Skip to content

तुमच्यावर सर्वच ब्लेमिंग गेम खेळत असतील तर अशावेळी काय कराल…???

तुमच्यावर सर्वच ब्लेमिंग गेम खेळत असतील तर अशावेळी काय कराल…???


आकांक्षा किरणराव आळणे


जेव्हा वाटायला लागतं सर्वच हातातून सुटत चाललंय,जेव्हा माणूस स्वतः मनाने कमजोर असेल; स्वतःच्या चुकांचे स्वतः जबाबदारी घेण्यात एखाद्या व्यक्तीमध्ये धैर्य नसेल तेव्हा माणसं माणसांशी ‘ब्लेम गेम’ खेळायला लागतात….!!!

अनेक भावनिक लहरी येत जात राहतात आपल्या मनात;आपल्या डोक्यात. ‘कभी खुशी कभी गम’ असे आयुष्य असते. चुका होतात आपल्या हातून मग आपण दुःखी होतो. कधी नकळत चूक घडते, कधी कधी माहिती असते की आपण चुकतोय कुठेतरी;तरीपण आपण स्वतःला जाब विचारत नाही आणि मग परिस्थितीला किंवा दुसऱ्या व्यक्तीला दोष देणे सुरू करतो-‘ब्लेम गेम’ खेळतो. याप्रमाणेच कधी-कधी परिस्थिती उलटही असते; समोरचा आपल्याला दोष देत असतो.

समोरच्याच्या आयुष्यात काही जरी झाले तरी आपणच कारणीभूत असतो. किती हास्यास्पद बाब आहे ही की आयुष्यात काही चुकीचे घडले तर ब्लेम खेळून मोकळे व्हायचे समोरच्या व्यक्तीवर त्या वाईट परिस्थितीचे ‘बिल फाडायचे’.अशावेळेस आपण खरंच काय करावे हे सांगणे जरा कठीणच. तरीही आपली भूमिका ही स्पष्ट हवी.

1- समोरच्या व्यक्तीला आरसा दाखवा म्हणजेच समोरच्या व्यक्तीला त्याची नेमकी कुठे चूक झाली हे प्रेमाने समजावून सांगायचे.सत्य हे ‘बोचर’च असतं त्यामुळे प्रेमाने सांगितले तरी ते त्या व्यक्तीला वाईटच वाटणार आहे पण समजावून सांगणं खरंच आवश्यक आहे.

2- प्रत्येक जण आपापल्या आयुष्यासाठी जबाबदार असतो हे आयुष्याचं परम सत्य आहे ही बाब ब्लेम गेम खेळणाऱ्या व्यक्तीला परखडपणे सांगणे आवश्यक आहे.

3- परिस्थिती कशीही असली तरी त्यावर react कसे करायचे हे ज्याच्या त्याच्या हातात असतं आपल्यातील अनेक जण परिस्थितीला दोष देऊन मोकळे होतात जबाबदारी घ्यायला शिकले पाहिजे.

4- जेव्हा तुम्हाला समोरच्या व्यक्तीचा अंदाज येतो कळायला लागतो की ही व्यक्ती ‘blamer’ आहे तेव्हा थोडे सावधान व्हा,नात्यातील involvement कमी करा,detached राहायला देखील काही हरकत नाही कारण पुढे चालून फक्त हिस्ट्री च रिपीट होणार आहे; परत ह्या व्यक्तीच्या आयुष्यात काही वाईट घडले की ते सर्व दोष तुम्हालाच देत बसतील.

5- तपासून बघा खरच समोरच्या व्यक्तीला आपली काही worth आहे की नाही की फक्त कोणी नाही म्हणून ते आपल्या सोबत राहतात असे तर नाही ना..?? अनेक जण असेही भेटतात आयुष्यात ज्यांना आपली किंमत नसते. त्यांना आधार द्यायला, मैत्रीची साथ द्यायला कोणी नसते म्हणून ते आपल्या सोबत राहतात आणि सोयीस्कर रित्या आपला वापर करतात. Emotional Manipulation होऊ शकतो अशा केसेस मध्ये.

6-Mentally Weak लोकं ब्लेम गेम खेळतात. म्हणून मैत्री करताना आपणही aware असले पाहिजे समोरची व्यक्ती कशी आहे त्याची handling स्किल कशी आहे,manipulative आहे का? आपल्यासाठी समोरच्याचे वागणे हे भावनिक रित्या Harmful आहे किंवा Harmless आहे हे analytical skill आपण स्वतः develope केले पाहिजे.

कारण उद्या तुमच्या सोबत कोणी ब्लेम गेम खेळला तर ती तुमची पण चूक असू शकते की तुम्हाला त्या व्यक्तीला ओळखता-पारखता आले नाही…!!

होतं तसे ही अनेकदा….समोरच्या व्यक्तीचा अंदाज येत नाही. म्हणून आपणही स्वतःवर work करावे. समोरच्या व्यक्तीला ओळखता यावे यासाठी analytical skill डेव्हलप करणे ही आपली पण जबाबदारी आहेच ना…!! यापूर्वी म्हटल्याप्रमाणे सर्व जण आपापल्या ‘आयुष्या’-बाबतीत,आप-आपल्या ‘कर्मा’-बाबतीत जबाबदार असतो.

“So Guys Be Aware,Work On Yourself And World Will Adjust,You Just Start To Shine…!!!”


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!