Skip to content

सहवासाने प्रेम वाढते असं म्हणतात, हे खरंय का ??

सहवासाने प्रेम वाढते असं म्हणतात, हे खरंय का ?? सौ. सुजाता गंगातीरकर सहवासाने प्रेम वाढते असे म्हणतात. हे वाक्य परिस्थितीसदृश्य आहे असे मला वाटते. कदाचित… Read More »सहवासाने प्रेम वाढते असं म्हणतात, हे खरंय का ??

समोरचा सुखी तर मी का नाही हीच भावना आपल्याला नैराश्येत ढकलते.

समोरचा सुखी तर मी का नाही हीच भावना आपल्याला नैराश्येत ढकलते… प्रणाली विश्वनाथ चिरमे शरीराला जपता जपता कधी मानसिक आरोग्याचा पण विषय चर्चेचा भाग होऊ… Read More »समोरचा सुखी तर मी का नाही हीच भावना आपल्याला नैराश्येत ढकलते.

मन मोकळं करायचं असेल तर स्वतःशीच एकांतात संवाद करावा.

मन मनाच्या शोधात…! सौ.सविता दरेकर नाशिक मन मोकळं करायचं असेल तर स्वतःशीच एकांतात संवाद करावा …उत्तर सापडत असतं…! कारण शंभर टक्के आपलं ऐकून समजून घेणारं… Read More »मन मोकळं करायचं असेल तर स्वतःशीच एकांतात संवाद करावा.

आनंदी संसार पुढे जाऊन उध्वस्त का होत आहेत ??

घटस्फोट हेमा जाधव (पुणे) सध्याची परिस्थिती पहाता घटस्फोटाचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येते. याला एकमेव कारण आहे आणि ते म्हणजे, समाजाचे बदलते चित्र. आता समाजाचे… Read More »आनंदी संसार पुढे जाऊन उध्वस्त का होत आहेत ??

होय, मी डिप्रेशन मध्ये आहे !!!

मी डीप्रेशन मध्ये आहे………? संकेत कांबळे सगळ्यात आधी डीप्रेशन म्हणजे काय? हा प्रश्न स्वत:ला विचारा. माझ्या आयुष्यात घडलेली घटना खुप लोकांच्या बाबतीत घडलेली आहे मग… Read More »होय, मी डिप्रेशन मध्ये आहे !!!

आपल्या आयुष्यातले निर्णय आपणच उत्कृष्ट घेऊ शकतो.

निर्णय आणि मानसिकता


श्रीकांत कुलांगे
9890420209


वेळीच अचूक निर्णयाच्या अट्टाहासापायी निर्णयच न घेतल्याने अधिक बिकट प्रसंग उद्भवला, निर्णय साशंक मनाने, घाबरत घेतले जातात, योग्य निर्णय कसे घ्यावेत, याबाबत सतत प्रश्न पडतो असे प्रवीणला नेहमी जाणवते आणि त्यावर त्याला समुपदेशन हवे होते. जवळपास बहुतेकांना हे प्रश्न दैनंदिन आयुष्यात पडतात. शेवटी कुठलातरी निर्णय घेऊन नंतर पस्तावणारे सुध्दा आहेत. का असं होतं?

१. आत्मविश्वासाची कमतरता. कित्येकदा दुसऱ्यावर निर्णय सोपवला जातो.
२. निर्णय घेण्यास मज्जाव असणे. काहीवेळा घरातील मंडळी निर्णय घेऊ देत नाही. त्यामुळे सवय नसणे.
३. अतीलाड.
४. निर्णय घेण्याची चुकीची पद्धत.
५. नकारात्मक मानसिकता.
६. मागील चुकातुन न शिकणे.
७. कल्पना शक्तीचा अभाव.
८. अनेक विचारांचा गोंधळ. चंचल स्वभाव.

आपल्या आयुष्यातील निर्णय अतिशय योग्य प्रकारे फक्त एकच व्यक्ती घेऊ शकते. ती म्हणजे तुम्ही. आपल्या कितीही जवळची व्यक्ती असली तरी प्रत्येक गोष्टीला सदसद्विवेकबुद्धीने योग्यवेळी होकार किंवा नकार देण्याची आणि त्यावर ठाम राहण्याची कला तुम्हाला साध्य झाली ना, की निखळ आनंदाच्या खजिन्याची चावी तुमच्या हाती आलीच म्हणून समजा. कसे निर्णय घ्यावेत?

