“मी आहे ना…नो टेंशन” अशी बोलणारी व्यक्ती आयुष्यात असेल तर खचलेल्या मनाला पुन्हा उभारी मिळते.
मयुरी महाजन
“किसका है तुमको इंतजार में हूँ ना ,देखलो इधर तो एक बार में हूँ ना, खामोश क्यू हो जो भी केहना हो अहो, दिल चाहे जितना प्यार ऊतना माँग लो…..
नको टेन्शन घेऊस मी आहे ना, तुझ्या सोबत असं खऱ्या अर्थाने बोलणारी व्यक्ती आयुष्यात असेल तर हरलेली व्यक्ती सुद्धा पुन्हा धावायला लागते, आणि जिंकण्याची आशा मनात धरून जिवाचा आटापिटा करू लागते,
आज-काल फक्त कुटुंब नाही तर व्यक्ती -व्यक्ती एकमेकांपासून विभक्त झालेल्या आहेत, त्यामुळे कुणीतरी पाठीवरती हात ठेवणं महत्त्वाचं आहे, आईवडील आपल्या मुलांना सांगतात की बघ की आज मी होतो, म्हणून तुला या संकटातून वाचवले परंतु प्रत्येक वेळेस येणाऱ्या अडचणीच्या वेळेस मी तुझ्या सोबत तुझ्याबरोबर नसताना तू कशी अडचणी सोडवणार मी तुला लढण्याचं बळ देऊ शकतो,
परंतु लढावे तूलाचं लागणार आहे, त्यासाठी पालकांनी दिलेले बळ हे त्याच्या लढायचं खरंच सूत्र आहे, वयाच्या प्रत्येक टप्प्यावरती भाव भावनांचा अतिरेक होत असतो, त्यानुसार अशी वेळ एकदा तरी आयुष्यात व्यक्ती अनुभवतोच ज्यावेळेस व्यक्तीला पूर्णपणे खचल्यासारखे वाटते ,सर्व कार्य आता संपले याच्यापुढे आता काही नाही संपूर्ण वाटा इथे संपतात .
आपल्या इवल्याशा मनाला जेव्हा ते भावनांमध्ये गुंतलेले असते, खचलेले असते, तेव्हा फक्त नको टेन्शन घेऊ मी आहे ना तुझ्या सोबत ही शब्द जणू एखाद्या औषधासारखे काम करतात, आणि सर्व काही संपल असं वाटतं असलेली व्यक्ती पुन्हा आपली नवीन वाट शोधू लागते,
आणि नव्या दमाने त्यावरती प्रवास करायला सुरुवात करते, शब्द ही खूप मोठी ताकद आहे, शब्दाला धार नको तर आधार असला पाहिजे, कारण धार असलेले शब्द मन कापतात तर आधार असलेले शब्द मन जिंकतात, आयुष्यात आपल्याला कितीतरी नाती ही रक्ताने मिळालेली असतात, काही आपण जोडलेली असतात तेव्हा कधीतरी मार्ग दिसत नाही आयुष्याच्या वाटेवर काही सुचत नाही, त्याच वेळेस कोणीतरी आपल्याला फिकर नॉट मी आहे ना, हा विश्वास देणारी व्यक्ती भेटली ना,मग आयुष्यात तक्रारी नाही, उभारी मिळतं जाते ,
जशी आपल्याला गरज आहे, तसेच आपणही कुणाला हा आधार हा विश्वास देऊ शकतो का?? हे सुद्धा स्वतःला विचारून पहावे, कारण की आपण कुणाच्या आयुष्यात जागा कमावली आहे, किंवा तो विश्वास देण्यापर्यंतची पात्रता आपण पार केलेलु आहे का? हे नक्कीच तपासायला हवे, कारण की प्रत्येक वेळेस आधार शोधण्यापेक्षा आपण कुणाचा आधार होऊ शकतो का? हे बघितले पाहिजे ,
आधाराची गरज प्रत्येकाला असते फरक फक्त इतकाच आहे आजची वेळ समोरच्या व्यक्तीची असेल, तर उद्या आपली असेल, याचं खूप मोठं कारण आहे मित्रांनो की आपण जरी स्वतःला खूप स्ट्रॉंग आणि प्रत्येक गोष्टी मध्ये बॅलेंसिंग करणारे म्हणवत असलो, तरी आपण माणूस आहोत मशीन नाही , आपल्याला त्या भावना आहेत, ज्या माणूस म्हणून आपल्याला गरजेच्या आहेत, प्रत्येकाला दुःख होते ,राग येतो, आनंद होतो, सर्वच त्या वेळ आणि काळाप्रमाणे बाहेर येतात, इतकेचं.
प्रत्येक वेळेस परिस्थिती सारखी नसतेचं, त्यामुळे मी आहे ना नको टेन्शन घेऊस अशी व्यक्ती आयुष्यात नक्की असावी , आणि आपली सुद्धा कुणाच्यातरी आयुष्यात ती जागा असावी.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

लेख आवडला
खूप मोलाचा