Maturity म्हणजे त्रास दिलेल्या व्यक्तीला पुन्हा त्रास न देता त्या व्यक्तीची परिस्थिती समजून घेणे.
मेराज बागवान
Maturity…..Maturity…..काय असते ही Maturity…?
म्हणायला सोपी पण समजून घ्यायला तितकीच खोल.सोप्या भाषेत म्हणायचे तर,Maturity म्हणजे कोणी त्रास जरी दिला तरी तो समजून घेणे आणि त्या व्यक्तीला आपल्याकडून काही त्रास होणार नाही याची खबरदारी घेणे.त्याची बाजू समजून घेणे,त्याची परिस्थिती समजून घेणे.नाहीतर होत काय, ज्या व्यक्तीला कोणी कसलाही त्रास दिला असेल तर ती व्यक्ती लगेच सुडाची भावना घेऊन उठते.पण हे Maturity ला धरून नसते.Maturity म्हणजे त्रास दिलेल्या व्यक्तीला पुन्हा त्रास न देता त्या व्यक्तीची परिस्थिती समजून घेणे.
जगात निरनिराळ्या संस्कारात वाढलेल्या व्यक्ती असतात.प्रत्येकाची maturity देखील वेगवेगळ्या पातळीची असते. काही जण वयाने कितीही मोठे झाले तरी देखील त्यांना तेवढी समज नसते,जेवढि त्यांच्यापेक्षा वयाने कमी असणाऱ्या व्यक्तीची असते.तसा वयाचा आणि maturity चा संबंध असतोच असे नाही.आयुष्य जगत
असताना maturity खूप महत्त्वाची असते.असंख्य त्रास माणूस भोगत असतो.पण म्हणून Maturity सोडून वागणे हितकारक नसते.
‘मानसी’ एक गुणी मुलगी.स्वतःच्या पायावर उभी असलेली.नोकरी करत ,स्वतःचे आयुष्य आनंदात जगणारी,सर्वांना नेहमी मदत करणारी अशी ही मानसी.अचानक तिची ओळख एकदा ‘कबीर’ शी होते. दोघांची मैत्री होते.कधीही कोणत्याही मुलाशी मन मोकळेपणे न बोलणारी मानसी, कबीर च्या मात्र प्रेमातच पडते. तो तिला आवडू लागतो.कबीर मात्र तिच्याशी अगदी नॉर्मल बोलत असे,म्हणजेच त्याच्या मनात तिच्या विषयी त्या भावना नव्हत्या.तो त्याच्याच आयुष्यात मग्न असे.मानसी विषयी त्याला विशेष असे काही वाटत नसे.किंबहुना त्याला त्याच्या अनेक जबाबदाऱ्या होत्या आणि त्यातून त्याला दुसरे काही दिसतच नसे.
आणि यामुळेच त्याला अडचणी देखील अनेक होत्या. मग त्या आर्थिक असतील किंवा मग इतर कौटुंबिक.मानसी त्याला प्रत्येक गोष्टीत मदत करीत असे.कबीर देखील तिला अनेकवेळा काही काम असले की तिच्याशी बोलत असे.पण जणू काही कामापूरतच.मानसी देखील प्रत्येकवेळी समजून घेत असे.असेच अनेक दिवस चालले होते.
मग एके दिवशी मानसी ने कबीर ला स्वतःच्या मनातील तिच्या भावना कबीर कडे व्यक्त केल्या.”कबीर मला तू आवडतोस, मी नेहमी तुला साथ देईन,किती जरी अडचणी आल्या तरी शेवटपर्यंत मी तुझ्या सोबत असेन.तू काळजी का करतोस,मी आहे ना…लग्न करशील माझ्याशी..?”.कबीर मात्र काहीच बोलला नाही.तो त्याच्याच आयुष्यात मश्गुल होता. त्याने पुन्हा त्याच्या काही समस्या मानसी पुढे मांडल्या. “मानसी तू मला जज करीत आहेस का? म्हणजे तुला माझ्या समस्या समजत आहेत.पण तुला वाटत आहे ना की हे सर्व संपल की मी निघून जाईल आणि तू म्हणून मला आताच हे सगळं बोलत आहेस ना.तू मला मदत ह्यासाठीच तर करीत नाहीस ना,की ,मी तुला लग्नासाठी होकार द्यावा म्हणून.
