प्रॉब्लेमच जर चुकीच्या पद्धतीने सोडवला तर नवीन प्रॉब्लेम निर्माण होतो.
मयुरी महेंद्र महाजन
प्रॉब्लेमच नाही ,असा माणूस शोधूनही सापडणे कठीणचं, कारण आपण कितीही नाही म्हटले तरी कुठेतरी केव्हा तरी असा प्रॉब्लेम उद्भवतोचं, त्यातून मार्ग काढणे कठीण होऊन बसते, असा कुठलाच प्रॉब्लेम नाही ज्यातून आपण मार्ग काढू शकत नाही ,
कारण समस्या सोडवण्यासाठी कधी पैशांची गरज असते ,कधी माणसांची तर कधी वेळेची या तिघांव्यतिरिक्त प्रॉब्लेम अस्तित्वातच नसतो, काही प्रॉब्लेम आपण कळत-नकळत निर्माण करत असतो ,त्यासाठी आपण आपल्या मानसिक आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे.
समस्या सुटण्यासारखी असेलं, तर काळजी करण्यासारखे काय, आणि काळजी करूनही ती सुटत नसेलं, तर विनाकारण काळजी करून उपयोग काय ?प्रॉब्लेम आल्याशिवाय आपल्या क्षमतांचा कसं लागत नाही, हेसुद्धा तितकंच खरं आहे, पण आलेला प्राँब्लेम किंवा येणारा हे जर चुकीच्या पद्धतीने सोडवला तर नवीन प्रॉब्लेम निर्माण होतो.
कुठलीही समस्या उद्भवली तर सर्वात अगोदर ती आपल्या भावनिक स्तरावरती वार करते, आणि आपण तेच मजबूत ठेवायला हवं, बर्याचं ठिकाणी समस्या निर्माण झाल्यावरती ती कुणामुळे आणि का निर्माण झाली ,यावर चर्चा जास्त होताना दिसते, किंवा याच्यामुळे असं झालं, त्याच्यामुळे असं झालं असं म्हणून समस्येबद्दल एकमेकांना ब्लेमिंग केलं जाते,
आणि त्यामुळे समस्या सुटण्याऐवजी त्या समस्येबाबत वाद-विवाद वाढत जातात, आणि समस्या अजुन मोठी होत जाते, म्हणजे जेथे एक समस्या होती तेथे अजून नव्याने तयार झालेल्या समस्यांना तोंड देण्याशिवाय पर्याय नसतो, ्
म्हणून कुठलाही प्रॉब्लेम/ समस्या सोडवताना आपण त्यासाठी कुठली पद्धती वापरत आहोत, हे बघणे गरजेचे आहे, कारण की निम्म्याहून अधिक लोक प्रॉब्लेमला स्वीकारतचं नाही, कारण की त्यांना असं वाटतं हे प्रॉब्लेम माझ्यामुळे नाही निर्माण झाले, ज्याच्यामुळे ते निर्माण झाले आहे त्याने ते सोडवावे,
असे म्हणून समस्या आपल्या बाबतीत जरी असली तरी व्यक्ती त्यातून स्वतःचा पळ काढण्याचा प्रयत्न करतो, समस्येपासून पळ काढण्यापेक्षा समस्येतून पळ काढण्याचा प्रयत्न केलात, तर मला वाटते आपल्याला आपले उत्तर नक्कीच मिळू शकते.
असं बर्याच लोकांकडून ऐकायला मिळते ,की एक समस्या सुटत नाहीत तोपर्यंत दुसरी तयारच असते, म्हणजेच काही वेळेस खरंच आपली परीक्षा सुरू असते, जिथे एक प्रॉब्लेम होता तेथेच अजून कितीतरी प्रॉब्लेम तयार झालेले असतात ,
मग त्या वेळेस आपली गाडी डगमगते, कठीण परिस्थितीला आपल्याला तोंड द्यावे लागू शकते, पण या सर्वात आपली प्रॉब्लेम solving process जर योग्य दिशेने असेलं, तर आपण नक्की त्यातून मार्ग काढू शकतो ,परंतु प्रॉब्लेम जर चुकीच्या पद्धतीने सोडवला तर मात्र आपल्यासाठी नवीन प्रॉब्लेम निर्माण होतो,
एका व्यक्तीने आपल्या ब्रेक-अप झाला, म्हणून काही वर्ष डिप्रेशनच्या विळख्यात घालवली परंतु ती मला मिळाली नाही म्हणून आपण दुःख किती दिवस करणारं हे न बघता, तिच्या केलेल्या प्रेमाला विसरणे शक्य नव्हते, आणि आपल्या मनातील हे दुःख कुणाला सांगता न आल्यामुळे मनाची होणारी ही घुसमट एके दिवशी आत्महत्या करून त्या व्यक्तीने संपवली .
परंतु येथे समस्या सुटली नाही आई-वडिलांना जिवंतपणीचं आपल्या मुलाचं मरण बघाव लागलं, यापेक्षा जीवन यातना दुसर्या काय असू शकतात, आणि आई-वडिलांचे जीवन हे जिवंत असताना मरणासारखे झाले ,आणि मुलगा गेल्यापासून तेसुद्धा हळूहळू मरू लागले,
प्रॉब्लेम प्रत्येकालाच असतात ते फक्त आपला गैरसमज असतो की आपण इतक्या समस्यांना तोंड देतोय, परंतु त्या प्रॉब्लेमला आपण कुठल्या अर्थाने घेतो, आणि त्याला सोडवण्यासाठी किती जीवाचा आटापिटा करू शकतो ,जेणेकरून प्रॉब्लेम योग्यरीत्या सोडवता येईल ,आपण आपल्या कितीतरी शक्यता प्रत्येक प्रॉब्लेम साठी वापरायला हव्यात, त्यातून आपल्याला प्रॉब्लेम सोडवत असताना वेगळ्या प्रकारांचा शोध लागून आपण त्या योग्य मार्गाने योग्य प्रकारे सोडविण्यात यशस्वी होऊ शकतो.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!
