प्रत्येक व्यक्तीच्या मनात एक सल नेहमी सलत असते.
काव्या धनंजय गगनग्रास
(समुपदेशक)
सलते का ही बोच मनी?
का सवाल छळतो तोच मनी? तोच मनी?
सलते का ही बोच मनी?
विराज माझं प्रेम आणि श्रेयस माझा खूप चांगला मित्र. आमच्या दोघांमध्ये चांगली निखळ मैत्री होती विराज ने माझ्या आयुष्यात यायच्या आधीपासून. मित्र म्हणून फक्त गुडी गुडी बोलायच, एकमेकांचा कौतुक करत बसायचं अस आमचं नात नव्हतच. उलट आम्ही अनेकदा भांडायचो, एकमेकांवर चिडायचो, रागवायचो. पण त्यात पण आत्मीयता होती, जिव्हाळा होता. मैत्री घट्ट असली तरी एकमेकांवर हक्क गाजवण नव्हत, बंधन नव्हतं. आणि हीच मैत्रीची खरी ताकत असते नाही का?
टॉम अँड जेरी सारखं आमचं हे नात खूप छान चाललं होत आणि एके दिवशी माझ्या आयुष्यात विराज आला. आम्ही एकत्रच शिकायचो, तो फार बोलका नव्हता. थोडक्यात बोलायचा पण त्याची सोबत, सहवास हवाहवासा वाटायचा. मित्र म्हणून तो खूप चांगला होताच पण एक माणूस म्हणून पण त्याच वागणं चांगल वाटायचं. मनाला भावायच. कदाचित ते त्या वयाच वाटणही असावं. माहीत नाही. पण तो मला हळू हळू आवडू लागला होता हे मात्र खर. त्याला ही मी आवडायचे पण त्याने हे कधीच बोलून दाखवले नाही. पण ते त्याच्या वागण्यातून दिसून यायचच.
दिवस जसे पुढे सरकत होते तशी आमची मैत्री अजून घट्ट होत होती. या सगळ्यामध्ये माझी श्रेयस सोबत असणारी मैत्री कायम होती. तिच्यात काही फरक पडला नव्हता. पण माझ्या आणि विराजच्या नात्यात बदल झाला होता. आमचं नातं मैत्रीचं पुढे गेलं होत. दोघांनाही न बोलता समजलं होत की आपल्या मनात एकमेकांबद्दल काय भावना आहेत. कधीही फार काही न बोलणारा विराज, काही व्यक्त न करणारा विराज, सर्वांसमोर त्याने मला प्रपोज केलं.
खूप छान दिवस होता तो माझ्या आयुष्यातला. माझ्या आयुष्यात एका नवीन नात्याने प्रवेश केला होता. पण मला काय माहीत होत नवीन नात सुरू होत असतानाच माझं पहिल, अतिशय जवळच असणार नात कुठेतरी मला दुरावणार आहे. विराज आणि मी आता पहिल्यापेक्षा जास्त एकत्र राहायला लागलो. पण म्हणून मी श्रेयसशी बोलायच सोडलं नव्हत. त्याच्याबद्दल एक मित्र म्हणून असणारी माझ्या मनातली जागा अजूनही तशीच होती. मी त्याच्याशी बोलायचे, गप्पा मारायचे.
आमची थट्टा मस्करी चालू असायची. हळू हळू माझ्या लक्षात येऊ लागलं की माझी आणि श्रेयसची मैत्री विरजला फार रुचत नव्हती. सरळ सरळ बोलून दाखवत नसला तरी आम्ही दोघं बोलत असताना त्याच तिथून उठून निघून जाणं, दोघांमध्ये कधी सामील न होणे, चेहऱ्यावर असलेली नाराजी मला खूप काही सांगून गेलं. सुरवाती सुरवातीला मी दुर्लक्ष केलं, कारण या नात्यात थोडीफार हक्काची जाणीव ही असतेच, मत्सर हा असतोच.
आपली व्यक्ती फक्त आपली असली पाहिजे हे अस वाटत. पण नंतर नंतर या गोष्टीचा अतिरेक होऊ लागला. माझ्या आणि श्रेयसच्या मैत्री वरून आम्हा दोघांमध्ये भांडण होऊ लागली. खूप मोठा प्रश्न निर्माण झाला होता. एका बाजूला मैत्री होती आणि एका बाजूला प्रेम. काय निवडायचं हे समजत नव्हत. शेवटी मी निर्णय घेतला. मी प्रेमाला निवडलं. त्यावेळी का कुणास ठाऊक मला तेच योग्य वाटलं. माझ्यासाठी त्या वेळी विराज खूप महत्त्वाचा होता. त्याचसाठी मी काहीही करायला तयार होते.
