Skip to content

सारखा आळस, मन उदास होत असेल तर तुम्हाला Motivation ची गरज आहे, अशावेळी काय करावे?

सारखा आळस, मन उदास होत असेल तर तुम्हाला Motivation ची गरज आहे, अशावेळी काय करावे?


प्रीती लांडगे


सारखा आळस येत असेल मन उदास होत असेल तर आधी त्या क्षणाचा स्विकार करा की हो मला अस होत आहे. सक्रीय स्विकार एकदा का तुम्ही दर्शवला तर पुढची प्रक्रिया किंवा तुम्हाला तुमच्या मनावर काम करणे सोपे जाईल. तुम्ही निराश होता,उदास होता म्हणून मग आळस त्याची मुळे तुमच्या शरीरात रुजवू लागतो.

तो हळूहळू वाढू लागतो खूप वेळा प्रत्येकाच्या घरातील अशांतीचे वातावरण किंवा उदास वातावरण हे आळसा मुळे असते घरातील व्यक्तीनी एकमेकांना सांगितलेली कामे वेळेत न करणे किंवा मीच का करु अशी कारणे असतात काही काही तर माणस स्वतःचे काम करायचा सुध्दा आळस करतात एका जागी नुसती बसून असतात टी.व्ही बघत पडलेली असता एक प्रकारची नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात ही आळशी माणसे आणि परिणामी स्वतः उदास आणि आजूबाजूचे वातावरणही उदास करतात.

आधी तर स्वतः हा स्वतःला मोटीव्हेट करा रोज काही तरी नविन गोष्टी करा म्हणजे दूसरे मोटीव्हेशन करणार्याचे तुम्ही ऐकाल स्वतःच स्वतःची मदत करु शकता. दूसर्याने कितीही सांगितले तरी तुमची मदत तुम्हीच करछ शकता. जरी घास दूसर्याने भरवला किंवा तो बारीक करुन दिला तरी गिळण्याचे काम तुमचे तुम्हाला स्वतःला करायचे आहे. घोड्याला पाण्याजवळ नेता येते पाणी त्याचे त्यालाच प्यावे लागते किंवा गिळावे लागते.

जी गोष्ट तुम्हाला करण्याचा कंटाळा येतो ती तर मुद्दाम करा एक साध उदाहरण देते एका जागेवरून उठून रिमोट जरी घ्याचा असेल तर तुम्ही स्वतः उठत नाही. दहा लोकांना हाका मारता इतके तुम्ही आळशी असता साध लाईट बंद करायचा असेल. आणि ते बटण तुमच्या डोक्या वरती असेल तरी तुम्ही स्वतः बंद न करता आईला हाक देता किंवा दूसर्या कोणाला देता म्हणजे तुम्ही किती आळशी आहात याचा विचार करा. तुम्हाला उदास वाटणे, काही न करावेसे वाटणे हे तुमच्या आळशीपणा चे लक्षण आहे. नुसते मोटीव्हेशनचे बोलणे ऐकून काही होणार नाही जे तुम्ही ऐकले ते कृतीत आणावे लागेल. तर ते फायदेशीर ठरेल. आणि अशावेळी या सगळ्याची गरच तर असतेच परंतु तुम्ही स्वतः लढणे देखील गरजेचे असते. आता मी माझेच उदाहरण देते.

मी खूप आळशी होते प्रत्येक कामाचा कंटाळा यायचा सतत उदासनीता प्लस चिडचिडेपणा कोणी काही बोलले की राग यायचा परंतु नंतर माझे मलाच या गोष्टी खटकायला लागल्या म्हणून मग मी यावर विचार करू लागले काय करावे अस सतत वाटायचे म्हणून मी एक छोटासा नियम केला की सकाळी लवकर उठायचे म्हणजे 7 ऐवजी 6 ला आणि आता अजून थोडा बदल म्हणून 5 वाजता यावेळी तुम्ही स्वतःवरती खूप काम करु शकता तुमच्या आळसाला येथेच ब्रेक करू शकता परंतु हे करणे गरजेचे आहे. सकाळी लवकर उठले की तुम्हाला जे आवडते ते सकारात्मक विचार ऐका किंवा बोला हेही नाही जमले हे तर चांगले गाने ऐका.

