Skip to content

मानसिक आजारांचे हे काही परिणाम आपल्या शरीरावर होतात.

मानसिक आजारांचे हे काही परिणाम आपल्या शरीरावर होतात.


काव्या धनंजय गगनग्रास

(समुपदेशक)


आरोग्य अस जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर अनेकदा आपलं शारीरिक आरोग्यच येत. आपण शारीरिकदृष्ट्या किती मजबूत आहोत, आपल्याला कोणतीही शारीरिक व्याधी नाही म्हणजे आपलं चांगल आरोग्य आहे असा आपला समज असतो. पण आरोग्याची मर्यादा फक्त इथपर्यंत नाही. त्याच्या पलीकडे जाऊन यात अनेक गोष्टी येतात.

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने (WHO) आरोग्याची व्याख्या अशी केली आहे. “Health is a state of complete physical, mental and social well-being and not merely the absence of disease or infirmity.” आरोग्य म्हणजे केवळ रोगांचा अभाव नसून ती एक शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि अध्यात्मिक समतोलाची अवस्था आहे.”

त्यामुळे आरोग्य म्हटल्यावर आपण फक्त शारीरिकदृष्ट्या कसे आहोत हे फक्त न पाहता आपण त्याचबरोबर मानसिक दृष्ट्या किती भक्कम आहोत? आपल्याला आपल्या क्षमता नीट ओळखता येतात का? एखाद्या कठीण प्रसंगी आपण न डगमगता धीराने त्याचा सामना करू शकतो का? माझ्या भावना मला नीट हाताळता येतात का? माझे सामजिक संबंध कसे आहेत? इतरांशी माझे नातेसंबंध कसे आहेत? या सर्व गोष्टी पण विचारात घेतल्या पाहिजेत. या सर्व गोष्टी जर नीट असतील तर अस म्हणता येईल की हा माझं आरोग्य चांगल आहे. आता हा सर्व विचार का करायचा आहे? कारण तस पाहिलं तर या तिन्ही गोष्टी वेगळ्या दिसतात. पण खरच तस आहे का? तर नाही!

दिसायला जरी या गोष्टी वेगवेगळ्या दिसत असल्या तरी या एकमेकांशी जोडलेल्या आहेत. या तिन्ही गोष्टी एकमेकांवर परिणाम करत असतात. म्हणूनच दीर्घ शारीरिक आजाराने त्रस्त असलेली व्यक्ती उदासीनतेकडे झुकते, तसच इतर माणसांकडून दुरावली गेलेली व्यक्ती नैराश्यात जाण्याची शक्यता असते, बऱ्याच अंशी जाते. आपल्या ओळखीत अशी माणसं असतात जी कोणत्यातरी शारीरिक आजाराने त्रस्त असतात. आणि तो त्रास त्यांचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन नकारात्मक करून टाकतो. आपल्या बाबतीतही हे होत. हे जसे शारीरिक आजार आपल्या मनावर परिणाम करतात तसेच मानसिक आजार ही असतात जे आपल्या शरीरावर परिणाम करतात कारण या गोष्टी आपल्यातच आहेत.

नैराश्य म्हणजेच डिप्रेशन हा एक मानसिक आजार आहे. यामध्ये व्यक्तीचा स्वतःकडे, इतरांकडे आणि परिस्थितीकडे पाहण्याचा दृष्टिकोनच नकारात्मक होऊन जातो. कोणाकडूनही आशा उरत नाही. कश्यातही आनंद वाटत नाही. आता या मानसिक आजाराचे शरीरावरपण परिणाम होतात. झोपेवर याचा मोठा परिणाम होतो. झोप न लागणे किंवा लागली तरी लगेच जाग येणे, विस्कळीत असणे, थकवा, भूक लागली तर खूप लागते किंवा लागतच नाही, वजन वाढणे किंवा खूप कमी होणे. असे शारीरिक परिणाम दिसून येतात.

इन्सॉम्निया हा झोपेशी संबंधित आजार आहे पण याची मुल मानसिक आहेत. यात झोपेचे चक्रच बिघडून जाते व त्याच्या व्यक्तीच्या रोजच्या आयुष्यावर परिणाम होतो. ह्या आजार मध्ये चिंता, नैराश्य या सारख्या मानसिक आजारांचा समावेश असतो. चिंतेशी संबधित ज्यांना आजार असतात त्यांच्यामध्ये panic attacks येण्याचं प्रमाण दिसून येत. पोटाच्या समस्या जाणवतात कारण चिंता ही नेहमी आपल्याला पोटात आधी जाणवते. यातही झोपेवर परिणाम होतो. ज्यांना खूप जास्त राग असतो, तसे मानसिक आजार असतात त्यांच्यामध्ये high BP, तसेच हृदयाशी जोडलेले आजार असतात.

रागाचा हृदयावर जास्त परिणाम होतो, त्यांना हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण जास्त असत. बुलेमिया, anaroxia narvosa हे खाण्याशी संबधित असलेले मानसिक विकार आहेत. यात व्यक्ती खूप जास्त प्रमाणात खाते. याचा शरीरावर परिणाम होतो. थकवा, चक्कर आल्यासारखं वाटणे हे सर्व जाणवत. जेव्हा एखाद्या मानसिक आजाराने शारीरिक व्याधी जडते, शरीराचं चक्र बिघडत तेव्हा त्याला मनोकायिक आजार असे म्हणतात. मानसिक आजाराचा शरिरावर होणारा परिणाम. असे अनेक मानसिक आजार असतात ज्यांचा आपल्या शरीरावर परिणाम होतो.

म्हणूनच अस बऱ्याचदा होत की आपल्याला काहीतरी शारीरिक त्रास जाणवतो आणि आपण डॉक्टरकडे जातो पण तिथे शरीरात काहीच कमी जास्त झालेलं नसत त्यामुळे डॉक्टरला देखील काही औषध देता येत नाहीत. हे अस का होत? कारण याची कारणं आपल्या मानसिकतेत असतात.

म्हणूनच जर आपल्याला निरोगी आयुष्य जगायचं असेल तर आपल्या शरिराबरोबर आपल्या मनाचीही काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी चांगले विचार करण, आपला दृष्टिकोन बदलणे, चांगले नातेसंबंध जोपासणे, व्यायाम, चांगला आहार, पुरेशी झोप या सर्व गोष्टी ध्यानात ठेवल्या पाहिजेत. या तिन्ही गोष्टींमधे समतोल राखला पाहिजे. तर आपलं आरोग्य चांगल राहील.


मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽क्लिक करा👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “मानसिक आजारांचे हे काही परिणाम आपल्या शरीरावर होतात.”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!