१. अवलंबून राहणे टाळल्यास चुकीचे का असेना आपण निर्णय घ्यायला लागतो. सुरुवात छोटे-छोटे निर्णय घेण्यापासून करता येईल.

२. पंखांना पसरवू द्या. मुलांना त्यांचे निर्णय घ्यायची शक्ती दिली आणि त्यांना सकारात्मकतेने घेतले तर छान. चुकतील तरी चालेल.

३. योग्य निर्णयाची पद्धत. नेहमी दोन किंवा अधिक पर्याय असू शकतात. ज्यामध्ये फायदा जास्त आणि नुकसान कमी हा पर्याय नेहमी योग्य.

४. अचानक घ्याव्या लागणाऱ्या निर्णयांबाबत मनाची तयारी. सक्षम मन, अनुभव कामास येतो. अशा वेळेस आपण अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेतला तरी चालेल. किंवा त्या क्षणी आपल्याला जे योग्य वाटतं तो निर्णय योग्य असे धरून चालणे.

५. निर्णय चुकल्यास पश्चात्तापाची भावना नको.

६. काळाप्रमाणे निर्णय बदलतात. त्या – त्या परिस्थितीमध्ये घेतलेले त्या – त्या वेळचे निर्णय योग्य असतात.

७. गट – फीलिंगच्या आधारावर घेतलेला निर्णय सुटकेचा नि:श्वास सोडण्यासाठी कारणीभूत ठरतो. यानातून नील आर्मस्ट्राँग आणि एडविन ऑल्ड्रिन दोघेही चंद्रावर गेले. तिथे पोहोचल्यानंतर ‘पाऊल यानाबाहेर टाकू की नको’ अशा विचारात एडविन पडला – क्षणभरच! अन् तेवढ्यात नील आर्मस्ट्राँगनं पाऊल बाहेर टाकलं सुद्धा. अन् तो चंद्रावर पाऊल टाकणारा पहिला मानव ठरला!. गट-फीलिंगनं असा इतिहासही घडू शकतो.

८. आपण जसा विचार करतो तसे घडते. म्हणून मला निर्णय घेताच येत नाही असं आपण स्वतःला बजावत असतो. ते बंद करा. नकारात्मक विचार केला की, कृतीही तशाच घडतात.

९. ‘माझ्यामध्ये निर्णयक्षमता आहे,’ असं पूर्ण आत्मविश्वासानं ठासून स्वत:ला सांगावं. यामुळे निर्णयक्षमता रुजण्याची प्रक्रिया खरोखरच सुरू होईल,

१०. चुकांमधून शिकून पुढे जात राहिल्यास न्यूनगंड दूर राहील. जो शिकतो तो तरतो.

चुकीच्या निर्णयांची काळजी नको – परिपूर्णतेचा किंवा अचूकतेचा आग्रह जरूर असावा, मात्र दुराग्रह अजिबात नको! त्यामुळे विचारपूर्वक घेतलेला निर्णयही एखादेवेळी चुकू शकतो याची जाणीव ठेवा. त्या चुकलेल्या निर्णयातून शिका, आत्मपरीक्षण करा; मात्र काळजी नको!

केवळ ‘निर्णय घेणे’ पुरेसे नाही. ‘योग्य वेळी’ ‘योग्य निर्णय’ घेण्याचे कौशल्य अंगी बाणवले पाहिजे. यशस्वी बनण्याचा निर्णय न घेणं, म्हणजेच अयशस्वी होण्याचा निर्णय घेणं होय.

पसरवू द्या मला पंख माझे,
उडू द्या मला मुक्तपणे,
अडखळत – ठेचकाळत का असेना
पण शिकेन मी!
माझ्या निर्णयांची सर्वस्वी
जबाबदारीही घेईन मी!



Online Counseling साठी !

क्लिक करा



“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया!”

Read More »आपल्या आयुष्यातले निर्णय आपणच उत्कृष्ट घेऊ शकतो.

आयुष्यात कधी कधी निर्लज्ज बनावं!!

निर्लज्जंम सदासुखमं! सौ.सुधा पाटील खरं तर वरील उक्तीचा विचार केला तर, ती खरोखरच योग्य वाटते.कारण एखादा माणूस कितीही काहीही होवो पण आयुष्यातील संतुलन बिघडू देत… Read More »आयुष्यात कधी कधी निर्लज्ज बनावं!!

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!