Skip to content

मन मारून जगण्यापेक्षा मन भरून जगूया..

मन मारून जगण्यापेक्षा मन भरून जगूया..


मयुरी महाजन


“जगून घ्यावं छान,
कारण माहिती नाही कुठलं ठरेल शेवटचं पान,
म्हणून म्हणते जगून घ्याव छान…”

प्रत्येक व्यक्ती येथे धावपळ करतेय , कशासाठी? आपापल्या वाटेवरचे जीवन जगण्यासाठी, आता तसं म्हटलं तर जगण्यासाठी भरपूर काही लागते, किंवा मग काहीच लागत नाही, माझी मैत्रीण यावर खूप सुंदर बोलते की आपण किती कमवतो, यापेक्षा आपली भूक किती मध्ये भागवली जाते, या दोघांमधला मेळ जर साधता आला तर आपल्या जगण्यातील सुंदरता आपल्याला मन भरून जगता येईल ,

हा जो आपल्या मनाचा पक्षी असतो, याला आपण बऱ्याचदा स्वच्छंदपणे भरारी घेऊचं देत नाही, त्याला बंदिस्त करून ठेवतो, त्यासाठी कारणे पण असतातच, परंतु प्रत्येक वेळेस मन मारून जगण्यापेक्षा आपल्या इच्छांना दाबून टाकण्यात शहाणपण नसतं, जर आपल्याला आपल्या जीवनाचा खरा आनंद अनुभवायचा असेल, तर मन मारून जगण्यापेक्षा मन भरून जगूया,

मन भरून जगण्यासाठी गरजेचे नाही पैसा अडका भरपूर असायला हवा,” कभी तो खुले आसमान के नीचे, अपने आपको खोलके तो देखो….” निसर्गासारख्या अप्रतिम कलाकृती सोबत कधीतरी आपलं आयुष्य वाटून घ्या …आपली गुपित विश्वासाने त्या निसर्ग शक्तीसोबत शेअर करा, आपले दुःख वाटून घ्या ,ज्या गोष्टींवरती ज्या माणसांवरती तुम्ही जीवापाड प्रेम करतात, त्यांच्या प्रति ईश्वराने आपल्याला दिलेल्या मनुष्य देहाप्रती सगळ्यां प्रति मनाने भक्ती भावाने त्यांची कृतज्ञता व्यक्त करून बघा ,मनात काही भरून जगण्यापेक्षा मन भरून जगलेलं कधीही चांगलंच …

कारण आयुष्याच्या वाटेवरती आपल्या आयुष्यात आलेल्या व्यक्तिरेखा या उगाचच आलेल्या नसतात, प्रत्येक व्यक्तिरेखा आपल्याला जगण्यातलं मर्म शिकून जाणारी असते ,आपण कसे दिसतो, कसे आहोत, आपल्याकडे काय आहे ,किती आहे , Nothing that life but आपण काय फील करतो, जगण्यातील आनंद कसा अनुभवतो ,आणि आपल्यामुळे किती जण आनंदाने आपल्या आयुष्याला भरभरून जगू पाहत आहे, This is the very very important

बघा आपल्याला आयुष्यात भेटणाऱ्या व्यक्ती रेखांमध्ये कधीतरी कुणीतरी व्यक्तिरेखा अशी नक्कीच असते, ज्याकडे बघून आपल्याला वाटतं, अरे ही व्यक्ती आयुष्यात इतके दुःख भोगून सुद्धा किती भरभरून जगते, आणि एक आपण आहोत, मला आवर्जून नाव घ्यावसं वाटतं ,ते माईंचे सिंधुताई सपकाळ, त्या व्यक्तीने आयुष्यभर संघर्ष केला, पण स्वतःच्या दुःखाचा कधी बाजार मांडला नाही ,जगण्यातलं मर्म जाणलं आणि आपला आनंद शोधत सर्वांमध्ये जगण्याची उमेद निर्माण केली, दुःख करून मनात दुःख भरून जगले असते ,तर कधीचेचं संपले असते, असं माईंचे म्हणणं होतं ,परंतु व्यक्त होत आपले दुःख मोकळे करत भरभरून जगण्याची वाट त्यांनी शोधली, त्या वाटेवरचे आयुष्य अनुभवले व आज त्या नाहीत तरी लाखोंच्या आयुष्यात माईंचं स्थान खूप मोलाच आहे,

प्रत्येक व्यक्तीनरूप आपल्या जगण्याची व्याख्या निराळी आहे, जो तो आपापल्यानुसार आपल्या जगण्याची व्याख्या ठरवतो, परंतु जगण्याला आपण आपल्या कुठल्या दृष्टिकोनातून बघतो, हे सुद्धा खूप महत्त्वाचे आहे ,आज कितीही म्हटलं तरी जगण्याला पैसा लागतोच, आणि तो चांगल्या मार्गाने कमवणे महत्त्वाचे आहेत, पण आपल्याकडे जे जे काही आहे ,आपण त्याला कधीही कमी समजू नये ,कारण आपल्याकडे जर भरपूर नाती असतील, तर आपण त्याला ओझं न मानता ज्याला खरंच नाते नाहीत, अशांना त्याची किंमत विचारा, तेव्हा कळेल ,आपल्याकडे आहेत काय?

कुणाच्या मनात भरण्यापेक्षा कुणाला मन भरभरून जगायला शिकवता आलं, तर यापेक्षा दुसरे समाधान नाही ,आपणही जगूया आपल्या बरोबर अजून कुणाला मदत करता आली कुणाची, तर नक्कीच करूया….


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

4 thoughts on “मन मारून जगण्यापेक्षा मन भरून जगूया..”

  1. Sunil Kawarkhe Patil

    खुपच छान।अप्रतिम। सुखी जीवनाचे तंत्र।यशस्वीपणे जीवन जगण्याची गुरुकिल्ली।जीवनाचा मंत्र।

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!