Skip to content

मला माझी वर्जिनिटी सांभाळायची होती, पण…

मला माझी वर्जिनिटी सांभाळायची होती, पण…


सोनाली जे.


मन आणि शरीर यांचा खूप जवळचा संबंध आहे. मनाची जखम शरीराला त्रासदायक ठरते तशी शरीराची जखम ही मनाला त्रासदायक ठरते.

अगदी उदाहरण द्यायचे झाले तर अनेक बाह्य गोष्टींचा मनावर परिणाम होत असतो. त्यातलीच मनावरचा ताण , तणाव , कामाचा ताण स्ट्रेस यातून शारीरिक व्याधी निर्माण होतात. मग कधी blood pressure असेल, कधी डायबेटिस, अस्वस्थता , हृदयात धडधड.

तर बरेचवेळा जेव्हा आपला अभ्यास झालेला नसतो. पेपर अवघड जातो तेव्हा आपल्याला निराशा येते , भीती वाटत असते. म्हणजे बाह्य वातावरण आणि अंतर्गत गोष्टी या एकमेकांशी कुठे ना कुठे जुळलेल्या असतात.

थोडा वेगळा विषय आपण बोलणार आहोत. ज्यावर आपल्या भारतात अजूनही तेवढ्या मोकळेपणाने बोलले जात नाही. पण आता विचार , कृती यातून लोक , समाज, आजकालची पिढी खूप पुढे जात आहे.

आज वर्जिनिटी विषयी थोडे मोकळेपणाने बोलूया.

Virgin म्हणजे असा पुरुष किंवा स्त्री , कुमार किंवा कुमारी ज्याने कधी ही लैंगिक संबंध ठेवलें नाहीत. Virgin म्हणजे कधीही न वापरली गेलेली किंवा उपयोगात न आणलेली.

आपण भारतासारख्या ठिकाणी काही श्रद्धा आणि अंधश्रद्धा ही आहेत. त्यापैकी एक म्हणजे लग्न झाल्या वर नवरा आणि बायको यांचे पहिल्यांदा शारीरिक संबंध येतात तेव्हा स्त्रीला रक्तस्त्राव होतो. याचे नैसर्गिक कारण म्हणजे स्त्री शरीर रचना . त्यात तिच्या योनी मार्गात एक अतिशय तरल असा पटल असतो. पडदा असतो .जो पहिल्या संबंधात फाटतो आणि स्त्रीला रक्तस्त्राव होतो. हे शास्त्रीय कारण .
आणि जर रक्तस्त्राव झाला तर तिचं कौमार्य ती टिकवून आहे. आणि नाही झाला तर तिच्यावर चारित्र्यहीन हा शिक्का मारला जातो.

भारतात काही जाती जमाती अशा आहेत की जिकडे या
कौमार्याची परीक्षा ही घेतली जाते. आणि त्यात पास झाली वधू तर तिला नवरा ही स्वीकारतो .नाही तर नवरा नाकारू शकतो. आणि पंचायत ही. तिला वाळीत ही टाकले जावू शकते. कंजारभाट ही भटकीविमुक्त जात.

Virginity टिकवून किंवा सांभाळून न ठेवता येणे याची आजकालची कारणे विचारात घेवू :

१. शारीरिक संबंध ..मुलीचे , स्त्री चे लग्नापूर्वी शारीरिक संबंध असतील तर .

२. मुली मैदानी खेळ , साहसी खेळ खेळत असतील , घोडेस्वारी तरी ही यात तिचा तो नाजूक पटल फाटू शकतो. आणि अनेकदा तिच्या हे लक्षात ही येत नाही.

३. हस्त मैथुन यासारखी नैसर्गिक क्रिया ही कारणीभूत ठरते.

४. कधी एखादा accident ही कारणीभूत असतो.

स्नेहा अतिशय हुशार , कायम topper , तिच्याच बरोबर तिच्या वर्गात असलेला आणि शाळे पासून एकत्र असलेला मिहिर ही तेवढाच हुशार. दोघांची अभ्यासात ही healthy competition , इतर सर्व स्पर्धा , अगदी कोणते ही event या दोघांच्या शिवाय होतच नव्हते.दोघे ठरवून MBA करत होते.

दोघे शाळेपासून एकमेकांच्या प्रेमात. दोघांच्या cast वेगळ्या .पण एकमेकांच्या घरी जाणे येणे होते. दिवाळी ,इतर सण ही एकमेकांच्या घरी जाणे येणे होते. दोघे लग्न करणार हे दोघांच्या घरी ही माहिती होते. त्यांची पूर्ण संमती होती.

दोघांची जवळीक वाढत होती. MBA ला स्नेहा टॉपर आली. मिहिर ही तेवढच हुशार असून second rank आला. इथून थोडे मिहिर चे गणित बिघडले. दोघांनी नोकरी ही चांगल्या ठिकाणी मिळविली. हळूहळू दोघेही खूप बिझी होवू लागले. एकमेकांचे फोन , भेटणे ही कमी झाले. स्नेहा खूप प्रयत्न करत होती भेटण्याचे , बोलण्याचे पण मिहिर काही तरी कारणे काढून टाळत होता.

