Skip to content

त्या पुरुषाने कधीही स्पर्श न केलेली बाई आणि त्याची मानसिकता !!

त्या पुरुषाने कधीही स्पर्श न केलेली बाई आणि त्याची मानसिकता !!


अपर्णा कुलकर्णी


विशाल नुकताच शिक्षण पूर्ण करून घरी परतला होता. घरी आल्यावर काहीच दिवसात त्याने वडिलांचा फूड प्रॉडक्ट व्यवसाय जॉईन केला होता. विशाल खूप हुशार आणि समंजस. घरात एकुलता एक तरीही लाडा कोडात न वाढवता मिस्टर दीक्षितांनी त्याला चारचौघाप्रमाणे वाढवले होते. मुलांच्या गुरुकुलात शिकून तो घरी आला पण आराम करण्यात वेळ वाया न घालवता त्याने सरळ काम सुरू केले होते. त्याच्या आईचा म्हणजेच शारदा ताईंचा तो लाडका होता.

त्याने काम सांभाळून पाच सहा महिने लोटले आणि त्याच्या कामाची हातोटी पाहून दीक्षित त्याच्यावर खूप खुश होते. ऑफिसमध्ये म्हणजेच त्याच्या स्वतःच्या कंपनीत बरेच कामगार काम करत होते पण विशाल लेडीज स्टाफ सोबत खूपच अंतर ठेवून वागत असे. जेवढ्यास तेवढे बोलत असे. मिस्टर दिक्षितांना ही गोष्ट जरा खटकली होती पण त्याचे आजवरचे सगळे शिक्षण मुलांच्या गुरुकुल मधे झाल्याने तसेच घरात ही त्याला कोणी बहीण नसल्याने तो असा वागत असेल म्हणून त्यांनी दुर्लक्ष केले होते.

आता शारदा ताई मात्र मिस्टर दीक्षितांच्या खूप मागे लागल्या होत्या, का तर त्यांना आता सून हवी होती. मुलाचे शिक्षण झाले, कामाचा व्याप सांभाळत आहे तर उशीर का करायचा ?? वेळच्या वेळी गोष्टी झालेल्या बऱ्या म्हणून त्या सतत हट्ट करत होत्या. तसे पाहिले तर विशाल होताच दिसायला सुंदर. शिवाय श्रीमंत आणि एकुलता एक त्यामुळे खूप स्थळे सांगून येत होते ही. पण मिस्टर दीक्षितांनी एकदा विशालशी बोलून निर्णय घेण्याचे ठरवले. आजच ते विशाल सोबत बोलणार म्हणून शारदा ताई खुशीत होत्या.

विशाल घरी येऊन त्याच्या रूम मध्ये पुस्तक वाचत बसलेला असताना, दारात मिस्टर दीक्षित येऊन म्हणाले,काय करताय चिरंजीव येऊ का आत ?? विशाल लगेच नम्रपणे उभे राहून म्हणाला, काय बाबा विचारता काय ?? या ना आत. मिस्टर दीक्षित इकडच्या तिकडच्या गप्पा मारून म्हणाले, विशाल तुला एक विचारू का ?? नाही म्हणजे तू तुझ शिक्षण पूर्ण केलास आणि व्यवसाय पण उत्तम करतो आहेस. तर तुझ्या लग्नाचा विचार मनात येत आहे. तू कुठे कुणाच्या प्रेमात पडला आहेस का?? किंवा कोणी मुलगी तुला आवडते का ?? तस काही मनात असेल तर सांग म्हणजे तसे पुढे जायला बरे.

असे काहीच नाही बाबा,माझ्या आयुष्यात आई सोडली तर कोणीही स्त्री व्यक्ती म्हणून नाहीच. तसा विचार पण मनात कधी आला नाही. पण लग्न ?? इतक्यात नको बाबा मी अजून यासाठी तयार नाही विशाल म्हणाला. तसे मिस्टर दीक्षित हसून म्हणाले, अरे मांडवात उभे असतानाही आपण लग्नासाठी तयार नसतोच. पण पाण्यात पडला की जमत आपोआप पोहायला. तू ही पोहशिल खात्री आहे मला.

