निव्वळ वापर होत असेल तर तुमच्याकडे असं काहीतरी आहे जे तुम्हाला नीट सांभाळता येत नाही.
सोनाली जे.
मनुष्य हा एक सामाजिक प्राणी आहे . त्यामुळे समाजाचा एक घटक म्हणून एकमेकांशी संपर्क केला जातो. विचारांची, व्यवहारांची देवाणघेवाण केली जाते. एकमेक एकमेकांना मदत करतात. गरज असेल तेव्हा प्रसंगी आर्थिक मदत असेल , वैचारिक असेल , सल्ला मसलत असेल , किंवा एकत्र व्यवसाय करत असताना येणारे नवीन प्लॅन्स आखणी असेल, अगदी कुटुंब असेल तरी कुटुंबात असणाऱ्या अडचणी , आर्थिक पुरवठा , रोजच्या गराजपूर्ती , गृहिणी नी रोज केलेला स्वैपाक , घरातील इतर कामे हे सगळ्यांच्या करिता करत असतात. या सगळ्यात एकमेक एकमेकाला उपयोगी पडत असतात.
पण बरेचवेळा एखाद्याला असे वाटते की प्रत्येकवेळी मीच करतो .. मलाच गरज .. माझ्यामुळे नक्कीच अडते. आणि काही जबाबदाऱ्या अशा असतात की एकट्याला घ्याव्या लागतात. बाकी कोणी पुढे येत नाही.
अशावेळी वाटू लागते की आपला निव्वळ वापर होत आहे. यातून एक नकारात्मकता निर्माण होवू लागते. प्रत्येकवेळी मीच करायचे. बाकी सगळे हात वर करून रिकामे. हे सगळे निव्वळ वापरून घेतात.
निव्वळ वापर होत असेल तर तुमच्याकडे असं काहीतरी आहे जे तुम्हाला नीट सांभाळता येत नाही. काय असेल बरे??
आजकाल स्वतंत्र कुटुंब पद्धती आहे . त्यात जो कर्ता किंवा कमावता पुरुष असतो त्यावर सगळ्या जबाबदाऱ्या पडत असतात. त्यात आपल्या कुटुंबाचा , त्यांच्या सोयी सुविधा, comfort , status , याचा दूरवर विचार करून आधी छोटे घर घेणे मग जसे इन्कम वाढू लागते तसे मोठे घर असावे असे वाटते. मुलांना ही त्याचं स्वातंत्र्य मिळू द्यावे आणि आपल्याला ही मिळावे ही इच्छा आणि विचार असतो , आधी दुचाकीगाडी घेणे मग चारचाकी घेणे.
काही गरजेच्या वस्तू फ्रिज , वॉशिंग मशीन , तर काम करण्याकरिता , मुलांच्या करिता काही गॅजेट्स असतील या करिता एक रकमी पैसे नसतील तर कर्ज काढले जाते. आणि मग ते कर्ज फेडण्या करिता एकट्याची धावपळ सुरू होते. मग प्रसंगी नोकरी शाश्वत राहत नाही. दुसरी नोकरी शोधताना लगेच सापडत नाही पण हे खर्च मात्र करावे लागतात. घरखर्च असतील , कर्ज , शाळा , कॉलेज फी हे खर्च करावे लागतात. त्यातून सुटका नसते.
पण जो कर्ता पुरुष असतो तोच पै पै करून पैसे जमवत असतो पण बाकी घरचे त्या व्यक्तीच्या त्रासाचा , कष्टाचा , हे पैसे कमावत असताना येणाऱ्या अडचणींचा विचार ही करत नाहीत. किंवा समजून ही घेत नाहीत. आणि त्या व्यक्तीची धड विचारपूस ही करत नाहीत. निदान दमला , त्रास होतो तुम्हाला किंवा जेवण केलेका ? जेवणार का ? याशी काही संबंध नसतो. त्यांचे रूटीन व्यवस्थित सुरू असते. ऐश आराम सगळे सुरू असते.
अशावेळी वाटते की आपला निव्वळ वापर होत असतो. आपण म्हणजे यांना पैसे पुरविण्याचे ATM आहोत. आपला निव्वळ वापर करून घेतात. बाकी कोणत्याच गोष्टीत त्यांना फरक पडत नाही. पण मग म्हणजेच काय तर असं काहीतरी आहे जे तुम्हाला नीट सांभाळता येत नाही.
१. आपल्या लोकांना सत्य परिस्थिती ची जाणीव करून देत नाही आपण त्यामुळे त्यांना त्याच गांभीर्य नसते. त्यामुळे एखादी व्यक्ती जबाबदारीने , आर्थिक दृष्टया किंवा इतरांच्या भल्या करता करत असते ती कायम करतच राहते. आणि बाकीचे आरामात असतात. त्यांना कसली चिंता , ताण ..स्ट्रेस किंवा भवितव्य या विषयी काळजी ही नसते. ते आपल्याच धुंदी मध्ये जगत असतात.
आणि आपणच त्यांना एखादी गोष्ट वेळीच नाही म्हणायची सवय लावत नाही. म्हणजे प्रत्येकवेळी त्यांच्या demands येतील तशा त्या पुरविण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे त्यांच्या demands या संपण्या ऐवजी अजून जास्त वाढत जातात. कारण त्यांची मानसिकता पक्की होते की आपण म्हणू ते , मागू ती गोष्ट आपल्याला सहज मिळते. आणि त्यांना ती मिळविण्याकरिता काय कष्ट पडतात याची आपण जाणीव त्यांना करून देत नाही .
