Skip to content

पोसिटीव्ह नव्हे तर ‘रिअलिस्टिक’ विचार करायला लावणारी REBT थेरॅपी समजून घेऊया.

पोसिटीव्ह नव्हे तर ‘रिअलिस्टिक’ विचार करायला लावणारी REBT थेरॅपी समजून घेऊया.


काव्या गगनग्रास

(समुपदेशक)


Rational emotive behaviour therapy म्हणजेच विवेकनिष्ठ उपचार पद्धती ही CBT tradition मधील म्हणजेच बोधनिक वर्तन उपचार पद्धती मधील सर्वात पहिली उपचार पद्धती आहे. मानसशास्त्रज्ञ अल्बर्ट एलिस हा या उपचार पद्धतीचा जनक आहे.

एलिस ने 1955 ला सर्वात पहिल्यांदा ही उपचार पद्धती उदयास आणली. 1961 मध्ये त्याने याचे नाव बदलून rational emotive therapy असे ठेवले व 1993 मध्ये rational emotive behaviour therapy असे नाव प्रचलित झाले. सध्याचे rebt चे प्रचलित नाव हे recbt आहे.

ही उपचारपद्धती व्यक्तीच्या विचार, भावना आणि वर्तन यांच्यावर भर देते. अनेकदा आपल्या आयुष्यात जे काही होत असत, जो त्रास आपल्याला होत असतो त्याचं खापर आपण दुसऱ्यावर किंवा परिस्थितीवर फोडून मोकळे होतो.

ती परिस्थिती जबाबदार होती. त्याच्यामुळे मला असं करणं भाग पडलं अस म्हटलं जात. पण आपण जे काही वागतो प्रतिक्रिया देतो त्याला ती परिस्थिती जबाबदार नसून अजून काहीतरी आहे जे मध्यस्थी करत, जबाबदार असत. ती गोष्ट कोणती यावर ही उपचार पद्धती प्रकाश टाकते. ते या थेरपीच तत्वज्ञान आहे. ज्याला ABC model असं म्हटलं जातं. ते काय ते पाहू,

A- adversities, activating events(त्रासदायक प्रसंग, घटना)
B- beliefs, both rational and irrational(धारणा/अर्थ/विचार, तार्किक आणि अतार्किक)
C- consequences(निष्पत्ती/प्रतिक्रिया/परिणाम)

वर म्हटल्याप्रमाणे जेव्हा एखादी घटना घडते यावर प्रतिक्रिया देतो मग ती कोणत्याही स्वरूपात असू शकते जसे की आपलं वर्तन, व्यक्त केलेली भावना त्यावर परत येणारे विचार काहीही. यामध्ये आपल्याला असं वाटतं की तो प्रसंग कारणीभूत आहे. उदाहरणार्थ, दुसरा मला वाईट बोलला म्हणून मी रागावलो. पण असं नाही. हेच ही उपचार पद्धती सांगते.

म्हणजेच एखादा प्रसंग घडतो आणि त्या प्रसंगाबद्दल आपण जो अर्थ लावतो ते मूल्यांकन करतो त्यानुसार ती प्रतिक्रिया येते किंवा ते परिणाम घडतात. इथे त्या प्रसंगाचा लावलेला अर्थ, त्याच केलेले मूल्यांकन म्हणजेच आपल्या अतार्किक धारणा, अतार्किक विचार, irrational beliefs.

आता धारणा म्हणजेच irrational beliefs कोणते? तर ते चार प्रकारचे आहेत.
1.Demand- मागणी/अट्टाहास/ आग्रह
2.Awfulizing – भयानकता
3.Frustration intolerance – त्रासाची असहनशीलता
4.Label – शिक्का (स्वतःवर किंवा दुसऱ्यावर)

या चार अतार्किक धारणांच्या आधारे आपण प्रतिक्रिया देतो ज्यातून अडथळे निर्माण होतात. उदा. सामोरचा माणूस मला चुकीचे बोलला तर तो अस कसं बोलला, त्याने बोलायला नको होत असं वाटणं स्वाभाविक आहे पण त्याने अस बोललच नाही पाहिजे हा झाला आग्रह तो अस बोलला ही गोष्ट खूप वाईट, भयंकर आहे ही झाली भयानकता त्याचं हे बोलण मी सहनच करू शकत नाही ही झाली त्रासाची असहनशीलता आणि तो अस बोलला याचा अर्थ मीच मूर्ख आहे किंवा तो माणूस नालायक आहे हे झालं शिक्का मारणं.

