कुठेतरी रमून गेल्याशिवाय माणूस सुखी होऊ शकत नाही.
मयुरी महेंद्र महाजन
जीवनात सुखी व्हायचं असेलं, तर आपण रमत असलेली ठिकाण आणि ज्या कामात रमून गेल्यावरती वेळेचं भान राहत नाही, ते शोधायला हवं, जगाच्या बाजारात सुख नावाची गोष्ट अजून तरी विकायला आलेली नाही,हा हे खरेय, की सुख देणाऱ्या सुख वस्तूंची बाजारात कधीच कमी नाही, पण दुर्दैव माणसाचे की सर्व प्रकारच्या सुखवस्तू घेऊन सुद्धा माणसाला आपल्या सुखाची प्राप्ती होत नाही,
आपले छंद असतील ,आपल्या आवडीचे काही खेळ असतील, आपल्या आवडीचे काही काम असेलं, या सर्वांमध्ये कुठेतरी रमून गेल्याशिवाय माणूस सुखी होऊ शकत नाही, गोष्ट कुठलीही असो त्यामध्ये रमणं खूप महत्त्वाचे आहे, सुखाच्या संकल्पना या कितीही मोठ्या असल्या, तरी आंतरिक समाधानाच्या पातळीवरचं त्याची खरी ओळख बघायला मिळते, कारण की भौतिक गोष्टींमध्ये सुखाचा शोध घेणे, हे तात्पुरत्या वेळेला सुख देणारे वाटत असले ,तरी जोपर्यंत मनाच्या अंतरिक गोष्टीत माणूस पोहोचत नाही, तोपर्यंत सुखाचा अनुभव होत नाही ,
आपल्या प्रत्येकाचे जीवन चक्र सुरू आहे, प्रत्येक जण आपले जीवन चक्र चालवण्यासाठी काम करतोय, त्यात विशेष असं काही नाही ,परंतु ते करत असताना जर आपण काही नवीन निर्माण करू शकतो, मग ते विचार असतील, वस्तू असेल, किंवा अन्य काही असेल तर ते आपल्या रमण्याचे ठिकाण आहे ,कुणी कामात रमलेला असेल, कुणी कुटुंबात रमलेला असेल ,कोणी आपल्या छंदात रमलेला असेल, असे बरेच काही कारण की जीवनाच्या धावपळीत रोजचाचं कुठलातरी प्रश्न आहे, रोजचीच चालणारी कुठलीतरी लढाई आहे, रोज नव्याने येणाऱ्या समस्या आहेत, परंतु या सर्वात प्रत्येकाचा गोंधळ उडालेला आहे, निवांत पणाची दोन क्षण आणि त्या क्षणात रमण्याचा आनंद खूप सुंदर असतो,
विचार करा जर आयुष्यात प्रश्न नसते, समस्या नसत्या तर आयुष्यात काही नाविन्यचं राहिले नसते, आयुष्यात जेव्हा आपण कुठल्या गोष्टीत रमून जातो, तेव्हा आपण आनंद अनुभवतो, साधेसे छोट्या मुला सोबत खेळून व्यक्ती आपली करमणूक करतो, त्यावेळी बाळासोबत स्वतः रमून जातो, रमून जाणे म्हणजे स्वतःला वाहून घेणे नाही, तर आपल्या आनंदाची ठिकाणी शोधणे, आणि त्यात स्वतःच्या आनंदाला एका उंच स्तरावर ती पाहणे,
तसे तर सगळेच काहीतरी काम करून आपला प्रपंच चालवत आहे, परंतु प्रपंच्याच्या या प्रवासात आपल्या पोटाची खळगी तर आपण कसेतरी भरतोचं, परंतु मन भरण्यासाठी माणसाजवळ माणुसचं असावा लागतो, व त्यातच एखादी अशी जागा कुठेतरी रमून गेल्याशिवाय माणूस सुखी होऊ शकत नाही, ती जागा आयुष्यात खरा आनंद देऊन जाते,
नाही तर आपल्यासारखी लाखो माणसे आली, आणि गेली सुध्दा, इतिहासात काही नावांची नोंदही नाही, ती लोकही जगली आपणही जगतोय, ती सुद्धा संपली आपणही असंच कधीतरी संपणारच आहोत, परंतु जोपर्यंत आपल्या जवळ हे आयुष्य आहे त्यात कुठे आपण रमावं हे आपणच आपले ठरवलेलं बरं नाही का?????
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!