प्रेम काही विकत नाही घेता येत.तू हे सगळं नाटक तर नाही ना करत,माझी काळजी करण्याचं, मला तर हे सर्व खोटंच वाटत आहे. तुला माझं attention मिळवायचं आहे.तू कशी ग्रेट आहेस हे तुला माझ्याकडून वदवून घ्यायचं आहे.मला ना तुझं हे सगळं वागणं खोटं वाटत आहे.आणि माझ्या ह्या सर्व समस्यांमधे तू संधी शोधत आहेस की, ही समस्या सुटली की बघू हा मला हो म्हणतोय की नाही ते. नको मला तुझे उपकार”
एका क्षणात कबीर हे सर्व बोलून जातो.दुसरीकडे मानसी त्याला म्हणते ,”तू समजत आहेस अस काही नाहीये”.आणि ती पुढे बोलणार इतक्यात कबीर तिथून निघून जातो. आणि मानसी चे पुढचे काहीच ऐकून घेत नाही.मानसी खूप रडते.रात्री झोपताना विचार करते.”कबीर ला काय झालंय.त्याला बहुतेक काही तरी समस्या असणार.उगाच मी बोलले.तो इतका अडचणीत आहे आणि मीच माझं घेऊन बसले.माझंच चुकलं.देवा मी हे काय करून बसले.उद्याच्या उद्या कबीर ला फोन करते आणि त्याची माफी मागते”
ठरविल्याप्रमाणे मानसी कबीर ला फोन करते.”कबीर, सॉरी काल मी तुला हे सगळं बोलायला नको होतं.मी फोर्स केला ना तुला.पुन्हा पुन्हा सॉरी”. कबीर विशेष अस काही बोलत नाही आणि पटकन फोन ठेवून देतो, तो कायमचाच.तो तिच्याशी पुन्हा कधीच संबंध ठेवत नाही.आणि मानसी देखील मनाशी पक्के करते की,कबीर ला पुन्हा कधीच त्रास द्यायचा नाही.आणि ती त्याच्या आयुष्यातुन निघून जाते.पण आजही ती तो खुश असावा हीच प्रार्थना देवाकडे करत आहे.
ह्या उदाहरणात ,मानसी खूप सरळ स्वभावाची मुलगी आहे.तिला जे वाटत होतं कबीर विषयी ते ती पटकन बोलून जाते.तीच मन निर्मळ आहे.ती इतरांच्या समस्या समजते.आणि तिने जर का कबीर ला साथ दिली तर त्याचा त्रास थोडा कमो होईल असे तिला वाटत असते.म्हणून तिला त्याच्याशी लग्न कारायचे होते.कबीर चा त्रास तिला पाहवत नसे,तो खुश राहावा इतकेच तिला वाटत असे.पण कबीर ने मानसीला समजून घेण्याचा प्रयत्न देखील केला नाही.मान्य आहे त्याला प्रचंड त्रास होते,पण ह्यात मानसी ची काय चूक होती.ती तर बिचारी निस्वार्थी पणे त्याच्यावर प्रेम करीत होती,त्याला मदत करीत होती.पण कबीर ने याचा अर्थ काही वेगळाच घेतला.
आणि तरी देखील मानसी ने maturity दाखविली आणि पुन्हा त्याला कधीच डिस्टर्ब केले नाही,उलट ती देवाकडे त्याच्या सुखासाठी प्रार्थना करीत राहिली आणि तिने असाच विचार केला की ,”कबीर च्या आयुष्यात खूप अडचणी आहेत आणि कदाचित मी ह्या सगळ्यात अडसर ठरेल.”म्हणून स्वतःला प्रचंड मानसिक त्रास होत असला तरी देखील तिने पुन्हा काहीच कबीर शी संपर्क साधला नाही.कारण तीने कबीर ची परिस्थिती ,अडचण समजून घेतली होती.किंबहुना इथे खरे तर कबीर चुकीचा वागला होता आणि मानसी ला त्याने दुखावले होते.तिच्या भावना दुखावल्या होत्या.अडचणी कितीही असतील कबीर च्या आयुष्यात,पण मानसी च्या भावना दुखवण्याचा अधिकार त्या प्रतिकूल परिस्थितीने देखील कबीर ला दिला नव्हता.पण कबीर ने शेवटी भावनांचा खेळच केला. मात्र शेवटी मानसीच matured ठरली.
असे एक ना अनेक प्रसंग,घटना प्रत्येकाच्या आयुष्यात घडत असतात.जो माणूस स्वतःला इतरांनी त्रास का दिला,त्यांची परिस्थिती समजून घेतो तोच खरा matured असतो.अशी मानसिकता असणे देखील आज गरजेचे बनले आहे. यामुळे स्वतःचे मानसिक आरोग्य देखील जपले जाते आणि एक प्रकारची आत्मिक शांती लाभते.तुम्ही म्हणाल,ज्यांनी आपल्याला त्रास दिला त्यांच्याशी इतकं चांगलं कस वागायचं.तो त्रास कसा विसरायचा. आणि आपण असा विचार करून इथेच चुकतो.
इतरांनी दिलेला त्रास सतत लक्षात ठेवून आपण स्वतःलाच त्रास देत असतो.त्या व्यक्तीला तर या विषयी काहीच देणे घेणे नसते.ती तीच आयुष्य मजेत जगत असते. अगदी आपण काही न केल्याच्या अविर्भावात.त्यामुळे आपण देखील ते सगळं विसरून,सोडून देऊन आयुष्यात पुढे जायला शिकले पाहिजे.बाकी ती नियती,तो देव,ते नशीब,तो निसर्ग आहेच की सर्व गोष्टींचा हिशोब ठेवायला.तो त्याचं काम योग्य वेळेवर अगदी चोखपणे बजावत असतो.आपण त्यात काही हस्तक्षेप न केलेलाच बरा……
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

