मनाने कणखर असलेल्या व्यक्ती रात्री झोपताना आपल्या हळव्या भावना चाळत असतात.
टीम आपलं मानसशास्त्र
व्यक्ती तितक्या प्रकृती असे म्हणले जाते. कोणी खूप हळव्या असतात सर्वांच्या समोर पटकन रडून , बोलून , कोणाच्या घट्ट मिठीत शिरून ,कोणाच्या खांद्यावर डोके ठेवून , तर कोणाशी चेष्टा मस्करी करून विषय बदलून ,व्यक्त होतात.
कोणी भावनिक , हळवे असेल तरी कठीण परिस्थितीत ही संयम बाळगून असते. तर कोणी मनाने कणखर असलेल्या व्यक्ती प्रसंगी व्यवहारिक वागून , कठोर वागून नंतर रात्री झोपताना एकांतात मात्र मोकळे होतात मग कधी रडून, भावनांचा मागोवा घेवून, कधी हळव्या भावना चाळत असतात.
ईशा ऑफिस मधून घरी आली तर रिया आणि जिया दोघी ही प्रचंड भांडत होत्या . म्हणून ईशा जरा वैतागली. आल्या आल्या दोघींची भांडणे सोडविण्यासाठी धडपडू लागली. पण रिया आणि जिया अजूनच जास्त भांडू लागल्या. ईशा त्यांचे भांडण आधी खूप शांतपणे , समजावून सांगून सोडविण्याचा प्रयत्न करत होती. पण त्या दोघी मात्र अधिकाधिक भांडू लागल्या. मग मात्र ईशा सारखी प्रेमळ आई ही अधिक कणखर होवू लागली आणि तिने रिया आणि जिया दोघींना एकदम जोरात पाठीत दोन रट्टे घातले. तेव्हा जिया आणि रिया अचानक आईच्या दोन धपाटे खाल्ल्याने रडायला लागल्या. मग परत ईशाने दोघींना जवळ घेतले. शांत केले. आणि मग आपल्या घरकामाला लागली. मुलींना जेवू खावू घालून झोपविले.
मनाने कणखर असलेली ईशा ही रात्री झोपताना मात्र आपल्या भावना कंट्रोल करू शकली नाही. एक एक घटना आठवत गेल्यावर मग आपण स्वतः वरचा कंट्रोल का घालवला. पण त्याक्षणी मुलींना कंट्रोल करण्याकरिता काही तरी ठोस action घेणे जरुरी वाटले म्हणूनच आपण असे केले असा विचार ही करून . मग मात्र तिच्या मातृत्वाच्या भावना ज्या तिच्या छोट्या मुली आणि तिच्या मधल्या हळव्या भावना , जागृत होवून तेव्हा मनाने कणखर होवून ही आपण पहिल्यांदाच आपल्या मुलीं डिस्टर्ब होतील असे वागलो , मुलींचा आपल्या वरचा दृढ विश्वास कुठे कमी नाही ना होणार याची काळजी वाटू लागली. तिच्या आपल्या हळव्या भावना चाळत गेल्या. आणि यापुढे भावनिक दृष्टया , मानसिक दृष्ट्या आपले संतुलन बिघडू द्यायचे नाही असे मनान पक्के करत गेली. त्यातून मनाने अजून कणखर होण्याचे निश्चय केला.
असेच अनेक लोकांचे होते. परिस्थिती , वेळ , व्यक्ती यानुसार काही वेळेस मनाने कणखर राहावे लागते . काही मनाविरुद्ध ही निर्णय घ्यावे लागतात.
जसे एखाद्याचे दीर्घ आजारपण , ऑपरेशन , व्यवसायात येणारी critical condition अशावेळी मनाने कणखर राहून निर्णय घेणे गरजेचे असते. पण नंतर मात्र एकांतात , रात्री झोपताना या हळव्या भावना चाळत असतात. छळत असतात.
राजेश आणि रश्मी चे love marriage. दोघे ही खुप आनंदात होते. एकमेकांच्या आवडी निवडी जपत होते. भरपूर फिरणे , धमाल मस्ती , एकमेकांची काळजी ही घेत होते. एक छान मुलगा ही होता दोघांना. दीप ही आता सहावी मध्ये होता. सगळे छान सुरू होते.
