहजी संपत नाही. आणि तसं होत असेल तर ते संपायलाच हवं हेही काही फारसं योग्य नाही. कारण,मुळातच एखादं नातं हे तितक्याच दृढ विश्वासावर, समजूतदारपणावर उभं असतं.रोज बोलणं होत नाही म्हणून काही नाती कधीच संपत नाही. आणि काही जणांना तीच नाती संपावी असही वाटत नाही.(काही अपवाद वगळता.)उलट काही नाती ही लांबूनच सुंदररित्या जपली जातात. रोज न बोलण्याने त्यांच्यात काही कटूता निर्माण होत नाही. उलट अशा नात्यांमध्ये एकमेकांविषयी प्रचंड ओढ असते.एकमेकांना भेटण्याची, एकमेकांशी बोलण्याची.

एका सुंदर नात्यावर पु. ल. देशपांडे यांनी लिहिलय की,

मैत्री एक सोपी व्याख्या आहे.

रोज आठवण यावी असं काही नाही,

रोज भेट व्हावी असं काही नाही,

एवढंच कशाला रोज बोलणं व्हावं

असंही काहीच नाही;

पण मी तुला विसरणार नाही ही झाली खात्री

आणि तुला याची जाणीव असणं ही झाली मैत्री.’

शेवटी काय हो भेटी नाही झाल्या

तरी गाठी बसणं महत्त्वाचं.

ज्यांनी हे जाणलं त्यांनी माणसातलं माणूसपण जाणलं…. ‘ !

तर मैत्रीच्या नात्यावर पु.ल.देशपांडे यांनी खरच खूप सुंदर बोललय. आता हे जरी मैत्रीविषयी असलं तरी हे सगळ्या नात्यांनाही तितकच समांतर आहे.फक्त गरज असते ती त्या Understanding ची.ते नसेल तर रोज बोलणारी नातीही तुटतातच की.रोज बोलणारी नातीही कधी ना कधी संपतातच नं ? मग रोज न बोलूनही एखादं नातं टिकून असेल तर त्यात वाईट असं काहीच नाही. खरं तर याहून सुंदर काहीच नाही.

रोज न बोलणं म्हणजे कायमचा संवाद थांबणं असा तर त्याचा अर्थ होत नाही.हल्ली तर जीवनशैली इतकी बदलली आहे की,कोण कधी जागेवर असतं आणि कधी नाही याचा काही अंदाजच बांधता येत नाही. त्यामुळेच एकमेकांना समजून घेणं आवश्यक आहे. आधीचा काळ आठवून पहा,आयुष्य कसं होतं ? खरं तर आत्ता कम्युनिकेशन करण्याची साधनं आपल्यासाठी उपलब्ध आहेत.जेव्हा हवं तेव्हा आपण एखाद्याशी कम्युनिकेशन करू शकतो.

पण आधी तर पत्रातून संवाद घडायचा.पत्रातूनच बोलणं व्हायचं.एक पत्र काय तीस सेकंदात पोहोचणारं मुळीच नसायचं.पण तेव्हा तरीही आतुरतेने वाट पाहणारी नाती होती नं ? पत्र पोहोचणार आणि त्या पत्राला उत्तर म्हणून पुन्हा दुसरं पत्र असा कितीतरी वेळ जायचा. पण एकमेकांविषयी तेव्हा तितकीच ओढ असायची. प्रेम ,जिव्हाळा सगळं तसच असायचं.पत्रातून बोलणं व्हायचं तरी नाती जिवंत रहायची ! ती संपावी असं कुणाला वाटायचं नाही.

मग आत्ताच ही अशी शंका कशासाठी ?

केवळ त्या पत्राचे दिवस एकदा डोळ्यासमोर आणा.आणि [‘रोज न बोलल्याने एखादं नातं संपत असेल तर ते नातं संपलेलच बरं!’ ] [‘काही नात्यांना खरच काही अर्थ नसेल तर ते संपलं तरी चालतं.कारण,बोलणारी नातीही नेहमीच तितकीच चांगली, विश्वासू असतात असं नाही.]या गोष्टींचा नक्की विचार करा.

नातं संपावं असा विचार करण्यापेक्षा ते जपलं कसं जाईल याचा विचार केला तर जास्त बेटर आहे.नाती फुलण्यासाठी असावी,जपण्यासाठी असावी संपण्यासाठी नाही !

आणि हो,कम्युनिकेशन असणं आणि नसणं महत्वाचं नसतं.ते balancing असणं आवश्यक असतं.

विचार करा….आणि सुदृढ असणारी नाती जपण्याचा प्रयत्न करा.मग त्यात रोज बोलणं नसलं तरीही चालेल.


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

3 thoughts on “रोज न बोलल्याने एखादं नातं संपत असेल तर ते नातं संपलेलच बरं! ”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!