Skip to content

कित्येक व्यक्ती प्रचंड ‘गाढव मेहनत’ करतात आणि यश मिळत नाही म्हणून उदासीन होतात.

कित्येक व्यक्ती प्रचंड ‘गाढव मेहनत’ करतात आणि यश मिळत नाही म्हणून उदासीन होतात.


मेराज बागवान


‘मेहनतीचे फळ मिळतेच’ असे म्हटले जाते.पण ही ‘मेहनत’ तुम्ही कशा पद्धतीने करता याला देखील महत्व आहे. कारण यश यावरच अवलंबून असते.

अनेकजण जुन्या पद्धतिनेच मेहनत ,काम करीत असतात.अनेक वर्षे ते त्यामध्ये काही बदलच करीत नाहीत.याने होते काय, ह्या व्यक्ती कायम कामच करीत राहतात आणि यशापासून लांबच राहतात.मग ते म्हणतात, मी इतकी मेहनत करतो पण मला यशच मिळत नाही.

काही विद्यार्थी अभ्यासात तोचतोपणा कायम ठेवतात.’प्रॅक्टिकल’ अभ्यासावर लक्ष केंद्रित करीत नाही आणि फक्त ‘थेरी’ कडे लक्ष देतात आणि त्यामुळे ते अपयशी होतात.

काहींना योग्य दिशाच मिळत नाही.कधी कधी योग्य मार्गदर्शकच मिळत नाही.पण आपल्याला योग्य मार्गदर्शकाची गरज आहे , हे त्यांच्या लक्षातच येत नाही.आणि ते तसेच आपल्या पद्धतीने कामकाज करीत राहतात आणि मग अपयश आल्यानंतर उदास होऊन बसतात.

काही व्यक्ती फक्त मेहनत करत राहतात. ती कशी करायची आहे, का करायची आहे आणि त्यातून काय साध्य होणार आहे ,याचे त्यांना भानच राहत नाही.वरिष्ठांनी संगीतले म्हणून ते फक्त काम करीत राहतात.पण एवढे करून देखील यश काही मिळत नाही.

असे अनेकांच्या बाबतीत कधी ना कधी घडतेच. ‘करिअर’ घडविणे सोपे नसतेच आणि ते टिकवून ठेवणे त्याहून सोपे नसते. मेहनत तर करायची आहेच पण ती कशी करावी जेणेकरून यश मिळेल हे वेळीच ओळखता आले पाहिजे. जर आपण स्वतः मध्ये, स्वतःच्या कार्यप्रणालीत काहीच बदल करत नसू तर यश कधीच मिळणार नाही.आणि जर यश मिळवायचे असेल तर , कार्यपद्धती मध्ये, नियोजन पद्धतीत बदल करणे फार गरजेचे असते.

कॉर्पोरेट कंपनीत काम करीत असताना अनेकवेळा वेगवेगळे ‘प्रोजेक्ट’ असतात. काहींना प्रचंड मेहनत करून देखील त्यामध्येय यश मिळत नाही.अशा वेळी मग त्यांनी विचार केला पाहिजे की , मी माझ्या कामात आणखीन काय बदल केले पाहिजेत जेणेकरून ‘प्रोजेक्ट’ यशस्वी होईल.
काही व्यक्ती नोकरी शोधत असतात.पण अनेक इंटरव्ह्यू देऊन देखील त्यांना नोकरी मिळत नाही.मग अशा वेळी त्यांनी बघितले पाहिजे की , ‘मी माझ्या ‘रेझुमे’ मध्ये काय बदल केले पाहिजेत.किंवा इंटर्व्हिव मध्ये स्वतःला कसे ‘प्रेझेंट’ केले पाहिजे’.
अशा सर्व प्रकारच्या गोष्टीत प्रत्येक व्यक्तीने ‘सिंहावलोकन’ म्हणजेच ‘सेल्फ एनॅलिसिस’ केले पाहिजे.आणि मग आत्मपरीक्षण करून योग्य ती मेहनत केली पाहिजे.

बाहेरच्या जगात काय चालले आहे याचा देखील अभ्यास करावा लागतो.तंत्रज्ञान रोज बदलते आहे. त्यानुसार मी स्वतःमध्ये काय बदल केले पाहीजेत याचा विचार प्रत्येक मेहनत करणाऱ्या व्यक्तीने केला पाहिजे.तरच त्या मेहनतीला अर्थ आहे. आजचे जग झपाट्याने बदलते आहे.प्रचंड स्पर्धा आहे. आणि अशा परिस्थतीत आपण जर ‘मी करतोय तेच बरोबर आहे, यात बदल करण्याची गरज नाही’ असा दृष्टिकोन ठेवला तर मग आपण आहे तिथेच कायम राहू.मग कितीही मेहनत केली तरी आपण यशापासून कायम लांबच असू.

मेहनत सगळेच करतात , पण त्यातील फक्त १०% जण ‘स्मार्ट’ मेहनत करीत असतात आणि बाकीचे ९०% जण प्रचंड ‘गाढव’ मेहनत करीत असतात. म्हणूनच, आपल्या देशात गरिबीचे प्रमाण जास्त श्रीमंत लोकांचे प्रमाण हातावर मोजण्याइतकेच आहे. मेहनत तर सगळे करत आहेत तर मग सगळेच यशस्वी का होत नाहीत ?

काही जण कायम अपयश च मिळते आहे म्हणून त्या अपयशाला ‘नशीब’ असे नाव देतात.’माझे नशीब च असे आहे’ असे अगदी भावनीकरीत्या स्वतःला बजावत असतात आणि यामुळे यशापर्यंत ते कधी पोहचूच शकत नाहीत.

प्रत्येकाचे ‘नशीब’ असतेच.पण ते कसे घडवायचे हे ज्याच्या त्याच्या हातात असते.थोडे अजून योग्य प्रयत्न केले तर यश लांब नसते.कधी कधी आपण यशाच्या अगदी जवळ पोहचलेलो असतो पण शेवटच्या क्षणी प्रयत्न कारायचे सोडून देतो .खरे तर तो शेवटचा क्षणच ‘यशाचा’ असतो.पण ह्या साठी गरज असते ती प्रयत्नांची आणि योग्य प्रकारच्या मेहनतीची.

चला तर मग , पुन्हा एकदा प्रयत्न करूयात आणि योग्य मेहनतीचे फळ मिळवूयात.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

2 thoughts on “कित्येक व्यक्ती प्रचंड ‘गाढव मेहनत’ करतात आणि यश मिळत नाही म्हणून उदासीन होतात.”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!