ते म्हणतात ना, “everything is fair in love and war”. मी याबाबत ना विराज शी काही बोलले ना श्रेयसशी. पण हळू हळू आमचं बोलणच कमी होत गेलं. खरच तो एक चांगला मित्र होता अस म्हणावं लागेल. कारण एक खरा मित्रच आपल्या मित्राचं सुख कश्यात आहे याचा विचार करेल आणि त्यानुसार वागेल. तो देखील तसच वागला. त्याला समजून चुकल होत की आपली मैत्री कोणाच्या तरी नात्यात अडथळा आणते आहे. विराज त्याला पसंद करायचा नाही हे त्याच्या लक्षात आलं होत आणि म्हणूनच आमच्या नात्यात काही तणाव नको म्हणून तो ही मुद्दाम बाजूला झाला. एखादा मित्र येऊन भांडला असता.
असल कसलं प्रेम आहे जे मैत्री तोडायला भाग पाडत अस बोलला असता. पण त्याने तस केल आणि त्याचा हा समजूतदारपणा मला अधिक अपराधीपणा देऊन गेला. त्याच्याशी जरी मी मैत्री तोडली असली, जरी मी विराज सोबत खुश असले तरी माझ्या मनात ही सल त्यावेळी पण होतीच की मी माझा मित्र गमावला. कदाचित मला त्या वेळी प्रेम आणि मैत्री मध्ये समतोल राखता आला नाही. पुढे अशी एक वेळ आली की माझ्या आणि विराजच्या नात्यात पण तणाव निर्माण झाला.
सुरवातीला वाटणार प्रेम आता फक्त एक मालकी हक्क बनून राहील होत. कोणाशी बोलयाच नाही, कोणासोबत हसायचं नाही. कोणतही नात आपल्याला आधार देत, आनंद देत. यात फक्त मानसिक त्रासच राहिला होता. चांगल बोलण तर बाजूलाच आमच्यामध्ये साधं बोलण देखील व्ह्यायच नाही. तेव्हा मला समजून चुकल की मी काय चूक केली होती. हे नात पुढे नेण शक्य नव्हतच. तस करण दोघांच्याही आयुष्याला खराब केल्यासारख होत.
पण या सगळ्यातून ही सल मनात राहिलीच की या एका नात्यापायी मी माझ्या आयुष्यातील किती चांगल्या नात्यांना दुखावलं. विशेषतः श्रेयस. त्याच्याशी नंतर कधी भेटही झाली नाही की काही समजलं नाही. आता जरी कधी आम्ही भेटलो तरी तशी पूर्वीसारखी मैत्री परत होण शक्य आहे का? उत्तर माहीत नाही. पण कोणत्या नात्याला किती महत्त्व द्यावं, याहूनही त्यांचा समतोल कसा साधावा हे त्यावेळी न समजल्याने हातातून अनेक गोष्टी सुटल्या आणि मनात सल राहिली.
आपल्या प्रत्येकाच्या मनात एकतरी अशी सल असतेच जी आपल्याला आयुष्यभर सलते. अश्या काही गोष्टी, अश्या काही घटना ज्या घडून गेलेल्या असतात, त्यावेळी आपण त्या घटनेनुसार काहीतरी प्रतिक्रिया दिलेली असते, काहीतरी वागणं आपल्या हातून झालेलं असत. त्याची कारण वेगवेगळी असतात. पण नंतर जेव्हा त्याच घटनेकडे पुन्हा मागे वळून पाहिलं जात, एका त्रयस्थ नजरेने परत एकदा नजर टाकली जाते तेव्हा परत आपण विचार करू लागतो, अरे खरच त्यावेळी मी अस वागणं योग्य होत का? जरी नसला तरी आता तो गोष्ट होऊन गेलेली असते. बदलता येणे तर शक्य नसत. गोष्टी परत नीट कराव्या म्हटल्या तरी कश्या कराव्या? करता येतील का नाही? हेच समजत नाही आणि तेव्हाच मनात येते एक सल. आणि तिचं आपल्याला सलत राहते.
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.
