Skip to content

‘स्त्रीत्व’ मिळण्यासाठी तिला ‘आई’ होणं खरंच गरजेचं आहे का?

‘स्त्रीत्व’ मिळण्यासाठी तिला ‘आई’ होणं खरंच गरजेचं आहे का?


सुधा पाटील

समुपदेशक


स्त्रीत्व आणि मातृत्व या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत.एका बाईमध्ये स्त्रीत्व निसर्गतः असतं.अपवादात्मक काही काही बायकांमध्ये स्त्रित्वामध्ये काही समस्या असू शकतात.पण त्या बाईला मातृत्व लाभलं तरंच तीचं स्त्रीत्व सिद्ध होत असं नाही.काही काही महिलांना बाळ जन्माला न घालता एखादं बाळ दत्तक घेऊन आई बनावसं वाटतं.

काही जणी लग्न न करता राहतात.काहीजणींना काही शारिरीक समस्यांमुळे बाळ होऊ शकत नाही.याचा अर्थ तिच्यात स्त्रीत्व नाही असा नाही. आपल्या समाजात प्रजोत्पादन होण्यासाठी आधी लग्न व्हावं लागतं.लग्नानंतरच मातृत्व समाज मान्य करतो.पण लग्न न होता मातृत्व लाभलं की ते चुकीचं मानलं जातं.मग मातृत्व आणि स्त्रीत्व याचा सहसंबंध तरी कसा आणि का लावायचा? स्त्रीत्व आणि मातृत्व या दोन भिन्न गोष्टी आहेत.स्त्रीत्वामुळे मातृत्व प्राप्त होतं….

पण मातृत्व प्राप्त झाले नाही म्हणजे एखाद्या बाईमध्ये स्त्रीत्व नाही असा त्यांचा अर्थ नसतो. स्त्रीत्व हे मिळवता येत नाही तर ते निसर्गतः मिळालेलं असतं.ते सिद्ध करण्यासाठी मातृत्व मिळायलाच हवं असं काही नाही.कधी कधी अपघातामुळे, औषधांच्या अतिरेकामुळे,जाडीमुळे, गर्भाशयातील समस्यांमुळे, पाळीच्या तक्रारींमुळे,नवरा आणि बायको यांच्यातील अयोग्य शारिरीक संबंधांमुळे, कधी कधी इतर शारिरीक तक्रारींमुळे एखाद्या बाईला मातृत्व प्राप्त होतं नाही.

किवा त्यामध्ये अडचणी येत राहतात.त्यामुळे मातृत्व प्राप्त झाले तरच त्या बाईकडे स्त्रीत्व असते असा विचार करणे हा शुद्ध मुर्खपणा आहे.खूपदा अज्ञानामुळे असे गैरसमज पसरले जातात.पण जेव्हा शिकलेले लोकंही असा अर्धवट विचार करताना तेव्हा मात्र खरंच आश्र्चर्य वाटतं!

आजच्या विज्ञान युगात पूर्णतः अडाणी असं कोणीचं नाही.त्यामुळे स्त्रीत्व म्हणजे काय? याची माहिती सगळेच माहित करून घेऊ शकतात.त्यामुळे मातृत्व लाभले तरच एखाद्या बाईचं स्त्रीत्व सिद्ध होतं हा गैरसमज कृपया दूर करावा.स्त्रीत्व असणं आणि मातृत्व प्राप्त होणं या दोन भिन्न गोष्टी आहेत.स्त्रीत्वामुळे मातृत्व प्राप्त होते…

पण मातृत्व प्राप्त झाले तरंच स्त्रीत्व सिद्ध होत असं नाही.मातृत्व ही एक विशाल अशी भावना आहे.स्त्रीत्व नसलं तरीही मातृत्वाचा भाव निभावता येतो.आणि कधी कधी स्त्रीत्व असूनही… मातृत्व प्राप्त होऊनही…. मातृत्वाचा भाव जपला जात नाही.म्हणूनच कोणत्याही चुकीच्या धारणा मनात जपू नयेत.स्त्रीत्व म्हणजे नेमकं काय? याचा विचार आधी करा….एका बाईला मासिक पाळी येणं…स्त्रीसुलभ भाव मनात निर्माण होणं…

स्त्रीचं शरीर प्राप्त होणं या सर्वच गोष्टी स्त्रीत्वामध्ये असतात.केवळ मातृत्व म्हणजे स्त्रीत्व नव्हे.आणि स्त्रित्वासाठी मातृत्व हवंच असं काही नाही.एखाद्या बाईला काही शारिरीक समस्या असेल… त्यामुळे तिला मातृत्व प्राप्त झाले नसले तर तिच्यात स्त्रीत्व नाही असं नाही.म्हणूनच विज्ञान समजून घेऊन… वैचारिक पातळीवर विचार मांडले जावेत.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

2 thoughts on “‘स्त्रीत्व’ मिळण्यासाठी तिला ‘आई’ होणं खरंच गरजेचं आहे का?”

  1. खूप छान माहिती आहे आणि ती योग्य आहे.
    समाजाला गरज आहे या गोष्टी माहित असण्याची, पण खंत एकाच प्रकारची आहे की, प्रत्येक जण जाणून पण अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करतात.
    आशा आहे असे लेख वाचणारे तरी किमान असे विचार बाळगतील.
    👌👌👏👏

  2. आपलं मानसशास्त्र
    खूप सुंदर अशी माहिती देऊन आम्हाला सुज्ञ बनवित आहे

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!