Skip to content

असे अनेक पुरुष आहेत, जे स्त्रियांचं मन अजूनही जपतात.

असे अनेक पुरुष आहेत, जे स्त्रियांचं मन अजूनही जपतात.


मयुरी महाजन


एकमेकांना बघून एकमेकांच्या डोळ्यात व्यक्त होत जाणारं… प्रेम जेव्हा एका नात्याच्या स्वरूपात वावरत, तेव्हा खरंच ते भावनेपासून सुरू होऊन भावनेपर्यंतच येऊन थांबलेले असतं, मग त्यात त्यांना आवडतं म्हणून आज हे बनवायचं ,त्यांना असं आवडतं म्हणून तसंच नटायचं त्यांच्या अपेक्षा आहेत, म्हणून त्याच पद्धतीने जगण्याची रीत ठेवायची, असे एक ना अनेक सवाल बाई स्वतःच निर्माण करून त्या गोष्टीला स्वतःकडून दुजारा देत असते,

एकमेकाच्या आनंदासाठी एकमेकांना काहीतरी आवडतं, म्हणून एखादी गोष्ट करायला घेणे यात गैर काहीच नाही, परंतु स्त्री जातीच्या जगण्याच्या पद्धती आणि जगण्याची बंधन याला काळानुरूप समाजाने म्हणा किंवा कुटुंबाने आणि इतकेच काय जन्मदात्या आई-वडिलांनी सुद्धा लहानाचे मोठे करताना हे धडे दिलेले असतात,

आपण आपल्या इच्छा मारूनच जगायचे असते, काही अंशी आजचे चित्र बदललेले असले, तरीही पुरुषी मर्दानगी ही आजही बऱ्याचदा वरचढ ठरते, व स्री जबाबदारीच्या नावाखाली चिरडले जाते, फरक इतकाच असतो तिच्या भावनांना कुठे वाचा फोडता येण्यासारखे ठिकाण तिच्याकडे नसते,

लग्नासाठी होकार असेल किंवा मग प्रेम विवाह तिच्या ईच्छेला तिच्याकडे मर्यादा असतात, असं प्रत्येकदा स्रीला आठवण करून दिली जाते, परंतु जेव्हा गोष्ट पुरुषाच्या बाबतीने घडते ,तेव्हा मात्र पुरुषाच्या वर्चस्वाची कहाणी समोर येते ,देवाने स्री पुरुष निर्माण केले ,व त्या स्त्री-पुरुषांमध्ये दोघात भावना इच्छा अपेक्षा यात त्याने काहीही भेदभाव ठेवला नाही ,जसे पुरुषाला इच्छा असतात, तसंच स्त्रीलाही असतात, मग त्या मानसिक असो किंवा शारीरिक एखाद्या पुरुषांना स्री विषयी आकर्षण वाटू शकते, तसेच एखाद्या स्त्रीलाही पुरुषाविषयी आकर्षण वाटू शकते,

नवरा-बायको म्हणून नात्यांच्या बंधनात अडकलेले दोन जीव लैंगिक संबंधात एकत्र येताना, जसे पुरुष आपली इच्छा अपेक्षा आकांक्षा व भावनेनुसार वागू शकतो ,तितके स्रीला सुद्धा वागण्याची मुभा असावी, कारण ती स्री आहे ,म्हणून तिने आपल्या भावना दाबून ठेवाव्यात का??? तिलाही मन आहे, ती सुद्धा एक जीव आहे, ती सुद्धा माणूस आहे, हे आपण स्वीकारायला हवे,

स्त्रीला नेहमी देवीची महानतेची उपमा देऊन त्यागी आणि दुसऱ्याच्या आनंदासाठी, दुसऱ्याच्या सुखासाठी झटणारी महिला हि आदर्श महिला असते, असं नेहमी दाखवले जाते, परंतु तीच महिला जेव्हा स्वतःच्या मनाप्रमाणे जगू लागते, वावरू लागते, तेव्हा तिच्यासाठी काट्यांचे काटेरी कुंपण असते, घर समाज नातेवाईक मित्रमंडळी अशा कितीतरी त्रासातून ती स्वतःची सुटका करू इच्छिते, परंतु तिच्या भावनांना कुठेही न मिळणारा थारा ,तिला तिच्या इच्छांप्रमाणे वागू देण्याची मुभा देत नाही, ही वस्तुस्थिती आहे….

जी महिला प्रॅक्टिकली वागते, ती पुरुषांना नेहमीच खटकते, कारण की खऱ्याची वाचा ऐकण्याची मानसिकता स्वीकारणे काही वेळेस अवघड जाते, जोपर्यंत स्री न बोलता निमुटपणे सर्वांच्या मनमर्जीला सांभाळून वागते, तोपर्यंत ती खूप चांगली असते, परंतु तीचं स्री जेव्हा स्वतःची इच्छा भावना प्रगट करते, तेव्हा तुला कशाला पाहिजे त्या गोष्टींमध्ये नाक खूफसणे, असे कारण पूर्वापर चालत आलेली समाज प्रणाली आपण बघत आलेलो आहे,

त्यातल्या त्यात आपण आपल्याच कुटुंबाचा विचार केलात, तर आपल्या आजीच्या व आईच्या वेळेस स्री म्हणून त्यांनी मारलेल्या आपल्या इच्छा भावना यांचा प्रत्यय येतोच, काही अंशी आजच्या परिस्थितीत थोडाफार बदल असला तरी जनरेशनची बदलती वस्तुस्थिती खूप काही सांगून जाणारी आहे,

स्त्रीला सुद्धा मन आहे, भावना आहेत, तिच्याही आपल्याकडून काही अपेक्षा असतील ,हे आपण पुरुष म्हणून कधी स्वीकारणार, असे नाहीत की संपूर्ण पूरूषजाती अशीच वागणारी असते, काही ठिकाणी पुरुष स्वतःहून स्त्रियांना आपल्या इच्छा भावना अपेक्षा स्वच्छंदपणे मांडण्याचे स्वातंत्र्य देतात, तिच्या भावना जपण्याचा प्रयत्न करतात ,पण अशांची संख्या तुलनेने फार कमी बघायला मिळते…..


मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!