Skip to content

माणसं बदलली असं हिनवण्यापेक्षा त्यांच्यावर ती वेळ का आली, याचा शोध नक्की घ्या.

माणसं बदलली असं हिनवण्यापेक्षा त्यांच्यावर ती वेळ का आली, याचा शोध नक्की घ्या.


मयुरी महाजन


हल्ली बऱ्याचदा कुणीतरी असं बोलताना आढळतचं, की तू खूप बदललास / बदललीस पहिल्यासारखा नाही राहिलास तू, हल्ली खूप बदललास तू बाबा मोठा माणूस झालाय ना बदलणारच…. मित्रहो ही संभाषण आपण आपल्या आजूबाजूला बऱ्याचदा ऐकतो, परंतु त्या मागची खरी पार्श्वभूमी बघण्याचा आपण कधी प्रयत्न करत नाही, आयुष्यात कुठलीही व्यक्ती ही सहजासहजी बदलत नाही, त्याच्या आयुष्यात काही घटनाचं अशा घडतात ,ज्या व्यक्तीला पूर्णपणे बदलून टाकतात, जीवनाची वाटचाल ही वाटते तितकी सोपी नाही , कुणीतरी बदललं हे सर्रास म्हटलं जातं, पण ते का बदललं, या मागची कारण मात्र खूप कमी जणांच्या लक्षात येतात, कुणालाही चुकीचे समजण्या अगोदर त्याची परिस्थिती आधी समजून घेणे गरजेचे आहे,

चटकन आणि पटकन विश्वास ठेवणारा माणूस, जेव्हा जवळच्या व्यक्तीकडून दुखावला जातो, त्याने ठेवलेल्या विश्वासाला जेव्हा तडा जातो , तेव्हा व्यक्ती बदलते, मग ते पहिल्यासारखी राहत नाही, हळूहळू आतल्या आत बदलू लागते, पहिल्यासारखी आता कुणावर विश्वास ठेवायला विचार करत असते,

माणूस बदलतो हे जरी खरं असलं, तरी तो सहजासहजी बदलत नाही हेही खरं आहे, माणूस तेव्हाच बदलतो, जेव्हा काही गोष्टी त्याला बदलायला भाग पाडतात, जीवनाच्या प्रवासात माणसाची होणारी जडणघडण ही त्याला पदोपदी बदलवत जाणारी असते, रोजचा प्रवास, रोजच्या समस्या, रोजचे आलेले अनुभव, रोजच नव्याने उद्भवणारे प्रश्न ,माणसाला भाग पडतात, बदलायला …

संघर्ष माणसाच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे, फरक फक्त इतकाच की प्रत्येक व्यक्तीच्या संघर्षाच्या वाटा वेगवेगळ्या आहेत, कुणी आर्थिक बाबतीत संघर्ष करतोय ,कोणी मानसिक, कुणी शारीरिक ,आपल्या धष्टपुष्ट शरीराला आलेले अपंगत्व, व्यक्ती त्याच्याशी सुद्धा संघर्ष करतेचं…

माणूस बदलतो आणि बदलणं हा माणसाचा स्वभाव असला पाहिजे, आणि एक नेहमी ध्यानात घ्यावं वेळ आणि काळ प्रत्येकाची बदलते ,आणि वेळच अशी गोष्ट आहे, जी माणसाला बदलवते ,माणसं बदलली असं म्हणून हिणवण्यापेक्षा त्यांच्यावरती ती वेळ का आली, याचा शोध नक्की घ्यायला हवा, कारण माणूस हा असाच नाही बदलत, त्याच्या आयुष्यातली वेळच त्याला बदलून टाकते ,जसं आपण म्हणतो, जीवन हे ऊन सावलीचा खेळ आहे, व ते तितकंच सुखदुःखांनी भरलेलं पात्रही आहे, हजारो असंख्य दुःखाच्या कहाण्या ह्दयात ठेवून आनंदाचा एकही क्षण वाया न घालवणे, हाच खरा रोल आहे,

कोटींच्या लोकसंख्येत कितीतरी माणसे आपापल्या दुःखाला कवटाळून निघून गेलीत ,काही झुंज देत आहे, सर्व काही असूनही काही हळहळत आहेत, काही मात्र कालच्या पेक्षा आज दोन घास ताटात आले, म्हणून समाधानी आहेत,

सारंग आणि त्याचा पूर्ण परिवार एक मध्यमवर्गीय कुटुंबातील व्यक्ती ,रोजच्या जगण्यात नाविन्य नसलं, तरी एकमेकांची साथ कायम ,लहानपणापासून लाडात वाढलेला सारंग तारुण्यात येतो, आणि बापाच्या डोक्यावर झालेले कर्ज दिसत नसलं, तरी बाप आहे हा धीर होता, परंतु अचानक कर्जाच्या टेंशन ने बाप आत्महत्या करतो ,आणि संपूर्ण परिवार आहे तिथेच कोसळतो, सारंग लाडात वाढलेला त्याच्या पायाखाली जमीन सरकते ,आता त्याला एक एक रुपयाची किंमत कडू लागते,

सर्वांकडून लाड करून घेणारा सारंग आता शांत राहू लागला, आपल्या घराच्या जबाबदारीसाठी एक एक रुपयापासून विचार करू लागला, आई व बहिणीची जबाबदारी ही आपली आहे ,असं स्वतःला समजावत स्वतःच्या इच्छा मारू लागला ,स्वतःच्या स्वप्नांपासून व इच्छा शोक मोजमजा यापेक्षा आता सारंग आपल्या जबाबदाऱ्या व आपली घराप्रती असलेली भूमिका याविषयी विचार करू लागला, घराचा आधार गेला, तरी घराला धीर आपणच दिला पाहिजे, असे वाटू लागले,

माणसाच्या काळजाला लागलेल्या गोष्टी दिसत नसल्या तरी त्या माणसाला बदलतात, व माणूस बदलतो, तू बदललास असं तर सहज म्हणून जातात माणसं, परंतु ही बदलण्याची वेळ कशामुळे आली, हे समजले तर माणूस माणसाला चुकीचे समजणार नाही, म्हणून ते म्हणतात ना …
“किसी को गलत समझनेंसें पेहलें,

उसके हालात जरूर समझ लेना…


मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!