जेव्हा या चार धारणांपैकी एक आहे एक काहीतरी आपल्या डोक्यात येत तेव्हा आपण त्यानुसार वागतो. जसे की राग येणे, त्याला काहीतरी बोलणे, स्वतः वाईट वाटून घेणे. इथे समजा जरी त्याने अस बोलायला नको होत पण तो बोलला आहे तरी ही काही फार भयंकर गोष्ट नाही अस जर आपल्याला वाटलं असा जर आपण त्याचा अर्थ काढला तर कदाचित आपली प्रतिक्रिया बदलली असती जी जास्त वास्तववादी असू शकते.

म्हणून ही उपचार पद्धती असं सांगते जर आपल्याला आपला त्रास कमी करायचा असेल तर आपल्या या अतार्किक धारणा बदलणे आवश्यक आहे. हे विचार बदलण्याच्या पद्धती, तंत्र यामध्ये दिली आहे.
सगळ्यात आधी व्यक्तीला परिस्थिती जबाबदार नसून त्याचे चुकीचे विचार, त्याने लावलेला अर्थ जबाबदार आहे याची जाणीव करून द्यावी लागते. ज्याला insight development असं म्हणतात. यामध्ये 100people anology वापरली जाते.

उदा. समोरचा माणूस बोलला म्हणून मला राग आला.
Anology: या प्रसंगात तुमच्यासारखी शंभर जण असतील तर प्रत्येकाला काय वाटलं असतं?

प्रत्येकाला सारखं वाटलं असत का? नाही? का नाही? कारण प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत वेगळी आहे. इथे व्यक्ती ला जाणीव होते की आपले विचार कुठेतरी चुकले आहेत ते बदलण्याची गरज आहे. हे चुकीचे विचार बदलण्यासाठी अनेक पद्धती वापरल्या जातात.

ज्यामध्ये socratic questioning चा समावेश असतो. यामध्ये विविध प्रश्नांच्या आधारे या चुकीच्या विचारांना dispute म्हणजेच challenge केलं जातं आणि नवीन वास्तववादी तर्कशुद्ध, उपयोगी असे विचार दिले जातात. ही उपचार पद्धती विचार, वर्तन, भावना यावर भर देते. त्यामुळे तिन्ही गोष्टी सुधारण्यासाठी व्यक्तीला मदत केली जाते.

विचार बदलले जातात त्यासाठी काही होमवर्क दिला जातो जसे की काही coping cards. भावनांची तीव्रता कमी केली जाते. त्यांना healthy केल जात. वर्तन सुधारण्यासाठी स्किल डेव्हलपमेंट शिकवल जात. विविध स्किल शिकवली जातात.

या उपचार पद्धतीचे ध्येय हे व्यक्तीमध्ये तात्पुरत्या स्वरूपात फक्त त्याची त्रासातून सुटका करणं नसून त त्याच्यामध्ये असा बदल घडवणे जो त्याला दीर्घकालीन फायद्याचा ठरेल हे आहे. त्यासाठी यामध्ये काही महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. त्या म्हणजे विनाअट स्वीकार, unconditional acceptance.
कोणाचा स्वीकार करायचा?

१. स्वतःचा स्वीकार: आपल्याकडून जरी चुका झाल्या तरी आपण एक माणूस आहोत हा विचार करून स्वतःला आपण नक्की स्वीकारू शकतो. यातून आपण दोष न देता स्वतःच्या चुकीची जबाबदारी घेऊन ती चूक सुधारू शकतो.

२. दुसऱ्याचा स्वीकार: आपल्याकडून जश्या चुका होऊ शकतात असा समोरचा व्यक्ती पण चुकू शकतो हा विचार करून त्याला पण विनाअट स्वीकारता आलं पाहिजे. जेणे करुन आपण त्या व्यक्तीला मदत करू शकतो.

३. परिस्थितीचा स्वीकार: परिस्थिती जरी त्रासदायक असेल तरी ते भयंकर नाही आपण त्यातून मार्ग काढू शकतो हे लक्षात घेऊन आपण त्या परिस्थितीत पासून पळ न काढता त्याचा स्वीकार केला पाहिजे. तर त्यातून बाहेर पडू शकतो.

अशा पद्धतीने हे उपचार पद्धती आपला unconditional acceptance वाढवायला मदत करते. ही उपचार पद्धती चिंता, नैराश्य, ocd सारख्या विविध आजारांवर प्रभावी ठरते. तसेच ही उपचारपद्धती व्यक्तीला सकारात्मक नाही तर वास्तववादी दृष्टिकोन जो दीर्घकालीन फायद्याचा ठरेल तो विकसित करायला मदत करते.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

6 thoughts on “पोसिटीव्ह नव्हे तर ‘रिअलिस्टिक’ विचार करायला लावणारी REBT थेरॅपी समजून घेऊया.”

  1. खरेच आहे असे प्रसंग आणि विचार येत असतात सगळ्यांना नेहमीच . खुप छान वाटला वाचून 👌👍

  2. Jagruti rajput 9067517215 ha maza no ahe. You can msg mi. We will discuss your problem

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!