Skip to content

प्रचंड राग म्हणजे आपल्या मनात आपणच दाबून ठेवलेल्या कधी काळीच्या भावना

प्रचंड राग म्हणजे आपल्या मनात आपणच दाबून ठेवलेल्या कधी काळीच्या भावना.


रोहिणी राधाकीसन


आपण आपल्या मनामध्य खुप गोष्टी साठवलेल्या असतात ,खूपदा आपल्या भूतकाळाच्या खूप अश्या चांगल्या ,वाईट घटना आपण आपल्या हृदयाशी जोडून ठेवलेल्या असतात .

काही ज्या आपल्याला विसरायच्या नसतात तर काही आपण विसरू शकत नाही. काही वेळेस आपण केलेल्या चुका , किंवा आपल्या सोबत घडलेल्या चुकीच्या घटना, सतत आपल्या
मनात टोचत असतात.

बऱ्याचदा बरीच लोक या प्रकारच्या अनेक भावना मनात दडवून ठेवतात आणि आताचा क्षण जगायला विसरतात. आणि दररोजच या दुविधा अवस्थेला समोर जात असतात .

प्रत्येक व्यक्ति हा वेगळा आहे, प्रत्येकाचा स्वभाव वेगळा आहे ,जीवन जगण्याची पद्धत वेगळी आहे,प्रत्येक समस्येला समोर जाण्याची पद्धत वेगळी आहे ,पण प्रत्येकाचा एक भूतकाळ आहेआत्याच्याशी कितपत स्वतःला बांधून ठेवायच तेही त्यानेच ठरवायच. बरीच लोक कधी काळीच्या भावनाना मनात दाबून ठेवतात आणि त्यांच मन अस्थिर होऊ लागत व त्यांचा संपर्क वर्तमानाशी तुटतो त्यांना जाणीवही होत नही कधी अस्वस्थतेच रूपांतर रागामध्ये झाल ते, याचा परिणाम फक्त त्यांच्या मनावर नही तर कुटुंबावर ,कामावर ,व एकूण आयुष्यावर होतो. राग, चिडचिड हे असे शब्द आहेत जे आपल्यासाठी अनोळखी नाही आहेत, हे तेच शब्द आहेत जे माणसाच्या आयुष्याला कीड लावतात . बऱ्याचदा अस होतकी आपल्याला माहीत असतानाही आपण अश्या गोष्टी करतो.

ज्या आपल्यासाठी हानिकारक ठरतात , रागीटपणा सर्वांमध्ये थोड्याका होईना प्रमानामद्धे असतो आणि त्यापासून होणारे त्रासही आपण अनुभवतो ,पण मला सांगा राग म्हणजे काय? *राग म्हणजे दुसऱ्याच्या चुकीचा स्वतःला त्रास करून घेणे * . मग आपण अश्या गोष्टीचा त्रास स्वतःला का करून घ्यायचा जी आपली नाहीच आहे . असेच आपण भूतकाळात घडलेल्या गोष्टी किंवा घटना ज्या घडून गेल्यात अश्या गोष्टींचा विचार करून आपल आजच जीवन व्यर्थ घालवल पाहिजे का वर्तमानात राहून आजचा आनंद घेऊन उद्याची स्वप्न बघितली पाहिजेत. कळत नकळत आपल्या आयुष्यात बऱ्याच गोष्टी घडतात नवरा बायकोमध्ये , पालक पाल्यामध्ये , सासू सुनेमध्ये पण प्रत्येक गोष्ट आपण मनाशी लावून घेतली व सतत आपण त्याच विचारात राहिलोत तर आपले विचार कधी द्वेषात बदलतील हे आपल्याला ही कळणार नाही, मग आपण अश्या गोष्टींकडे दुर्लक्ष करणे सोपे नाही का ?

आपल्यावर कोणी ओरडल ,चारचौघात उलट बोलल ,आपल्याला कमी लेखल किंवा आपल्या मनाप्रमाणे काही घडल नही तर आपण समोरच्या व्यक्तिवर राग राग करतो , पण त्याच ठिकाणी जर हा प्रसंग कर्मचारी व मालक यांच्या मध्ये घडला तर मात्र आपण आपला राग दाखवत नही परंतु ऑफिसातून बाहेर पडल्यावर अक्षरशः शिव्या घालतो , तोच राग घरी जाऊन बायकोवर निघतो , आणि कायम मनात ठसत राहतो. पण याच्यामुळे नुकसान आपले होते एक तर आपली मनस्थिति बदलते जरी आपण साहेबांशी हसून बोलत असलो तरी मनामध्ये राग असतो जो प्रत्येक वेळी साहेब दिसल्यावर झालेल्या घटनेची आठवण करून देत असतो व कुठेना कुठे आपण आपल्या मनाची शांतता गमावून बसतो व स्वभावामध्ये चिडचिडेपणाला आमंत्रण देत असतो .

आणि दुसर म्हणजे आपण आपल्या प्रियजनांवर केलेली चिडचिड, त्रागा कुठेना कुठे आपल्या नात्यांना कमकुवत बनवते. व त्यांच्या वागणुकीत देखील कालांतराने तुम्हाला दुरावा मिळेल ,मग जर आपल्याला एवढा त्याची किंमत मोजावी लागणार असेल तर का ठेवायच्या आपण कधी काळीच्या घटना मनाशी लाऊन ,त्याच ठिकाणी आपण विचार केला की नही माझी चूक झाली असेल म्हणून मला साहेबानी ओरडल असेल मी माझ्या कामावर लक्ष देईल व आणखी चिकाटीने माझ काम करेल, तर टी रागाची भावना उद्भवणारच नही आणि तुम्ही तुमच्या भावनेवर संयम ठेवला तर आणखी चांगल काम करून वाह-वाह मिळवू शकता .

जेव्हा तुम्हाला समजेल की , आपल्या सोबत वाईट वागलेल्या लोकांसोबत वाईट वागण्यापेक्षा ,त्यांना माफ करून पुढे जाणं योग्य आहे तेव्हा तुम्ही खरे मनाच्या भावनांतून निर्माण झालेल्या द्वेषापासून
मुक्त व्हाल.

आयुष्य फार सुंदर आहे .. जे आपल्याशी चांगले वागतात त्यांचा आदर करा ,आणि जे आपल्याशी वाईट वागतात त्यांना माफ करून पुढे चला.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

5 thoughts on “प्रचंड राग म्हणजे आपल्या मनात आपणच दाबून ठेवलेल्या कधी काळीच्या भावना”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!