Skip to content

आपला स्वभाव तेव्हाच बदलतो, जेव्हा कोणीही आपल्याला समजून घेत नाही.

आपला स्वभाव तेव्हाच बदलतो, जेव्हा कोणीही आपल्याला समजून घेत नाही.


काव्या धनंजय गगनग्रास

(समुपदेशक)


नीला एक गृहिणी होती. घरामध्ये तिचा पती, दोन मुले, सासू-सासरे असा परिवार होता. दोन्ही मुलं शाळेत जात होती. जरी नीला घरी राहत असली तरी कामाचा पसारा इतका की त्यात कसा दिवस निघून जायचा तिचं तिला समजायचं नाही. सकाळी उठल्यापासून सर्व नाश्ता बनवा, मुलांना शाळेसाठी तयार करून पाठवा, नवऱ्याचा डबा बाकीचे काम सर्व तिलाच करावं लागे. तिला याबद्दल काही तक्रार देखील नव्हती.

ती सर्व आनंदाने करायची. तरी अनेकदा असं व्ह्यायच की तिच्याकडून काही चूक झाली, कमी जास्त झाल, एखाद्यावेळी जेवणाला उशीर झाला तर ऐकून घ्यावे लागे. “इतकी वर्ष झाली लग्नाला तरीदेखील काम पटापट आवरता येत नाहीत” असं बोलणं ऐकल्यावर नीलाच मन दुःखी होई. आपण इतकं सर्व करत आहोत, इतक्या प्रेमाने वागत आहोत तर आपल्याला आपल्या घरातल्या लोकांनी समजून घ्याव इतकीच माफक अपेक्षा असायची पण अस होत नसे.

तिच्याकडून जर काही कमी जास्त झालं तर त्याचं कारण जाणून न घेता चुकीच ठरवल जाई. या सगळ्या गोष्टींमुळे निराश झाल्यासारखं होई. इतक सर्व करून देखील जर कोणी समजून घेत नसेल तर या सगळ्यातचा काय उपयोग? आपल्या कडून खरंच काही चुकत आहे का? असं तिला वाटू लागलं आणि तिच्या वागण्या बोलण्यात जाणवू लागलं.

तिचा चेहरा निराश दिसू लागला. ज्या उत्साहाने ती काम करत होती, त्यावेळी तिच्या चेहऱ्यावर जे तेज होत ते कमी होऊ लागल. कारण तिला वाटत होतं की आपण कुठेतरी कमी पडतोय म्हणून ऐकून घ्यावे लागत आहे. या सगळ्याचा परिणाम तिच्या कामावर राहण्यावर होऊ लागला.

अस होत की जेव्हा आपण मनापासून एखादी गोष्ट करतो, कोणासाठी इतके कष्ट घेतो, जीव लावतो तेव्हा त्या व्यक्तीने पण आपल्याला समजून घ्यावं, आपल्या कामाला कुठे तरी किंमत असावी असं वाटतं आणि जेव्हा अस होत नाही तेव्हा त्याचा आपल्यावर होतो. आपल्या कामाची किंमत नसेल तर समजून घ्यायचं नसेल तर हे सर्व का करावं असं वाटतं. बरेचदा अपराधीपणा देखील येतो की आपण काहीतरी चूक केली. पण या सगळ्यातून आपल्याला त्रास होतो

जरी आपल्याला वाटत असल की समोरच्याने आपल्याला समजून घ्यावे तरी आपण तर आग्रह कोणाकडूनही करू शकत नाही . अगदी स्वतःच्या व्यक्तीकडूनही नाही. आणि जेव्हा आपण कष्ट करून देखील समोरची व्यक्ती समजून घेत नसेल तर त्या व्यक्तीच्या चूक असू शकते,त्याचा दृष्टिकोन तसा असतो.

तेवढी संवेदनशीलता त्याच्यात नसते. म्हणून अशा गोष्टींसाठी आपण निराश वाटून घेण, कामातला आनंद गमावून बसणे योग्य नाही. समोरच्याला जर आपल्या चांगल्या कामामध्ये फक्त चूक दिसत असेल किंवा आपल्या चांगल्या कामाकडे दुर्लक्ष केले जात असेल तर त्याची चूक आहे. आपली नाही. यासाठी आपण अपराधीपणा वाटून घेण्याचे काहीच कारण नसतं.

कारण त्यातून आपण आपलं मुल्य घटवतो जे चूक आहे.असं कुणी आपल मूल्य घटवू शकत नाही. आपल्याकडून चुका होऊ शकतात. कारण आपण माणूस आहोत आणि गीतेमध्ये कृष्णाने हेच सांगितले आहे की, कर्म करत रहा फळाची अपेक्षा करू नका. याचा अर्थ असाच होतो की आपण त्या कामातील आनंद घेतला पाहिजे.

आपण जेव्हा दुसऱ्याचा प्रतिक्रियेवर अवलंबून राहतो तेव्हा त्याचा आपल्या वागण्यावर परिणाम होतो. समोरच्या व्यक्तीच्या समजून घेण्यावर न घेण्यावर आपण आपलं काम ठरवलं तर त्यातला आनंद निघून जाईल. कारण प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव वेगळा असतो. म्हणून कोणी ते समजून घेऊ दे न घेऊदेत आपण योग्य पद्धतीने काम करत राहणं चांगलं असतं.

कारण सरतेशेवटी समोरच्या व्यक्तीला ते समजत पण म्हणून त्यासाठी निराश व्हायच नाही. आणि खरच समोरची व्यक्ती समजून घेत नसेल किंवा चुका काढत असेल तर तिला योग्य पद्धतीने समजावून सांगण देखील एक कौशल्य आहे. तेही आपल्याला जमले पाहिजे. ते केव्हा जमणार जेव्हा आपण स्वतःला दोष देणे आणि निराश होण थांबवू तेव्हा.

म्हणूनच काम करत रहा, त्यातला आनंद घेत रहा आणि समोरची व्यक्ती पण चुकू शकते हे लक्षात ठेवून आपलं म्हणणं पटवा. पण लक्षात ठेवा कोणीही आपल्याला निराश आणि आनंदी करू शकत नाही या दोन्ही गोष्टी आपल्या हातात आहेत आणि त्या आपणच मिळवायच्या आहेत. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा आणि पुढे जा.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “आपला स्वभाव तेव्हाच बदलतो, जेव्हा कोणीही आपल्याला समजून घेत नाही.”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!