थोडासा व्यायाम, प्राणायाम आणि खरच तुम्हाला पूर्णपणे आळस झटकून द्याचा असेल तर ध्यान करा निदान 10 मिनीटे तरी रोज मग तुमच्यातील बदल तुम्हाला जाणवेल आणि कोणच्या न बोलण्याने तुम्ही उदास होणार नाही तुम्ही तुमच्या दुनियेत खुश असाल. आणि आपोआप तुम्ही सतत कामात असाल किंवा काहीतरी क्रिटीव शोधत रहाल त्यावर काम कराल. आणि आळस नाही,उदासीनता नाही आपोआप घरातील कामे करण्याचा ही उत्साह वाटेल त्यात कमीपणा वाटणार नाही.

आणि नेहमी लक्षात ठेवा मनाच्या ताब्यात तुम्ही रहायचे नाही. तर मनाला तुमच्या ताब्यात ठेवायचे हे काही फार कठीण नाही.

1 रोज सकाळी उठल्यावर किंवा दिवसभरात कधीही स्वतःला असे सांगा की, मी मन नाही आणि मी देह ही नाही. असे सांगा म्हणजे तुमच्या देहभाव षडरिपूचे कमी होतील आणि तुम्ही खूप उत्साहात रहाल दिवसभरात, हे जर रोज केले तर.

2 आणि दुसरे कायम रात्री झोपण्यापूर्वी एका कागदावर तुमच्या चांगल्या वाईट भावना लिहून काढा आणि कागद जाळून टाका आणि मग झोपा. उदाहरण एखाद्याने तुम्हाला त्रास दिला मन दुखावले तर ती त्यात तुम्हाला एखाद्याला शिवी द्यावीशी वाटली तर देऊन मोकळे व्हा हे सगळे कागदावर करायचे त्या माणसाच्या समोर जाऊन नाही यामुळे वाद टळणार आहे. आणि आपली मनशांती देखील भंग होणार नाही. लक्षाय घ्या आपण सगळे सध्या भंग झालेले आहोत तर त्या भंगाचे अभंग करायचे. म्हणजेच शांती निर्माण करायची आहे. सगळी नकारात्मक भावना लिहून काढा आणि जाळून टाका. आणि शांत झोपा.

3 झोपताना स्वतः ला पाच गोष्टी सांगून झोपा की मी आनंदी आहे. स्वस्थ आहे, शांत आहे, शक्तीशाली आहे, मी प्रत्येक काम मनापासून करतो आणि मी आळशी नाही. मी कायम फ्रेश असतो मनाने आणि देहाने. आणि हो घरातील कायम एक डबा रिकामा असावा म्हणजे तुम्ही बाहेर जाल सगळे डबे भरलेले असले की तुम्ही आळशी होता कोणतेही काम करण्याची तुम्हाला गरज वाटत नाही म्हणून सगळे डबे भरू नका एखाद्या डबा रिकामा ठेवा.

आहो सधी गोष्ट आहे आपल्याला पळायचे असेल तर तर आपण पोट पण पूर्ण भरत नाही ज्युस वगैरे घेतो हलके फुलके ठेवतो पोट आणि पळतो. तस या आळसाच आणि उदासीनता चे आहे जास्त नकारात्मक विचार मनात भरले सतत काहीना काही नको त्या गोष्टींचा विचार केला तर तुम्ही उदास होणार आळशी बनणार.

म्हणून सतत कामाला मह्त्व देणारे सकारात्मक विचार करा सकारात्मक बोलणारे लोक यांच्या संपर्कात रहा त्याच्याशी मैत्री करा आणि नेहमी चांगला विचार करा जो आधी तुमच्या आत उमटणार आहे आणि नंतर बाहेर येणार आहेत. नेहमी लक्षात ठेवा तुमचा चांगला मित्र हा आधी तुमच मन असतो आणि नंतर बाहेरून कोणी तुम्हाला भेटते. बाहेरून कोणतीही सुधारणा तुम्ही करू शकत नाही आधी आतले जग बदला मग बाहेर आपोआप आनंद निर्माण होईल.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

2 thoughts on “सारखा आळस, मन उदास होत असेल तर तुम्हाला Motivation ची गरज आहे, अशावेळी काय करावे?”

  1. खूप सुंदर,प्रेरणादायी लेख आहे

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!