निराश मनस्थितीतून बाहेर पडण्यासाठी ही ६ चुकीची पावले अजिबात टाकू नका.
मयुरी महाजन
मनस्थिती आपल्या मनाची स्थिती वेगवेगळ्या टप्प्यावरती, वेगवेगळ्या घटना, प्रसंगात वातावरणाच्या सानिध्यातही, बदलत जाणारी असते, आपण प्रत्येक वेळी खुश किंवा प्रत्येक वेळी निराश राहू शकत नाही, वेळेनुसार काळानुसार मनस्थितीत खूप बदल होत जातात, आणि बदल कधी चांगले, तर कधी वाईटही ठरू शकतात ,
खूप सारे प्रयत्न करूनही जेव्हा एखादी गोष्ट आपल्या हाती लागत नाही ,तेव्हा प्रचंड निराशा पदरी येते, एखाद्या वेळी, एखादा प्रसंग, एखादी घटना, अशा पद्धतीने घडते, की आता इथे सर्व काही संपले इथपर्यंत विचार येतो, तसेच आर्थिक प्रश्न नाही म्हटला, तरी आर्थिकतेच्या बाबतीत प्रत्येकाला प्रश्न आहे, एखाद्या वेळी जेव्हा आर्थिक प्रश्न उद्भवतो व हातात काहीच नसते, तेव्हा तो आर्थिक प्रश्न सोडवतानाही निराश मनस्थितीतून जावे लागते ,
परंतु निराश मनस्थितीतून बाहेर पडण्यासाठी जर चुकीची पावलं टाकली जात असतील, तर आपण वेळीच ती सावरली पाहिजे, अन्यथा तात्काळ जरी आपल्याला फायदा वाटत असला, तरी दीर्घकाळासाठी त्यात तोटाचं अनुभवावा लागतो, हे मात्र नंतर लक्षात येते, तर बघूया की निराश मनःस्थितीतून बाहेर पडण्यासाठी ती सहा चुकीची पावले अजिबात टाकू नये,
एक= कुठल्याही चुकीच्या मार्गाचा अवलंब करू नका, वाममार्गाने तात्काळ फायदा होतो, हे मनस्थितीमध्ये बिंबवले गेलेले आहे ,आणि निराश मनःस्थितीत सापडलेली व्यक्ती आपली परिस्थिती निभावून लावण्यासाठी वाम मार्गाचा अवलंब करताना कुठलाही सारासार विचार करत नाही, व सरते शेवटी स्वतःच आपल्या हातून कुऱ्हाडी मारून घेते,
अशावेळी आपला फायदा आहे, म्हणून त्याचा अवलंब करण्यापूर्वी आपल्या मनाला विचारा मी योग्यरित्या जात आहे का???? कारण आपण जगाला फसवू शकतो, परंतु आपल्या मनाला कधीही फसवू शकत नाही,
दोन= कुठल्याही प्रलोभनांना स्वीकारू नका, तुमच्या मानसिकतेचा फायदा घेऊन त्यावर आपल्या स्वार्थाची पोळी भाजणारी माणसे कमी नाहीत, त्यासाठी ती कुठल्याही स्तराला जाऊ शकतात, तुम्हाला मदत करतो, असं म्हणून माझे अमुक अमुक काम करावे लागेल ,अशी चुकीची प्रलोभने देऊन तुम्हाला अडकवण्याचा हेतू साध्य होतो, त्यासाठी अशा कुठल्याही प्रलोभनांना स्वीकारून आपण आपली वेळ मारू नये,
तीन= निराशेतून बाहेर पडण्यासाठी कुणालाही धमकावू नये ,बरेचदा कुटुंबात एकमेकांना धाक दाखवून ,धमकावून आपली वेळ मारून घेतली जाते, मी असं करेल, मी तसं करेल ,मला हे मिळाले नाही तर, ते मिळाले नाही तर, मुळात कुटुंब आपली काळजी करतं, आपल्याला गमवायला घाबरतात, याचा फायदा घेऊन आपल्या निराशेच्या सुर हा कुटुंबाच्या आनंदाचा बळी घेऊन थांबतो, तो सुद्धा हळूहळू…
चार =स्वतःबद्दल अपराधीपणा वाटून स्वतःला संपवणे ,प्रत्येक समस्येला उत्तर असते, पण आपण तो प्रश्न आधी समजून घेतला तरच ,आणि स्वतःला संपवणे म्हणजे येथे प्रश्न सुटत नाहीत, तर तो अजूनच मोठा होतो, प्रश्न अनुत्तरितच राहतात, आपण स्वतःला संपवून त्या प्रश्नापासून पड काढण्याच्या विचारात, कितीतरी प्रश्न अजून परिवारासाठी मोठे करून जातो, हे आपल्याला लक्षातही येत नाही,
पाच= व्यसनांच्या बळी पडू नका, निराश मनःस्थितीतून बाहेर पडण्यासाठी, अगदी सर्रास पद्धतीने वापरला जाणारा मार्ग म्हणजे व्यसन,मग ते कुठलेही असो, दारू, सिगारेट, ड्रग्स नाही,त्या प्रकारची नशा केली जाते, व त्या नशेचे व्यक्तीला व्यसन जडते, व व्यक्ती त्या गोष्टीला इतकी अधिन होते, की ते त्याशिवाय राहू शकत नाही, इतकी त्या व्यसनाला बळी पडते, व होत्याचं नव्हतं, कधी होतं ,तेही कळत नाही,
सहा= दुसऱ्याला इजा पोहोचवणे, कधी कधी निराशेचे मनस्थिती दुसऱ्याला इजा पोहोचवण्यापर्यंत सुद्धा पोहोचते, कारण एखाद्या गोष्टीचा राग व त्याचे फस्टट्रेशन अन्य व्यक्तीला गृहीत धरून त्या व्यक्तीमुळेच असे झाले, असे म्हणून त्या व्यक्तीला इजा पोहोचवण्यापर्यंत सुद्धा मनस्थितीत धजावत नाही, अशी उदाहरणे तशी कमी नाहीत ,
परंतु त्यामुळे आपण आपल्या निराशातून बाहेर न पडता खूप सार्या अडचणी आपल्या स्वतःसाठी नव्याने निर्माण करून घेतो, हे लक्षात असू द्या,
कारण प्रत्येक गोष्टीतून बाहेर पडण्यासाठी चूक किंवा बरोबर असे मार्ग असतात, आपल्याला काय बरोबर व काय चुकीचे कळत नसेल, तर त्यावेळेस फक्त आपल्या मनाला विचारायचे कारण आत्म्यापेक्षा सुंदर दागिना दुसरा कोणताच नाही, चुकीची पावलं आधी सुखावह वाटत असली तरी नंतर मात्र त्याची परतफेड व्याजासह करावी लागते, त्यासाठी बरोबर मार्गाने काही वेळ कष्ट करावे लागतील, परंतु नंतर मात्र त्यात सुखाची फुले उमलतिलचं…
म्हणून चुकीच्या मार्गाने लवकर पोहोचण्यापेक्षा बरोबर मार्गाने उशिरा गेलेले कधी चांगलेच….
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

