तुम्हाला माहितीये का.. दिवसभरातील जास्त ‘Self Talk’ हे आपल्या काहीच कामाचे नसतात.
हर्षदा पिंपळे
Self talk…आता किती जणांना या self talk विषयी कल्पना आहे माहीत नाही. परंतु याविषयी प्रत्येकाला कल्पना असणं आवश्यक आहे.Self talk म्हणजे काय ? हे प्रत्येकाने समजून घ्यायला हवं.
आता सेल्फ टॉक म्हणजे काय….? तर सेल्फ टॉक म्हणजे स्वतःशी, स्वतःच्या आतील आवाजाशी संवाद साधण्याचाच एक मार्ग/एक पद्धत. हे सेल्फ टॉक पहायला गेलं तर आयुष्यात, आपल्या रोजच्या जगण्यात खूप महत्वाच आहे.परंतु हे सेल्फ टॉक म्हणजे केवळ स्व-संवाद नाही.
तर या सेल्फ टॉकचे काही प्रकारही आहेत. आता सेल्फ टॉक जर सकारात्मक असेल तर त्याचा आपल्या जीवनावर निश्चितच सकारात्मक परिणाम होतो. आणि तो सकारात्मक स्वसंवाद तितकाच गरजेचाही असतो.त्याचा आपल्या व्यक्तीमत्वावर आपल्या दृष्टिकोनावर प्रभाव पडत असतो.तो कधी नकारात्मक असतो तर कधी सकारात्मक असतो.
आपल्या आयुष्यात अनेक घटना घडत असतात. तसच काही गोष्टी घडल्यावर कित्येकांना स्वतःशी बोलण्याची सवय असते.आज मी हे केलं – ते केलं..असच केलं तसच केलं,माझ्याच बाबतीत असं झालं वगैरे बरच काही बोलण्याची कित्येकांना सवय असते.मी सुंदर आहे, मी यशस्वी होऊ शकतो हे स्वतःला सांगणं आवश्यक आहे. स्वतःबद्दल स्वतःशी असा संवाद साधणं आवश्यकच आहे.परंतु अनेकदा आपण याच्या विरुद्ध वागत असतो. मी
सुंदर आहे, मीच असा आहे -केवळ मीच……या सगळ्यामध्ये एक प्रकारचा अहंकारी भाव वावरताना दिसतो.हे असं विषारी सेल्फ टॉक अनेकदा काहीच कामाच नसतं.या सेल्फ टॉकला खरं तर काहीच अर्थ नसतो.या लोकांना सेल्फ टॉक म्हणजे नक्की काय हेच कळत नाही. सेल्फ टॉक म्हणजे केवळ स्वतःशीच बोलायच म्हणून काहीही बोलणं नसतं.
काहीजणांकडे दिवसभरातूनही स्वतःसाठी पुरेसा असा वेळ नसतो.त्यामुळे त्यांचा स्वतःशी सहसा संवादच घडत नाही.तर काहीजण अगदी वेळ काढून स्वतःशी संवाद साधत असतात.पण यामध्ये या सेल्फ टॉकमध्ये आपण नक्की काय बोलते हे आपल्यालाच कळत नाही. क
कधी काही सेल्फ टॉक हे खूप टॉक्सिक असतात. स्वतःसाठीच घातक असतात.ते स्वतःसाठी इतके काही उपयोगाचेच नसतात.ते काही कामाचे नसतात.दिवसभरात जे काही घडत असतं त्याचा परिणाम आपल्यावर होत असतो.आपल्याला कुणी काही वाईट बोलतं ,आपल्या मनासारख काही घडत नाही, काही ना काही चुकत रहातं…आणि याचाच परिणाम थेट आपल्यावर होतो.
आपल्याभावनांचे तरंग आपल्या विचारातून बाहेर येत असतात. तर मग अशा काही घटना घडतात तेव्हा आपण स्वतःशीच संवाद साधत असतो.अनेकदा आपण चांगलं काय घडलय याचा विचारच करत नाही. जे काही असेल ते सगळं नकारात्मक पद्धतीने चालू असतं.स्वतःशी बोलतो पण नकारात्मकतेचा त्याच्यावर जास्त प्रभाव असतो.त्यामुळे हे निगेटीव्ह सेल्फ टॉक आपल्या काही उपयोगाच नसतं.त्याने प्रश्न सुटण्याऐवजी गुंतत जातात. त्यापेक्षा मग स्वतःशी असा विषारी संवाद साधण्याऐवजी संवाद न साधलेलाच बरा.निदान नकारात्मकतेपासून आपण काही क्षण तरी लांब राहू शकतो.
*I’m so unlucky.
*I’m not good enough.
*I’m a very bad person.
*I can’t do anything in my life.
*No one likes me.
*This is too hard.
*I made a mistakes.
यांसारखी कितीतरी वाक्य आपण रोज स्वतःशी बोलतो.पण मग हे सगळं निगेटीव्ह सेल्फ टॉकचा भाग आहे. पॉझिटिव्ह सेल्फ टॉक यामध्ये येतच नाही.त्याचा लवलेशही त्यात दिसून येत नाही. मग अशा या निगेटीव्ह/टॉक्सिक सेल्फ टॉकचा काय उपयोग आहे…..???
त्यापेक्षा मी काहीतरी नक्कीच करू शकतो,माझ्या चुकांमधून मला बरच काही शिकता येईल,हे अवघड आहे पण अशक्य नाही असा संवाद साधून पहा नं जरा.आयुष्यात हा सेल्फ टॉक जास्त महत्त्वाचा आहे.नाहीतर मग त्या तुमच्या सेल्फ टॉकला काही अर्थच उरत नाही. कितीही म्हंटल तरी तो सेल्फ टॉक वाटत नाही. आणि दिवसभर आपण हेच करत असतो.त्यासाठीच आधी सेल्फ टॉक समजून घेणे आवश्यक आहे.
सो सेल्फ टॉक समजून घ्या…. आणि नंतरच तो सेल्फ टॉक अमलात आणायचा प्रयत्न करा.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!
