मनात येणारे उलटसुलट विचार आपण कधीच पूर्ण थांबवू शकत नाही, माहितीये का?
काव्या धनंजय गगनग्रास
(एम.ए. समुपदेशन मानसशास्त्र)
मन वढाय वढाय उभ्या पीकांतलं ढोर
किती हांकला हांकला फिरी येतं पिकांवर।।
बहिणाबाईंच्या या काव्यपंक्ती आपल्याला कमी शब्दात खूप काही सांगून जातात. माणसाचं मन उलगडून सांगतात. बहिणाबाईंनी मनाला गुराची उपमा दिली आहे. अस गुर जे कितीही हाकललं तरी पुन्हा पिकावर येत. ते थांबत नाहीये. आता हे मन नेमके कुठे किंवा फक्त मन अस शोधायचं कुठे अस म्हटल तर ते आपल्याला सापडणार नाहीये. कारण मन म्हणजे काही एक अशी गोष्ट नाहीये. ते मिश्रण आहे. कसल मिश्रण? तर आपल्या विचार, भावना, वेदना, संवेदना, स्मृती यांचं ते मिश्रण आहे. ज्या वेगवेगळ्या वेळी आपलं काम करत असतात. तर अस हे आपलं मन आहे. तर या मनात येणारे हे जे विचार आहेत तेच एखाद्या गुराप्रमाणे आहेत. आपण म्हणतो देखील, हे विचार मी कितीही घालवायचा प्रयत्न केला तरी ते येतच राहतात. डोक्यातून जातच नाहीत.
म्हणूनच हे त्या गुरा धोराप्रमाणे आहेत जी पिकावरून हटतच नाहीत. तर अश्या या मनात येणारे हे विचार; यांना वेळेचं काही अंकगणित नसतच. इतके ते एखादा प्रसंग घडल्यावर क्षणार्धात येत असतात. इतके ते गतिशिल असतात. दिवसातून आपण कसा आणि कितीवेळा विचार करत असतो याच मोजमाप करण कठीण आहे.
आता हे जे विचार आहेत ते काही दर वेळी चांगले आपल्याला हवे तेच येतात का? तर नाही. विचार हे अमर्याद आणि असंख्य प्रकारचे असतात. क्षणा क्षणाला बदलत असतात. त्यामुळे ते कोणत्याही प्रकारचे असू शकतात. चांगले, वाईट, निरर्थक, उलट सुलट कसेही विचार आपल्या मनात येऊ शकतात. आपलं त्यावर नियंत्रण असत नाही आणि असू शकत नाही. पण विचार येणं आणि विचार टिकवण यात खूप फरक आहे.
आपल्याला कितीही वाटत असलं तरी आपल्याला त्या येणाऱ्या विचारांनी त्रास होत नसतो. विचार येणं ही त्रास होण्याची फार फार सुरुवात असते. तो त्रास वाढतो तो ते विचारावर अधिक विचार केल्याने वाढतो.
सीबीटी थेरपिस्ट अरोन बेक यांनी सांगितल्याप्रमाणे मानसिक त्रास टिकून राहण्यामागे विचारांची भूमिका मोठी आहे. ती कोणत्या अर्थाने? तर जेव्हा आपल्या मनात उलट सुलट विचार येतात तेव्हा आपण त्यांना घालवायचा प्रयत्न करतो किंवा त्यावर अजून जास्त विचार करतो, अप्रत्यक्षपणे अजून टिकवतो, अस म्हणून की हे विचार आलेच नाही पाहिजेत, मला याचा खूप त्रास होतोय. अस त्या विचारांना झिडकरायाच्या प्रयत्नात ते पुन्हा पुन्हा येतात आणि आपला त्रास वाढतो.
इथे आपले ते विचार स्वीकारायची सहनशीलता कमी असते. ज्याला त्रासाची असहनशिलता कमी असते. आपण ते विचार सहन करत नाही म्हणून त्रास सुरू होतो. म्हणून हा त्रास कमी करण्यासाठी आपल्याला आपला हा जो irrational belief ahe तो काढला पाहिजे. पहिला म्हणजे आपला अट्टाहास की असे विचार येऊच नयेत आणि दुसरा आले तर मी सहन करू शकत नाही. जर आपण डिमांड कमी केली तर आपण पुढचा त्रास टाळू शकतो.
कारण हे येणारे विचार आपल्याला बदलायचे असतील तर त्याला आधी स्वीकारायला पाहिजे. जसं आहे तसं स्वीकारायला पाहिजे. आपल्या मनात कोणत्याही प्रकारचे विचार येऊ शकतात. त्यावर आपलं नियंत्रण नाही. पण ते पुढे न्यायचे की सोडून द्यायचे ते आपल्या हातात आहे. तसचं ज्या विचारांनी आपल्याला त्रास होतो अस वाटत ते पण न नाकारता स्वीकारता आले पाहिजेत. तापाचे उपचार घेण्यासाठी आधी ताप आलाय हे स्वीकारावं लागतं जर तेच आपण नाकारलं तर उपचार पुढेच जाणार.
विचारांच पण तसचं आहे. आपल्या मनात येणारे विचार आपण कधीच थांबवू शकत नाही. पण आपण त्यांना स्वीकारून बदलू मात्र शकतो.
माईंडफुलनेसमध्ये वर्तमानावर भर दिला जातो. आपण आता आहे त्या क्षणात जगल पाहिजे, स्वतः ला अधिकाधिक समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हे सर्व शांतपणे स्वतः च्या श्वासावर लक्ष देऊन करायचे काम आहे. इथे पण विचार येणारच आहेत. बाकी हालचाली होणारच आहेत. पण यात हे सर्व आहे तस स्वीकारणं अपेक्षित आहे. या सर्वांना तटस्थपणे चांगल्या वाईट या तरोजुत न तोलता पाहणे अपेक्षित आहे. तर आपण स्वतःला चांगल्या पद्धतीने ओळखू शकतो.
हे जितकं आपण चांगलं करू लागु तेव्हा आपल्याला हळू हळू आपल्या विचारांना non judgemental होऊ स्वीकारता येईल आणि जिथे गरज आहे तिथे त्यांना चांगल्या healthy विचारांनी बदलता येईल.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

Khup chan kavya mam
लेख आवडला