Skip to content

इतरांचं सुख न बघवणाऱ्या व्यक्तीही आज मानसिक समस्येने ग्रस्त आहेत.

इतरांचं सुख न बघवणाऱ्या व्यक्तीही आज मानसिक समस्येने ग्रस्त आहेत.


मयुरी महेंद्र महाजन


सुख म्हणजे नक्की काय असतं, प्रत्येकाच्या सुखाच्या संकल्पना ह्या वेगवेगळ्या आहेत, उत्पन्न होणाऱ्या आंतरिक इच्छांची पूर्तता करताना, प्रत्येक व्यक्ती आपल्या इच्छा आणि गरजा यामध्ये एका विशिष्ट स्तरावरती जगत असते ,आता आपण जर खूप जनरली लोकांचा विचार केला, तर ज्याच्याकडे भरपूर पैसा आहे, गाडी बंगला सर्व सुखसोयी उपलब्ध आहे, ती व्यक्ती खूप सुखात आहे, असा सर्वसामान्य माणसाचा समज असतो ,परंतु वास्तव मात्र यापेक्षा फार वेगळं असतं,

सुखाची अपेक्षा ही प्रत्येकाला असते ,परंतु त्या सुखाला खरच अनुभवायचं असेल ,तर इतरांशी तुलना करणे, सतत आपल्या सुखाला इतरांच्या सुखांशी तारादूत मोजणे बंद करावे लागेल, कारण निम्म्याहून अधिक लोकांची समस्या ही आपल्यापेक्षा कोणीतरी सुखात आहे, त्याच्याकडे ते सुख आहे, पण माझ्याकडे नाही यातच ते समस्या गुंतलेली आहे, आणि असणाऱ्या सुखाकडे झालेला कानाडोळा माणसाला त्या सुखाचा पुरेपूर आनंद घेवू देत नाही ,

इतरांच्या सुखातही आपला आनंद लपलेला असतो ,ते घ्यायला शिकलो तर आपल्या जवळ असणारे सुख दुप्पट होते, सुखी ही मानवी मनाची आंतरिक आत्म्याची पवित्र, निस्वार्थी आणि खरी भावना आहे ,याचा बारकाईने विचार केला तर त्यामध्ये कितीतरी गोष्टींचे ते मिश्रण आहे,

मग त्यात आपले विचार असतील ,आपला स्वभाव असेल, दुःखात असणाऱ्याला दिलेला मदतीमुळे जर त्याचे आयुष्य सावरले असेल ,तर त्यातून सुखा सोबत यामध्ये समाधानही असतं ,अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजांमध्ये शिक्षण आणि आरोग्य या दोन गोष्टींची वाढ झालेली आहे .

पूर्वी लोकांच्या गरजा कमी आणि समाधान जास्त होते ,आज काल आपल्या गरजांमध्ये तर वाढ झाली परंतु आपल्या समाधानाची पातळी मात्र खालवली, कितीही मिळवले तरी समाधानच नाही, इतरांच्या सुखाचा हेवा वाटणे, इतरांच्या सुखाकडे आपण उघड्या डोळ्यांनी बघतो, आणि आपल्या सुखाकडे झाकल्या डोळ्यांनी ,त्यामुळे जे दिसायला हवं ते दिसत नाही ,आणि जे बघण्याचा प्रयत्न करतोय ते कधीच पुर्ण दिसत नाही ,

इतरांचे सुख न बघणार्‍या व्यक्ती आज मानसिक समस्येने ग्रस्त आहेत, मानसिक स्तरावरती असणाऱ्या समस्या हत्या कुठलेही रसायन किंवा मेंदूच्या झालेला दुखापतीमुळे नाही ,तर इतरांचे सुख पाहवत नाही, म्हणून वाढलेल्या आहेत, आपण सुख कशात शोधतो ,हे खूप महत्त्वाचे आहे,

हे मान्य आहे ,जगात जगण्यासाठी पोटा पुरता का होईना, पण पैसा लागतोच, पैसा असेल तर सर्व सुख सोयी उपलब्ध होऊ शकतात, पैसा असेल तर सर्व काही विकत घेता येतं, पण खरं सांगू ज्यांच्या मनगटात कमावण्याची रग असते ना …..त्याला पैसा भलेही
कमी मिळू द्या ,पण पैशात न घेता येणारी गोष्ट मात्र त्यांना दुप्पट मिळालेली असते,

