Skip to content

मी पूर्वीसारखं पुन्हा हसूच शकत नाही हा तुमचा भ्रम असा खोडून टाका.

मी पूर्वीसारखं पुन्हा हसूच शकत नाही हा तुमचा भ्रम असा खोडून टाका.


मेराज बागवान


समस्या काही कोणाला चुकलेल्या नाहीत.प्रत्येकाला काही ना काही अडचण समस्या ही कायम असणारच आहे. जसे की आर्थिक समस्या, नातेसंबंध समस्या,आरोग्याच्या समस्या, करिअर विषयी समस्या आणि इतर अनेक समस्या. आयुष्य हे असेच आहे,कायम निरनिराळ्या समस्यांनी भरलेले.

पण म्हणून हसणे विसरून कसे बरे चालेल? किंवा आयुष्य थांबवून तरी कसे चालेल? काही समस्या खरेच आयुष्य बदलवून टाकतात. काही खूप वेदना देतात.दुःख देतात.इतकं की माणूस त्यामुळे खूप निराश,उदास ,हतबल होतो.समस्या मोठी तर असते.पण कायमची नसते.उपाय तर प्रत्येक समस्येला असतो.पण इतकी मोठी समस्या आली म्हणून अनेकजण नकारात्मक विचार करतात.जसे की ,मी आता पूर्वीसारखं पुन्हा हसूच शकत नाही.पण हा केवळ भ्रम असतो.

एखादी समस्या आली म्हणजे काही आयुष्यभर ती राहणार असे नसते.पण आपण जर तसा दृष्टिकोन ठेवला तर.अन्यथा एखादी समस्या तुम्हाला कायमच आहे असेच वाटत राहणार.आणि मग तुम्ही म्हणणार,मी आता पूर्वीसारखं नॉर्मल नाही वागू शकणार.पूर्वी सारख नाही हसू शकणार.

असे विचार का येतात माहिती आहे का? असे भ्रम होतात कारण तुम्ही तुमचे विचार तसे सकारात्मक ठेवत नाही.कायम नकारात्मकच विचार करतात.जसे की , माझं नशीबच फुटक,माझ्या बाबतीत कायम असंच होत,सगळे मला असेच भेटतात,ही दुनिया काही आपल्या आवाक्यातील नाही बुवा इत्यादी.असे बोल तूम्ही स्वतःला कायम ऐकवत राहतात आणि मग तुमची दृष्टीच तशी बनते.ते म्हणतात ना ,’दृष्टी तशी सृष्टी’.

पण वास्तव वेगळे असते.आयुष्य असे बिलकुल नाही.आयुष्य सुख-दुःखांनी भरलेले आहे. फक्त समस्याच नसतात आयुष्यात.आणि जरी असतील तरी त्या कायमच्या नसतात.मग तुम्ही तुमचा भ्रम कसा खोडून काढू शकतात? काही टिप्स ह्या लेखात आपण पाहुयात.

१) मी फक्त समस्येवर लक्ष केंद्रित करणार नाही तर त्याच्या निराकरणावर लक्ष देईल. फक्त Problem न पाहता नेहमी Solution वर जाण्याचा प्रयत्न करेन.असे जर का तुम्ही स्वतःला सांगितले तर नक्कीच समस्या लवकर सुटू शकेन.आणि तुम्ही तणावमुक्त व्हाल.आणि कायम लक्षात ठेवा ‘शोधले की सापडते’.फक्त प्रयत्नशील रहा.

२) जे काही झाले ते चांगल्यासाठी – प्रत्येक दुःख,अडचणी आपल्याला बरंच काही शिकवत असतात.तुम्ही माणसांशी कसे जपून वागले पाहिजे.तुमच्यात काही बदल करणे कसे गरजेचे आहे हे अनेकदा अडचणी आपल्याला शिकवत असतात.जेव्हा काही तरी अडचण येते तेव्हा बदल नक्कीच होतो.म्हणून जर का तुम्ही अशी विचारसरणी ठेवली तर मी पुन्हा हसूच शकत नाही असे तुम्हांला वाटणार नाही.

३) विधाता नेहमी पाठीशी आहे आणि माझा त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे – विधात्याला कोणी देव म्हणेल,कोणी नशीब म्हणेल किंवा कोणी निसर्ग म्हणेल.जर तुम्ही प्रत्येक परिस्थिती त्याच्यावर कायम विश्वास ठेवलात तर सगळे चांगलेच घडताना दिसेल.जरी कितीही मोठे दुःख असेल तरी माझा देव माझ्या पाठीशी आहे.तो माझी साथ कधीच सोडणार नाही हा जर का विश्वास असेल तर तुम्ही कायम हसत राहणार ,चिंतामुक्त राहणार यात शंका नाही.

