Skip to content

Pregnancy च्या वेळेस डिप्रेशन का येते? त्यावर अशी मात करा.

Pregnancy च्या वेळेस डिप्रेशन का येते? त्यावर अशी मात करा.


गीतांजली जगदाळे

(समुपदेशक)


गर्भवती महिलांना आपल्याला बाळ होणार याचा जसा आनंद आणि उत्साह वाटतो तसंच काही गोष्टींची चिंता आणि काळजी ही वाटत असते. गर्भवती झाल्यापासून ते बाळ झाल्यानंतर देखील त्या वेगवेळ्या मानसिक अवस्थेतून ( mood swings) जात असतात . आधीच्या गर्भवती होऊन गेलेल्या म्हणजेच आपली आई , सासू बहीण , मावशी , आजी इत्यादी . बायकांचे अनुभव कोणत्याही गर्भवती स्त्री ने जरी ऐकले तरी त्यांना स्वतःला येणारे अनुभव कितीतरी वेगळे असू शकतात. अशा परिस्थितित ताण आणि चिंता वाटणे स्वाभाविक आहे.

पण जर एखाद्या गर्भवती महिलेला प्रमाणापेक्षा अधिक ताणतणाव , नैराश्य , बैचेनी जाणवत असेल तर हे चिंतेचे कारण आहे.

गरोदरपणात शारीरिक आणि मानसिक बदल हे सतत होत असतात. काही वेळा पहिल्यांदाच आई होणाऱ्या महिलांना कदाचित नैराश्याचा म्हणजेच डिप्रेशन चा सामना करावा लागतो. प्रत्येक स्त्रीसाठी बाळाला जन्म देणे हा तिच्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा मानला जातो. बाळाला जन्म देणे आव्हानात्मक असल्यासारखं न दाखवता ते किती सहज आणि सोप्प आहे हे दाखवलं. पण तरीदेखील ही प्रोसेस खूप आव्हानात्मक असून स्त्रिया शरीराने आणि मनाने थकतात आणि खूप वेदना ही सहन करतात.

गर्भावस्थेतील महिलांच्या स्वभावात निरनिराळे बदल घडून येतात. राग येणे ,चिडचिड होणे , कारण नसताना किंवा क्षुल्लक कारणावरून रडू येणे इत्यादी. . लक्षणे दिसून येतात. मानसिक ताणामुळे रक्तदाब वाढू शकतो , नाडीचे ठोके वाढतात ज्याचा बाळाच्या आरोग्यावरही परिणाम होतो.

गरोदरपणात ताणतणाव कशामुळे येतो?

pregnancy चा काळ सुरु झाला की शरीरात विविध बदल होऊ लागतात. त्यापैकी हार्मोन्स बदलांमुळे चिडचिड वाढणे , अस्वस्थता , बेचैन होणे इत्यादी. समस्या दिसून येतात. गरोदरपणात आर्थिक समस्या , कौटुंबिक जबाबदारी , कामाचा ताण आणि कुटुंबात एखाद्या जवळच्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास गर्भवती महिलेचा ताण वाढण्यास मदत होते. अंमली पदार्थ आणि दारूचे सेवनसुद्धा गरोदरपणात वाढत्या तणावाला कारणीभूत ठरू शकतो.

Pregnancy मध्ये येणारा ताणतणाव आपण पूर्णपणे रोखू शकलो नाही तरी त्याचा होणारा परिणाम बऱ्यापैकी नियंत्रित करू शकतो.

१. गरोदर स्त्रियांनी जंक किंवा प्रक्रिया केलेलं अन्न खाणे टाळावे (packed juice ). आहारात पौष्टिक घटकांचा समावेश करावा. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पूरक आहारात घ्या.

२. नियमित व्यायाम करणे , मेडिटेशन करणे आरोग्यासाठी अतिशय फायद्याचे ठरते. यासाठी योग , चालणे , ध्यान आणि श्वसनाच्या व्यायामामुळे भावभावनांवर जरा अधिक पकड राहते. डोकं शांत राहायला मदत होते.

३. गरोदरपणात ज्या काही आवडीच्या ऍक्टिव्हिटीएस असतील , ज्याने तुम्हाला आनंद मिळतो त्या करा. (टीव्ही आणि मोबाइलचा वापर शक्य तितका कमी करा).

४. तणाव आला तर तो कशाने येतोय हे लिहून ठेवा . लिहिल्याने विचार ही क्लिअर होतात आणि तुम्हाला हे सुद्धा कळेल की खरंच टेन्शन घेण्यासारखं त्यात काही आहे का आणि जरी असलं तरी लिहिल्याने जरा बरं वाटून ताण कमी व्हायला मदत होते.

५. वाचनामुळे मन स्थिर राहते. म्हणून चांगली पुस्तके वाचा. चांगलं ऐका आणि चांगले विचार करा.

६. मनातील भावना कुटुंबियांसह मनमोकळेपणाने व्यक्त करण्याचा प्रयत्न करा.


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!