शारीरिक आरोग्यासाठी उपचार घ्यायचे म्हटले, तर डॉक्टर लगेच सांगणार असं करावं लागेल, इतका खर्च होईल ,आम्ही आमचा पूर्ण प्रयत्न करू, त्या ठिकाणी मानसिक आरोग्याचा प्रश्न असेल तर ती केस शारीरिक आरोग्य पेक्षाही क्रिटिकल असू शकते, सामान्य लोक खूप सहज रित्या सायको असल्याचे लेबल त्या मानसिक समस्येने ग्रस्त असलेल्या व्यक्तीवर ती लावताना दिसतात, असं म्हणतात की वेड्या लोकांवरती कोणी विश्वास करत नाही, पण काय माहिती कुणाच्या विश्वासघाताने जर त्या व्यक्तीला वेड बनवलं असेल, तर

भौतिक गोष्टी जर बाजूला ठेवल्या तर आपल्या सर्वांकडे असणारे शरीर जे करोडो रुपयांची संपत्ती आहे ,सर्व अवयव एकदम छानपणे काम करतात, आपण विचार करू शकतो, मांडू शकतो ,बोलू शकतो, किती मोठी चैतन्य शक्ती आपल्यात आहे,आपण ते शोधायला हवी आणि राहिला प्रश्न सुखाचा तर आपल्याला पाहिजे असणारे सुख आपल्या जवळ आहेच,

फरक फक्त इतकाच की आपण त्या सुखाला भौतिक गोष्टींमध्ये गुंतून ठेवलेले आहे, म्हणून हे मिळालं तरच माझ्या आयुष्यात सुख आहे, ते मिळालं तरच सुख आहे, बरं गुंतवून ठेवले आहे, तर किमान मिळाल्यावरती तरी माणसाने स्वतःला सुखात पाहावं, रोज कुठली तरी अडचण आहे, रोजच निर्माण होणारे प्रश्न आहेत,

गरिबाला वाटतं मी श्रीमंत व्हाव, श्रीमंताला वाटते, मी अजून कोट्याधीश व्हावं, आणि त्याहीपुढे जाऊन असं वाटतं मी लक्ष्मी आणि कुबेर व्हावं,चांगल्या मार्गाने मिळवलेले पैसे आपल्याला खरा आनंद आणि खरं सुख देतात, चुकीच्या मार्गाने मिळवलेले पैसे प्रेतावरची वाहिलेली फुले असतात ,हसू ही देत नाही ,आणि रडूही देत नाही,

इतरांच्याच्या सुखाकडे बघतांना हेवा वाटेल ,परंतु मानसिक समस्या ही आहे ,की आपल्याकडे ते का नाही , प्रत्येक जण सुख खूप लवकर दाखवतो, दुःख मात्र कुणाला कळू नये म्हणून आपल्याच हाताने पुसतो,

सुखदुःख हे ऊन सावलीच्या खेळाप्रमाणे असते, ते सुरूच राहणार आहे, फक्त इतरांच्या सुखाकडे बघतांनाना त्या सुखामागे केला गेलेला त्याग आणि ज्या उंचीपर्यंत त्यांनी स्वतःला नेऊन ठेवलेले आहे ,त्या पाठीमागचे कष्ट त्याग मेहनत हे बघायला आपण शिकलं पाहिजे,

इतरांकडे बघतांना त्यालाही दोन बाजू असतात, आपण फक्त आजचे स्वप्न बघतो ,परंतु आजच्या सुखासाठी काल त्या व्यक्तीने काय परिश्रम केले ,काय त्याग केला, त्याकडे मात्र आपले लक्ष जात नाही, त्यासाठी दुसरी बाजूही शोधता यायला हवी…


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

2 thoughts on “इतरांचं सुख न बघवणाऱ्या व्यक्तीही आज मानसिक समस्येने ग्रस्त आहेत.”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!