मनात सतत निगेटिव विचार असल्यास आपल्या जीवनशैलीवर कसा परिणाम होतो बघा!!
काव्या धनंजय गगनग्रास
(समुपदेशक)
माणसाच्या दोन मूळ जैविक प्रवृत्ती असतात. ज्या एकमेकांच्या अगदी विरुद्ध असतात. एक मूळ प्रवृत्ती ज्याला आपण innate tendency असे म्हणतो. ज्यामध्ये एक मूळ प्रवृत्ती असते ज्यात व्यक्तीचा कल हा सकारात्मकतेकडे, आशावादाकडे, तार्किकता, नवनिर्माण, स्वतःला घडविण्याकडे असतो. तर दुसरी मूळ प्रवृत्ती ज्यामध्ये व्यक्ती हिंसकता, अतार्किकता, उध्वस्ततेकडे वळते.
Rebt च्या मते, बऱ्याच लोकांचा कल हा नकारात्मकतेकडे पूर्व कल्पनेतून आलेल्या विचारांकडे, म्हणजेच rigid विचारांकडे जास्त असतो. एखादी छोटी घटना, दुसऱ्यांचे ऐकलेले अनुभव किंवा कधीकधी काहीही कारण नसतानाही फक्त स्वतःला वाटतं म्हणून व्यक्ती नकारात्मक विचार करू लागते. तेवढी कारणही व्यक्तीला पुरेशी ठरतात.
नवीन गोष्ट शिकताना मला हे जमणारच नाही आधी काहीतरी झालं असेल म्हणून आताही तसंच होणार पुढे कसं होणार असं म्हणून ते काम करायचंच नाही पळवाटा शोधायच्या स्वतःकडून काहीतरी छोटी चूक झाली तर सारख त्यावरून स्वतःला दोष देत राहायचं मला काही जमतच नाही मी मूर्ख आहे माझ्यामध्ये ती क्षमताच नाही असं म्हणायचं.
लोकांच माझ्यावर प्रेम नाही, कोण मला आपल्यात सामावून घेत नाही, माझ्याकडून काही झालं तर लोक मला हसतील, नाव ठेवतील हे सर्व नकारात्मक विचारच आहेत. अशा प्रकारच्या सतत येणाऱ्या नकारात्मक विचारांचा आपल्या जीवनशैलीवर परिणाम होतो.
एकसारखे नकारात्मक विचार करून आपण जी आपली विचार शक्ती आहे जी आपल्याला चांगले, दैनंदिन काम करायला मदत करते ती गमावून बसतो. नकारात्मक विचारांतून ते काम टाळण्याचा प्रयत्न जास्त असतो. चालढकलपणा निर्माण होतो. कामावर परिणाम होतो.
सतत असे केल्याने आपल्या मनात त्याबद्दल अपराधीभाव निर्माण होतो. त्यामुळे जेव्हा आपण काम करायला घेतो तेव्हा परत मला ते जमणार नाही असं वाटून टाळल जात. यातून नैराश्य म्हणजे डिप्रेशनच प्रमाण वाढतं. एका नकारात्मक विचारातून हे चक्र सुरू होतं. त्याचबरोबर ओसीडी सारखे आजारही होतात.
याचा आपल्या वैयक्तिक सामाजिक जीवनावरही परिणाम होतो. बऱ्याच जणांना social anxiety असते. त्यामुळे जिथे जास्त लोक आहेत, संपर्क आहेत अशा ठिकाणी हे लोक जाणं टाळतात. त्यामुळे लोकांचा संपर्क, सहवास कमी होऊन जातो. आपल्या शरीरावर परिणाम होतो. झोप नीट न लागणे, भूक न लागणे हे याचेच परिणाम आहेत. कारण नकारात्मक विचार आपली immune system weak करतात.
अशा व्यक्तींची self worth म्हणजेच स्व मूल्य कमी असते. मी काही करू शकत नाही, आपलं काही होऊ शकत नाही अस आधीच गृहीत धरल्याने कोणती नवीन गोष्ट करण्याचा प्रयत्न केला जात नाही. म्हणून बऱ्याच लोकांच्या तोंडातून हे ऐकायला मिळतं की मला काहीच करावंसं वाटत नाही, माझं मनच लागत नाही.
म्हणून यातून वेळेस बाहेर पडायचं असेल तर आपल्या विचारांना बदलणे गरजेचे आहे. स्वतःबद्दलचा, इतरांबद्दल तसेच परिस्थितीबदलचा दृष्टिकोन बदलायला हवा. तर कुठेतरी आशेचा किरण निर्माण होईल आणि आपण काहीतरी प्रयत्न करू. कारण जरी आपल्या या नकारात्मक विचारांमागे एखादेवेळी एखादी घटना असली तरी ती फक्त सुरुवात करून देते. त्यापुढे या विचारांना चालू ठेवायचं काम आपण करतो. त्यांना बदलून चांगल्या दिशेला वळून आपल्या हातात आहे.
Rebt therapist windy Dryden म्हणतात,
“You may not always be able to prevent yourself from beginning to disturb yourself, but you can stop yourself from continuing to disturb yourself…”
म्हणून वेळीच स्वतःच्या नकारात्मक विचारांना बदला. आणि त्यांना अजून चांगले, आशावादी करा.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

खुप छान
Very nice
मला आवडला लेख पण प्रयत्न काय केले पाहीजेत ते सविस्तर सांगा अनेक अडचणीना सामोरे जाताना सकारात्मकता कशी टिकवायची🙏
खूपच छान