४) मी Strong आहे – तुम्ही जर स्वतःला वारंवार सांगत राहिलात की ,मी कणखर, मजबूत आहे. मानसिकतरित्या ,शारीरिकरित्या Fit आहे.तर मग तुम्ही नेहमी ताजेतवानेच वाटणार,दिसणार.मग किती जरी मोठे दुःख असेल तरी त्यावर मार्ग मात्र तुम्ही नक्की शोधून काढाल आणि चेहरयावर छान पैकी हास्य फुलवत राहाल.

५) मी एकटा नाही – ह्या जगात अनेकजण मला जिंकू पाहत आहेत.जसे त्रास देणारे आहेत, तसेच पाठीशी असणारे देखील बरेच आहेत.मी एकटा/एकटी नाही.मला मदत करणारे देखील अनेक हात आहेत. फक्त त्यासाठी मी स्वतःला ओपन ठेवले पाहिजे. आणि ह्या सगळ्यांच्या मदतीमुळे मी त्रासातून नक्की बाहेर पडेन आणि त्या त्रासाला माझ्या हास्याला हात देखील लावू देणार नाही.असा दृष्टिकोन ठेवला तर नक्कीच चांगला बदल घडेल.आणि चुकीचे भ्रम पुसून जातील.

६)तरी बरं माझी समस्या इतरांपेक्षा छोटीच आहे – तुम्ही कितीही अवघड परिस्थतीत असाल तरी देखील तुमची दृष्टी इतकी मोठी ठेवा की तुमची समस्या तुम्हाला इतरांपेक्षा छोटीच वाटेल.जगात इतक्या समस्या असतात,पण आपल्याला आपलीच समस्या मोठी वाटते.पण तुम्ही कल्पना करू शकत नाही,इतक्या भयंकर समस्या लोकांच्या असतात.म्हणून कायम अशा लोकांकडे बघा.तक्रार करण्या अगोदर अशा लोकांकडे पाहा जी भयानक परिस्थिती अनुभवत असून देखील जगात तग धरून आहेत.यामुळे तुम्ही नक्कीच कमी चिंताजनक राहाल.

७) छंदांना वेळ द्या – तुम्ही अडचणीत असाल तेव्हा तुमचे छंद मात्र कायम जगा.त्यासाठी वेळ काढा.छंद तुम्हाला पुन्हा हसवायला लागतील.तुम्ही आनंदी राहाल.तुम्हाला आवडेल ते करा,पण करा.कोणी काहीही म्हणलं तरी चालेल पण आवडी जपा आणि त्या भरभरून जगा.

८) स्वतःला बदला – स्वतःच्या वाईट,नकारात्मक सवयी बदला.जोपर्यंत तुम्ही स्वतःला बदलत नाही.तोपर्यंत तुम्हाला काहीच बदललेले दिसणार नाही.म्हणून स्वतःपासून बदलाची सुरवात करा. तुम्ही कायम आनंदी राहाल.

९) Move On करायला शिका – आयुष्य म्हणजे फक्त कोणती तरी एक गोष्ट नसते.म्हणून जे झाले ते झाले,गोष्टी सोडून द्यायला शिका.प्रत्येक गोष्ट मनासारखी होत नसते हे वास्तव स्वीकारा. एखादी गोष्ट आयुष्यात हवी असेल तर प्रयत्न मात्र करा.आणि तरी देखील ती मिळाली नाही तर मात्र अट्टहास करू नका.एक टक्का का होईना नशिबाचा भाग असतोच की.नशीब म्हणून काही गोष्टी सोडून देऊन पुढे चालत राहणे हेच तर आयुष्य असते ना…?

१०) स्वतःची काळजी घ्या – चांगला व्यायाम करा.चांगला आहार घ्या.योगासन,ध्यानधारणा करा.ह्या गोष्टी तुम्हाला एक प्रकारची नवी ऊर्जा देतील.आणि तुम्ही पुन्हा हसूच शकत नाही हा भ्रम नक्की खोडून काढतील.

ह्या टिप्स नक्की स्वतःसाठी वापरून पाहा. कायम आनंदी,हसतमुख,शांत राहाल!

ह्यासाठी खूप खूप शुभेच्छा तुम्हाला…


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!