Skip to content

मनाने हळव्या असणाऱ्या व्यक्तींना या गोष्टी जास्त आनंद देतात.

मनाने हळव्या असणाऱ्या व्यक्तींना या गोष्टी जास्त आनंद देतात.


हर्षदा पिंपळे


ज्या मनाला आपण हळवं समजतो, ते तुफान बलदंड आणि मस्तवाल असतं. त्याला पर्याय चालत नाही. त्याला हरवलेली वस्तूच हवी असते आणि दुरावलेली व्यक्ती ! -[व.पु. काळे]

आणि हळवं मन कुणाला बरं आवडत नाही ? हळव्या मनाची लोकं तर कित्येकांना फार हवीहवीशी असतात.तर अशीच काहीशी आपल्या आजुबाजुला वेगवेगळ्या प्रकारची हळवी माणसं सतत पिंगा घालत असतात.तर अशाच मनाने हळव्या असणाऱ्या व्यक्तींना कोण – कोणत्या गोष्टी जास्त आनंद देऊन जातात,कोणत्या गोष्टीत त्यांना जास्त रमायला आवडतं ते आपण काही गोष्टींमधून जाणून घेऊयात.

◆व.पु. काळेंनी म्हंटल्याप्रमाणे हळव्या मनाला दुरावलेली व्यक्ती, आणि हरवलेली वस्तू हवी असते.तर खरचं,हळवं मन अनेकदा वस्तूंमध्ये अडकलेलं असतं.एखादी हरवलेली आवडती वस्तू आणि दुरावलेली व्यक्ती जर पुन्हा आयुष्यात आली तर त्याचा आनंद अनोखाच असतो.

◆निसर्ग :

निसर्ग तसा सर्वांनाच आवडतो.आणि हळव्या मनाला तर निसर्ग जरा जास्तच जवळचा वाटतो.निसर्गाच्या सानिध्यात तासनतास रमणं,संथ वाहणारी नदी,संध्याकाळचा सूर्यास्ताचा सुंदर नजारा,पक्षांचा किलबिलाट,धुंद वाहणारा वारा,गुलाबी थंडी , चंद्र-चांदण्यांनी सजलेलं आकाश हळव्या मनाला अगदी सहजपणे भुरळ घालतं.हळवं मन अशा गोष्टींमध्ये सहजपणे रमून जातं.

◆पुस्तकं :

पुस्तकं, साहित्य हे हळव्या मनाच्या व्यक्तींना फार आवडतं.पुस्तकांच्या,कवितांच्या विश्वात ही हळव्या मनाची लोकं आनंदाने वावरतात.पुस्तकं हळव्या मनाला एक वेगळाच आनंद देतात.कविता, कथा हा त्यांचा आनंद असतो.

◆संगीत :

म्युझिक कसं सुखावणारं असतं.फार करून क्लासिकल म्युझिक हे हळव्या मनाला जास्त आनंददायी बनवतं.म्युझिक आणि हळव मन खरं तर एक वेगळच समीकरण आहे.

◆नृत्य : कथ्थक, भरतनाट्यम सारखे नृत्यप्रकार हळव्या मनाच्या लोकांना फार जवळचे वाटतात. अनेकदा कथ्थक, भरतनाट्यम करताना बेभान होणारी मनं ही हळव्या स्वरूपाची असतात. कथ्थक, भरतनाट्यम म्हणजे त्यांना एक वेगळा आनंद वाटतो.

◆विविध कला:

खरं तर प्रत्येकाच्या अंगी कोणती ना कोणती कला असते.परंतु आजूबाजूला पाहता वेगवेगळ्या कलेत मनापासून रमणारी लोकं ही बऱ्यापैकी हळवी असतात. रांगोळी,शिवणकला,विणकाम,चित्रकला, लेखन अशा गोष्टीत हळव्या मनाला मिळणारा आनंद हा एक वेगळाच अनुभव असतो.त्या आनंदाची व्याख्या करणं सहज सोपं नाही.

◆प्राण्यांशी हितगूज :

मनाने हळव्या असणाऱ्या लोकांना प्राणीही खूप आवडतात.त्यांना वेळप्रसंगी मदत करणं,खाऊ घालणं,मायेने गोंजारणं या गोष्टींमध्येही त्यांना खूप आनंद मिळतो.

◆इतरांना मदत करणे :

इतरांना वेळोवेळी मदत करणे,कोणत्याही संकटात किंवा कुठल्याही छोट्या मोठ्या गोष्टीत इतरांना मदत करण्यात त्यांचा आनंद असतो.

◆इतरांची मनापासून काळजी घेणं,त्यांना वेळप्रसंगी समजून घेणं, इतरांच्या आवडी निवडी जोपासणे अशा गोष्टींमध्ये हळव्या मनाला आनंद मिळतो.

◆जुन्या वस्तू,जुन्या आठवणींमध्ये हळव्या मनाचा आनंद असतो.प्राण्यांप्रमाणेच आठवणींशी हितगुज करण्यातही त्यांना आनंद वाटतो.

◆मित्रांसोबत वेळ घालवणे,कधी एकांतात निवांतपणा अनुभवणे,इतरांच्या चेहऱ्यावर हसू फुलवणे अशा गोष्टी करण्यात हळव्या मनाला जास्त आनंद मिळतो.

◆सुगंधी फुलं,एखादी छान प्रसन्न आणि शांत जागाही हळव्या मनाला वेगळाच आनंद देऊन जाते.

तर आजूबाजूच्या निरीक्षणातून अशा काही गोष्टी सहज समोर आल्या.हळवं मन सहजपणे कुठे आणि कशाप्रकारे रमून जातं, त्यांना सगळ्यात जास्त कशात आनंद वाटतो हे निरीक्षणातून समजायला सोपं गेलं.त्यांचा आनंद नेमका कशात असतो हे जाणून घेता आलं.तर वरील काही गोष्टी आहेत ज्यामुळे हळवं मन जास्त आनंदी असतं.किती छान आणि छोट्या छोट्या गोष्टीत यांना आनंद मिळतो.यांचा आनंद अगदी फुलपाखरातही असतो.कुणाच्या हसण्यात असतो,कुणाच्या आनंदात त्यांचा आनंद असतो.

मित्रांनो, तुमच्याही अवतीभवती असणारी हळवी मनं कशात जास्त आनंदी असतात त्याचं नक्की निरीक्षण करा.आणि तुमचा अनुभव काय आहे, तुमचा अनुभव काय सांगतो हे आम्हाला आवर्जून सांगा.तेवढच हळवं मन अजून कोणत्या कोणत्या गोष्टीत जास्त आनंदी असतं हे जाणून घेता येईल.हळव्या मनाला जाणून घेण्याची ही अनोखी पद्धत नक्की ट्राय करून पहा.

कदाचित यामुळे हळव्या मनाला चांगल्या प्रकारे समजून घेता येईल.


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!