Skip to content

पुढे होणारा मानसिक त्रास टाळण्यासाठी आजपासूनच अशी काळजी घ्या.

पुढे होणारा मानसिक त्रास टाळण्यासाठी आजपासूनच अशी काळजी घ्या.


सोनाली जे.


अनेक वेळा आपण काही तरी चांगले करायला जातो आणि त्याचे परिणाम उलटे होतात. स्वतः ला आणि समोरच्याला ही त्यापासून मानसिक त्रास होतो.

पुढे होणारा मानसिक त्रास टाळण्यासाठी आजपासूनच अशी काळजी घ्या.

१. खूप involvement टाळा:-

कसे असते तुम्ही समोरच्या मध्ये खूप गुंतले जाता. Involve होता. काहीवेळेस समोरून ही सारखाच प्रतिसाद असतो. ती व्यक्ती ही खूप involve होते तुमच्यात पण हळूहळू एकमेकांना बारीक सारीक गोष्टीत असलेली ती गुंतागुंत त्रासदायक ठरू लागते.

म्हणजे एकमेनाच्या निर्णय प्रक्रिये मध्ये बंधन येते. सतत समोरच्याला काय वाटेल , करावे की नाही ही गोष्ट यातून आत्मविश्वास ही कमी होत जातो.

सगळ्यात म्हणजे ती व्यक्ती जशी involve आहे तशी अनेक नाती असतात. आई वडील , भाऊ , बहीण , मित्र , मैत्रिणी , बायको, मुले , ती ही तुमच्यात आणि तुम्ही ही त्यांच्यात तेवढं च involve असता.

अशा वेळी सगळा balance होणे कठीण जाते. आणि मग ती involvement काही गोष्टी सांगितल्या नाहीत, विसरल्या किंवा सांगणे महत्वाचे वाटले नाही तर ही वादग्रस्त ठरते. त्यातून शब्दाला शब्द वाढत जातात.

प्रायोरिटी ,कर्तव्य यात अडकून चांगली नाती खराब होवु लागतात. आणि मानसिक त्रासात वाढ होते. म्हणून हा मनासिक त्रास टाळण्यासाठी आज पासूनच प्रयत्न करा की समोरच्या मधली खूप involvement टाळा.

२. भावनिक न राहता अतिशय व्यवहारिक रहा :-

सतत भावनिक राहण्यापेक्षा व्यवहारी रहा.

मनिला तिचा नवरा आनंद विषयी खूप भावना होत्या. सतत ती त्याच्यात अडकलेली होती. तिचे विश्व च जणू तो होता. त्यात तो कामानिमित्त परदेशी गेला.

प्रत्येक सण वार करणे तिने सोडून दिले कारण आनंद इथे नव्हता.

दिवाळी ला मात्र तिने उत्साहाने त्याला गरजेच्या वस्तू आणि सगळा फराळ पाठविला. International courier मध्ये पार्सल अडकले. इथल्या ऑफिस ला जावून फोन , ईमेल ही धावपळ झाली. मनीष ला तिकडच्या ऑफिस ला जावून धावपळ करायला लावली. अखेरीस पार्सल कस्टम मधून सुटून दिवाळी फराळ मिळाला.

पण दोघांना ही रोज ते courier मध्ये फोन , निराशा , भावना असल्यामुळे मनी ची रडारड हे सगळे मानसिक त्रास देवून गेलेच.

फराळ संपला ही. पण तिथल्या authority नी vat ची नोटीस मनीष ला पाठविली. आणि ती किरकोळ नाही तर 50 पोंड म्हणजे इकडचे 5000/ रुपये. तेही सात दिवसात भराययचे.

चार आण्याची कोंबडी आणि बारा आण्याचा मसाला अशी अवस्था झाली.

परत सगळी local courier कडे जावून धावपळ आली. त्यात दोघांचे ही मानसिक त्रास वाढत गेले.

आणि दरवेळी मनी भावनेच्या भरात असे काही तरी करत असे की ते व्यवहारिक दृष्ट्या कुठेच योग्य नसे. आणि नंतर गोष्टी निस्तरणे मात्र मनीष कडे लागत असे.