बघता बघता दीक्षितांनी मुलगी शोधली सुधा. पण त्यांनी मुलगी साधारण परिस्थिती असलेली शोधली कारण त्यांना श्रीमंती पाहून पैश्याच्या हव्यासापोटी कोणी मोठ्या घरची मुलगी नको होती तर विशाल आणि घराला सांभाळून घेणारी, नाते जपणारी, नात्याची समज असणारी मुलगी हवी होती. दाखवण्याचा कार्यक्रम झाला आणि मिस्टर दीक्षितांच्या म्हणण्या मुळे विशाल आणि सुरूची दोघेही एकांतात बोलायला गेले.

विशाल त्याच्या आयुष्यात प्रथमच असा कुठल्या तरी मुलीच्या सोबत एका खोलीत बसला होता. त्याला सतत येणारा घाम पाहून सुरूची शांतता भंग करत म्हणाली, तुमची तब्येत बरी नाही का ?? पण खरतर मुलीला पाहून त्याची अशी अवस्था झाली होती हे विशाल तिला सांगू शकला नाही. कसाबसा तो काहीतरी चार शब्द बोलला आणि त्याने डोक्यावरचं ओझं खांद्यावर केलं. सुरूची दिसायला सुंदर होती. विशाल इतकी देखणी नव्हती पण नाकी डोळी नीटस, कमनीय बांधा, लांब केस. तिच सौंदर्य विशालला भुरळ टाकून गेलं होत खर पण आजवर मुलींशी कसलाही न आलेला संपर्क यामुळे तो बिथरला होता.

बघता बघता दोघांचे लग्न झाले आणि सत्यनारायणची पूजा झाल्यावर सुरूचीला विशालच्या खोलीत पाठवण्यात आले. सुरुची खोलीत आली तिने विशाल समोर दुधाचा ग्लास धरला, तो घेताना सुरूचीच्या बोटांचा स्पर्श विशाल ला झाला तसे तो मनातून घाबरला. सुरुची मात्र गोड लाजली, तिला असे लाजताना बघून विशाल अजुनच बिथरला. काय करावे ते त्याला समजेना शेवटी तब्येत बरी नसल्याचे
खोटे कारण सांगून तो बेडच्या एका बाजूला झोपला आणि सुरूची पण एका बाजूला झोपी गेली.

काही दिवस असेच निघून गेले रोज कोणत्या ना कोणत्या कारणाने विशाल सुरुचीला टाळून वेळ मारून नेत होता. एकदा सुरूची कपाटावरचे सामान काढायला खुर्चीवर चढली पण तिचा तोल गेला आणि ती पडणार तेवढ्यात विशालने तिच्या कमरेत हात घालून तिला जवळ ओढून घेतले. तेंव्हा दोघेही एकमेकांच्या खूपच जवळ होते.

सूरूचीला असे हात लावणे त्याला खूप चुकीचे वाटले आणि तिथून जाऊ लागला, तेवढ्यात सुरूचीने त्याचा हात धरून त्याला थांबवले आणि त्याच्या अशा दूर पाळण्याचे कारण विचारले. सुरुवातीला विशालने आढेवेढे घेतले पण नंतर माहेरी निघून जाइन म्हटल्यावर त्याने सगळे काही पटकन खरे सांगितले. विशालला मुलींची भीती नाही वाटत पण लहानपणापासून माझ्या आयुष्यात मुलगी नसल्याने अशी गडबड झाली आहे हे सुरुचीच्या लगेच लक्षात आले.

ती दुसऱ्या दिवशी सरळ एका कौन्सिलिंग सेंटर मध्ये विशालला घेऊन आली. तिथे त्यांनी खूपच चांगल्या प्रकारे विशालची मानसिकता ओळखून त्याला कंफर्टेबल केले. सुरुची ही तुझी बायको आहे आणि या नात्यातच या गोष्टी किती स्वाभाविक आणि गरजेच्या आहेत डॉक्टरांनी नीट समजावून सांगितले.

मुलींच्या आणि मुलांच्या शरीरातील फरक, प्रत्येक अवयवाचे महत्व त्याचे कार्य आणि त्याचे होणारे परिणाम तसेच फायदे तोटे सगळे विशाल ने नीट समजून घेतले. काही व्हिडिओ पाहिले. कोणतेही पाऊल उचलण्या आधी विशालने सुरूची सोबत छान मैत्री केली आणि पुढे नवरा बायकोचे नाते निर्माण झाले. त्यामुळे खऱ्या अर्थाने त्यांच्या सुखी संसाराची सुरुवात झाली.


मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!