Skip to content

एकवेळ आलेलं नैराश्य चालेलं, पण एकटी जिंदगी नको रे बाबा…!

एकवेळ आलेलं नैराश्य चालेलं, पण एकटी जिंदगी नको रे बाबा…!


मयुरी महेंद्र महाजन


आयुष्य हे वाहत्या झर्‍या सारखे असावे ,कारण साचलेले डबके दुर्गंधीने भरून जाते, या वाहत्या लाटांबरोबर जीवनाच्या चढ-उतारात सुखदुःखात कुणाची तरी सोबत असणे, खूप महत्त्वाचे आहे ,म्हणूनच की काय प्राणिमात्रांमध्ये प्रत्येक ठिकाणी प्रजोत्पादन होत असावे,माणूस येताना एकटा येतो ,आणि जातांनाही एकटाच जातो,

परंतु या जीवन प्रवासात माणूस एकटा जरी जीवन जगताना दिसत असला, तरी रक्ताची नसली तरी माणूस माणसं जोडतोचं, माणूस हा समाजशील प्राणी आहे, समाजात आपल्या माणसांमध्ये राहणे ही मानवी मनाची गरज आहे. नात्यांची निर्मिती होण्यामागचे हे खूप मोठे शास्त्र आहे. माणूस नाती जोडतो त्यात रक्ताची नाती जन्माने मिळतात, मानलेली नाती मनाने जुळतात,या रेशमी बंधालाचं मैत्री असे म्हणतात….

आपण भाग्यवान आहोत, आपल्याला अशी कितीतरी नाती मिळालेली आहेत, बऱ्याच जणांना जन्मतः अनाथाश्रमात सोडले जाते, त्यांना कुठली नाती असतात…हो…. तुम्ही म्हणणार कि ती तरं ऐकटीचं असतात ,…नाही ती वरकरणी जरी एकटी वाटत असली तरी आपल्यासारखी कितीतरी माणसं ती जोडतात .आयुष्यातून हरवलेली नाती कमवायला शिकतात,मैत्रीसारख्या सुंदर नात्यांना ती जीवापलीकडे जपतात, संसार थाटतात, आणि आपली जिंदगी खूप छान पणे जगताना दिसतात.. प्रत्येकाच्या बाबतीत असेच होते ,असे मात्र नाही….

संसाराला कंटाळून जीवनातल्या जडणघडणीत आलेचं काही दुःख आणि संकट, तर त्याला बळी पडून हे सोडून निघून जावं कुठेतरी एकांतात…. जिथे आपण एकटेच असणार…. असे उद्गार बर्‍याचदा बघायला मिळतात ,पण म्हणून काही आपण खरंच ते सोडून निघून जात नाही, कारण नैराश्य आलेले चालेल ,पण ती एकटी जिंदगी नको रे बाबा,…. हे खूप चांगल्या प्रकारे आपल्याला माहिती असते,..

या ठिकाणी आपण एक उदाहरण पाहू,” कोई मिल गया” या चित्रपटात त्यामध्ये परग्रहावरून येणारा तो ‘एलियन’ ज्याला ज्यादू म्हटले आहे, त्याची टोळकी निघून गेल्यामुळे तो एकटा पडतो ,आणि ज्या पृथ्वीतलावर तो असतो, तेथे त्याच्या सारखे त्याला कुणीच दिसत नाही, आणि त्याला त्या ठिकाणी म्हणजे तेथे आपली टोळकी आहे, तिथे जायचे असते, मित्रांनो हे उदाहरण जर आपण बारकाईने समजून घेण्याचा प्रयत्न केला, तर आपल्या लक्षात येईल की आपण जोडलेली माणसे, आपला गोतावळा, आपल्या आजूबाजूची किलबिल ज्यामुळे आपल्याला कधी कधी त्रास होतो, हे आपल्यासाठी किती महत्त्वाचे आहे,कारण आपण नैराश्य पचवू शकतो, पण ती एकटी जिंदगी नको रे बाबा… असे म्हणण्याची वेळ येते…

तुरुंगात असणार्‍या कैद्याला जेव्हा ऐकटं ठेवलं जातं, त्यावेळेस मला फाशीची शिक्षा द्या पण एकांत नको, अशी होणारी मागणी मानवी मनाच्या गरजेची कितीतरी रुपकं आपल्याला सांगून जातात, म्हणूनच की काय माणसाला आपल्या जवळची माणसं गमावण्याची भीती असावी, नैराश्य ज्यामध्ये माणसाला जगण्याचा आनंद अनुभवता येत नाही, नैराश्य चालेलं पण, एकटी जिंदगी म्हणजे साचलेलं पाण्याचं डबकं जे पुढेही जाऊ देत नाही, आणि मागेही फिरू शकत नाही, आहे त्या परिस्थितीत एकांतातल्या मरण यातना सहन करत माणसाच्या आयुष्याचा कारभार चालू असतो, आणि मग जगतोय की मरणाची वाट बघतोय, अशी मनस्थिती माणसाला धड जगूही देत नाही, आणि मरुही देत नाही,…

आपल्या भारतीय संस्कृतीचे महत्व , ज्ञान अगाध आहे, जर कोणी स्वतःला एकटं करून घेतलेले असेल, तर त्याला साथ देणे, त्याला त्यातून बाहेर काढायला मदत करणे ,हे माणूस म्हणून आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे, जर आपल्या आजूबाजूला कोणी असे असेलं, तर आपण त्यांना जवळ करायला हवे, त्यांच्या दुःखाला एक वाट मोकळी करून द्यायला हवी ,तरच आपल्या जगण्यातून ती व्यक्ती वास्तवात येऊ शकेलं,..

विचार करा, जर आपण एखाद्या वाटेने जात असलो ,आणि त्या वाटेने जर आपल्याला कुणीचं माणसं दिसत नसतीलं, सुनसान असलेली ती वाट नि त्या वाटेवरचा आपला तो प्रवास, आपल्याला त्याची भीती वाटायला लागते, आपणच आपले एकटे स्वतःशीच नको, त्या विचाराने आपल्या मनाला भीतीचे सावट सावरतांना आपण दिसतो, जर एखाद्या वाटेवरचा तो काही क्षणांचा प्रवास आपल्याला नको वाटत असेलं, तर मग या उभ्या जिंदगानीचा एकटा प्रवास शक्य आहे का??????

म्हणून आलेले नैराश्य पचवण्याची क्षमता ठेवू शकतो, पण ती एकटीच जिंदगी नको रे बाबा ……! असं म्हणत आपण आपल्या आयुष्याला एक नवी दिशा, आणि एक नवी वाट दाखवून त्याला खूप चांगल्या प्रकारे जगू शकतो…!!!


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!