वेळीच ही गोष्ट जाणीव करून देणे की एखादी गोष्ट साध्य करण्यासाठी किंवा मिळविण्यासाठी किती धडपड करावी लागते. किती प्रयत्न करावे लागतात हे त्यांना जाणीव करून देणे आणि प्रसंगी त्यांच्याकडून करून घेणे अशी एखादी गोष्ट तेव्हा त्यांच्यात ती जाणीव येईल. ही गोष्ट सांभाळणे खरेच गरजेचे आहे की प्रत्येकाला त्या वेळी ती ती जाणीव करून देणे. गोष्टींची value जाणिव करुन देणे ते सांभाळणे आणि वेळीच ते महत्वाचे.
इथे असे काय आहे जी त्यांची अशी मानसिकता व्हावी ? तुम्हाला काय सांभाळता आले नाही ? तर तुम्हाला त्यांना प्रत्यक्ष जीवनात जे घडत आहे त्याची जाणीव करून देणे जमले नाही. आणि सतत स्वतः स्ट्रगल करत राहणे , स्वतः सगळे ताण सोसत राहिल्यामुळे त्यांना किंचित ही तुमच्या धडपडी ची जाणिव नसते. ती जाणीव करून देणे जमले नाही. सत्य परिस्थिती चे चित्र समोर मांडत नाहीत.
आणि त्याही पेक्षा हे जे सगळे त्रास सहन करून करतो ते केवळ तुमच्या करिता हे स्पष्ट सांगणे जमत नाही. म्हणजे स्वतः चे महत्व जपणे सांभाळता येत नाही. स्वतः चा आदर ठेवून घेणे किंवा वाढविणे सांभाळता येत नाही.
२. आपल्या लोकांना त्यांची वर्तवणुक , त्यांचे वाढते खर्च , उधळपट्टी करणे कमी करणे हे जमले नाही. आणि कमी करा हे सांगणे ही जमले नाही त्यामुळे खर्च आणि त्याच प्रमाणात म्हणा किंवा त्यापेक्षा जास्त मिळकत सांभाळणे नीट जमले नाही.
३. आपल्या लोकांना विश्वासात घेणे जमले नाही.गैरसमज त्यामुळे अनेक गोष्टी सांभाळणे शक्य होत नाही. जसे नाती , मैत्री , आणि मग अपेक्षा हा सगळ्यात मोठा प्रोब्लेम आहे. ज्यामुळे तुमची द्विधा मनस्थिती होते. आणि अपेक्षाभंग झाला की मनाची चंचल अवस्था म्हणजे आपला निव्वळ वापर होत आहे असे वाटत राहते.
४. तुम्ही स्वीकारू शकत नाही. Accept होत नाही : तुम्ही प्रत्येका करिता भरभरून गोष्टी करत असता , अगदी मनापासून , मग छोट्या मधली छोटी गोष्ट असेल किंवा मोठ्यातली मोठी गोष्ट असेल. पण काही वेळा तुम्ही ते बोलून दाखवत असता. आणि आपली value कमी करून घेता आणि सगळे करून , सगळ्यांच्या करिता आटापिटा करून , त्रास सहन करून सगळे करून ही कायमचा वाईटपणा घेत असता. त्यामुळे तुम्हाला वाटते की आपला निव्वळ वापर होत आहे.
ही मनाची क्षणिक अवस्था असते. मानसिक चंचलता असते. आणि काही वेळेस अती विचार केल्याने किंवा अतिशय जास्त involve झाल्याने मनाची संकुचित अवस्था निर्माण होते.आणि त्यातून बाहेर पडायचे असेल तर मनाची , विचारांची विकसित दिशा गरजेची असते.
एखादी गोष्ट आपल्याच लोकांकरिता केली तर त्यात पूर्ण आपुलकी , involvement , देवा प्रती जसे समर्पण भाव असतात तसे कोणतीही कृती करताना , विचार करताना , एखाद्या करिता एक किंवा अनेक गोष्टी सातत्याने करताना त्यात पूर्ण एकरूप होण्याची , समर्पित होण्याची गरज असते. ती समर्पण भावना नीट सांभाळता येत नाही म्हणून ही तुम्हाला असे वाटते की तुमचा निव्वळ वापर होत असेल .
आयुष्य खूप सुंदर आहे. छोट्या छोट्या गोष्टीतून , आपल्या लोकांच्या आनंदा मधून , एखादी गोष्ट ज्याच्याकडे नसेल त्याला ती मिळवून देण्यासाठी किंवा ती स्वतः देण्यामध्ला ही आनंद तुम्हाला खूप सुख , शांती आणि समाधान देत असतो. स्वतच्या भावना आणि इतरांची मानसिकता दोन्ही ही balanced करा ..आणि भरपूर आनंद मिळवा. तुमच्या एखाद्या cute अशा हास्यात ही तुम्हाला तुमच्या डोळ्यात एखाद्या करिता केलेल्या गोष्टीचा अभिमान दिसेल.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!