यात दोघानाही खूप मानसिक त्रास होत होता. चांगले नाते ही काही वेळेस खराब होत होते.

म्हणूनच भावनिक न राहता अतिशय व्यवहारिक रहा. वास्तवात जगा.

३. अपेक्षा :- , इच्छा,

आपल्या अपेक्षा , इच्छा सतत दुसऱ्यावर थोपवू नका. समोरच्या ला ही समजत असते. कोणत्या वेळी काय केले पाहिजे.

पण आपण अपेक्षांच्या आहारी जावून समोरच्याला दुखावतो. आणि विनाकारण आपल्याच माणसांना मानसिक त्रास देतो.

म्हणून अपेक्षा मर्यादित ठेवा. किंवा त्या पूर्ण करण्याची स्वतः ची क्षमता वाढवा.दुसऱ्याकडून कमीत कमी अपेक्षा ठेवा. किंवा ठेवू च नका.

तर पुढे होणारा मानसिक त्रास टाळता येईल.

४. दुसऱ्यांना , आपल्या लोकांना समजून घ्या :

समोरच्याला समजून घेण्याचा प्रयत्न करा. त्याच्या जागी स्वतः आहोत असे गृहीत धरून विचार आणि वर्टवणुक ठेवा. तर अनेक मानसिक त्रास टाळता येतील. जसं राग , द्वेष , मत्सर , तुलना या गोष्टींचे मानसिक त्रास वाचतील.

५. प्रत्येकाला स्पेस द्या :

प्रत्येकाचे व्यक्तिमत्त्व स्वतंत्र आहे. त्या प्रत्येकाला स्पेस द्या. स्वातंत्र्य द्या. सतत स्वतः चा अंमल , वचक दुसऱ्यावर ठेवू नका.

६. गोष्टी धरून ठेवण्यापेक्षा तिथेच सोडून नव्याने पुढे वाटचाल करा :

गोष्टी धरून ठेवून आपण नात्यात कटुता वाढवतो. एकमेकांना दोषी सिद्ध करतो. त्यातून चांगली नाती बिघडतात. म्हणून गोष्टी तिथेच सोडून नव्याने पुढे जात रहा. तर बराचसा मानसिक त्रास वाचेल.

७. माफ करायला शिका :-

समोरच्याचे गुण असतात तसे दोष ही असतात. सर्वगुण संप्पन कोणीच नसते. म्हणून समोरच्याच्या चुका माफ करून गुण बघा. त्याची तारीफ करा.

त्याला / तिला समजावून घ्या. समजावून सांगा. माफ करायला शिका.

मनाचा मोठेपणा दाखवा . एक रागावला तर दुसऱ्याने शांत राहून ऐकून घ्या. चूक नसेल तरी माफी मागा. राग शांत झाल्यावर समजून सांगा.

८. घटना होवून गेल्यावर पश्चात्ताप होण्याऐवजी त्या घडू नयेत म्हणून काळजी घ्या.

आयुष्य सुंदर आहे . पुढे होणारा मानसिक त्रास टाळण्यासाठी एकमेकांशी सुसंवाद साधा. समजून घ्या.समोरचा आपला आहे म्हणजे तो गुलाम नाही. त्याचे ही स्वतंत्र अस्तित्व आहे. त्याची मते आहेत. त्यांचा आदर करा. विश्वास ठेवा एकमेकांवर. एखाद्याने एखादी गोष्ट सांगितली म्हणजे ती चुकीची असे न करता त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवा. नात्याची गरज आणि त्यातली सुंदरता समजावून सांगा.

समोरच्याचे वागणे , विचार आपल्या हातात नसतात. म्हणून त्याचा त्रास करून घेण्यापेक्षा ते accept करा. तर अनेक मानसिक त्रास वाचतील. निराशा येणार नाही. सकारात्मकता वाढेल. नाते फुलत जाईल.

All the best.


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “पुढे होणारा मानसिक त्रास टाळण्यासाठी आजपासूनच अशी काळजी घ्या.”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!