अचानक राजेश ला ब्रेन हॅम्रेज झाले . त्याला हॉस्पिटल मध्ये व्हेंटिलेटर वर ठेवण्यात आले. दिवस जात होते .. त्याची कोणती ही हालचाल नव्हती. ब्रेन डेड झाला असे डॉक्टरांचे म्हणणे होते. केवळ व्हेंटिलेटर असल्यामुळे सगळे सुरू होते. डॉक्टरांनी रश्मी ला काही तरी निर्णय घे सांगितले. अकरा दिवसांनी शेवटी रश्मी ने मनाने कणखर होत निर्णय घेतला. व्हायचे तेच झाले. राजेश रश्मी आणि दीप ला सोडून कायमचा गेला.
सगळे झाल्यावर जेव्हा रात्र झाली तेव्हा एकांतात मात्र रश्मी चे मन खूप हळवे झाले. तिच्या राजेशच्या प्रेमाची सुरुवात, एकमेकांची जुळलेली मने , आवडी निवडी जपताना एकमेकांना देण्यात येणारे प्राधान्य, केलेल्या गमती जमती, सुख , आनंदी क्षण , सहली या सगळ्या आठवणींच्या त्या त्या क्षणांच्या हळव्या भावना जागृत झाल्या.
त्या कठीण परिस्थती मध्ये मन कणखर ठेवून निर्णय घ्यावा लागला असला आणि त्याचं परिणाम आयुष्यभर भोगावे लागणार असेल तरी त्याला पर्याय नव्हता.
पण तो परिस्थितीनुरूप निर्णय होता. ज्यात डॉक्टर ही हतबल झाले होते.
पण तिच्या राजेश बाबतच्या काही नाजूक भावना , हळव्या भावना या आता एकांतात तिला छळू लागल्या म्हणले तरी चालेल. सगळ्या चांगल्या घडलेल्या गोष्टी .त्यात ज्या कटू गोष्टीतून बाहेर पडलो तेव्हाच्या भावना sagle sagle हळवे क्षण , भावना, हळव्या भावना चाळत गेल्या.
असे अनेकांच्या जीवनात होते. कधी बढती , बदली तर कधी कामाच्या निमित्ताने दुसऱ्या गावात , शहरात , तर कधी दुसऱ्या देशात , परदेशात जावे लागते. अशावेळी दोघा जोडीदारांना काही काळ एकमेकांपासून दूर राहण्याची मनाची तयारी करावी लागते. तसे कणखर निर्णय घ्यावे लागतात. जरी रोज बोलणे , फोनवरून बघणे , मेसेज होत असतील तरी दुरावा असतो. मन जवळ असेल तरी शारीरिक दुरावा असतो. वेळेला एकमेकांची गैर उपस्थिती जाणवत असते.
दोघेही जोडीदार रोजचे दैनंदिन व्यवहार पार पाडत असतात. नोकरी , जबाबदाऱ्या , मुलांच्या जबाबदाऱ्या पार पाडत असतात पण रात्री झोपताना मात्र एकांतात एकटेपणाची जाणीव होते. आठवणी ,सहवास एकमेकांच्या विषयी चे प्रेम ,आपुलकी , ओढ , एकमेकांची काळजी , चिंता , संबंध , असतात. त्या भावना जागृत होतात. कधी शारीरिक संबंध तर कधी काही गोष्टीत असणारा physical presence आता नाही याची उणीव भासते. त्यातून एकमेकांच्या विषयी हळव्या भावना या चाळत असतात. छळू लागतात.
मनाने कणखर झालो तरी ते त्या वेळेची गरज असते म्हणूनच ना .. पण माणूस म्हणले की हळवे मन , भावना आणि त्यानुसार वर्तन ही होणारच.
म्हणूनच आपल्या सोबत असणाऱ्यांना समजून घ्या. त्यांच्या हळव्या भावना समजून घ्या . तुमच्या ही व्यक्त करायला शिका. त्यातून मन मोकळे होते. सकारात्मक होते.
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.