स्नेहा त्याला आता लग्नाविषयी ही खूप मागे लागली पण तो तेही टाळू लागला आणि अचानक एक दिवस तो परदेशी निघून गेला चांगलीं opportunity होती म्हणून ..

तिकडून त्याला भारतात यायचे नाही असेच त्याने निक्षून सांगितले.
स्नेहा परदेशी जावू इच्छित नव्हती. तिला आपल्या देशात एवढी चांगली संधी मिळाली होती की ती सोडून तिला जाणे शक्य नव्हते.
त्यातून मिहिर ने तुझ्याशी लग्न करायचे नाही हे स्पष्ट सांगितले स्नेहाला .. त्याची गाडी स्नेहा टॉपर आल्यापासून बिघडत गेली. स्नेहा त्याच्या पेक्षा वरचढ कशी ठरू शकते हेच त्याला पटत नव्हते. स्नेहा ने अनेक वेळा त्याला त्यावरून समजावले ही. पण तिचे प्रयत्न व्यर्थ होते.

इकडे स्नेहा चे आई वडील आता सारखे स्नेहाला लग्नाची घाई करू लागले पण स्नेहा ने सांगितले की ती कोणाशी लग्न करणार नाही. परत तिच्या लग्नाचा विषय ही काढू नको असेसंगितल्यावर आईला राहवले नाही.

आईने स्नेहाला खोदून खोदून विचारल्यावर स्नेहाने आईला सांगितले की , मिहिर मध्ये ती खूपच गुंतली होती. आणि मला माझी वर्जिनिटी सांभाळायची होती, पण…मिहिर आणि मी शाळेत असल्यापासून एकत्र होतो. एकत्र अनेक स्पर्धा मध्ये भाग घेत होतो. जिवापाड प्रेम करत होतो. लग्न करणार असेही ठरले होते. एकमेकांच्या घरी तर आपण सगळेजण जात होतो.

त्या दिवशी कॉलेज च्या शेवटच्या वर्षी इंटर कॉलेज competition मध्ये आम्ही विजेते झालो. तो आनंद खूप वेगळाच होता. ते यश आम्हाला हवेत घेवून गेले. तिकडून निघालो वाटेत धो धो पावूस होता. मिहिर चे घर आधी म्हणून पटकन त्याच्या घरी गेलो तर दार कोणी उघडेंना. मग मिहिर ने त्याच्या चावीने दार उघडले. आत चिठ्ठी ठेवली होती मिहिर करिता फोन करण्याचा खूप प्रयत्न केला पण लागला नाही. आम्ही अचानक मुंबई ला जात आहोत. आजी ची तब्येत बरी नाही. मिहिर चा फोन स्पर्धेत सहभागी झाल्यामुळे बंद होता आणि नंतर सेलिब्रेशन मध्ये तो सुरु करायचा विसरलाच.

दोघेही पावसात भिजून आले होते . मिहिर पटकन टॉवेल घेवून आला. पावसातले भिजलेले कपडे बदलण्यासाठी तो गेला तेव्हा त्याने स्नेहाला ही आईचा ड्रेस दिला. कपडे बदलत असताना , एकमेक साहजिक जवळीक निर्माण झाली. .त्यात घरात कोणी नाही. तरी ही स्नेहाने खूप सांभाळायचा प्रयत्न केला . पण आधीच यशाच्या उत्साहाने मोहरले गेलेले ते दोघे , पावसातल धुंद वातावरण , चिंब भिजणं, त्यात एकांत मिहिर ने न राहवून पुढाकार घेतला. स्नेहा ने खूप सांभाळण्याचा प्रयत्न केला स्वतः ला , त्याला आवरण्याचा , लग्नं झाले की हे सगळे करायचे आहे हे ..पण मिहिर काही ऐकून घेण्याच्या मुड मध्ये नव्हता ..आणि स्नेहा शेवटी दोघानाही सांभाळू शकली नाही. तोल गेलाच.

मला माझी वर्जिनिटी सांभाळायची होती, पण…मी नाही सांभाळू शकले आई. आणि मिहिर आता लग्नाला नकार देतो आहे. त्याचावर ठेवलेला विश्वास , प्रेम , एकदा का होईना भावनेच्या भरात मी माझे सर्वस्व दिले त्याला . आणि मला असे मिहिर ने वापरले आणि असे वापरलेले शरीर तरी मी इतर कोणाला का देवू ? माझे मन याला कधीच तयार होणार नाही. आणि शरीर तर त्याहून ही नाही. त्यामुळे मी लग्न करणार नाही.

आईने ही स्नेहाला सांगण्याचे प्रयत्न सोडून दिले. ती ही समजू शकत होती ज्या संस्कारात आणि रूढी परंपरा यात स्नेहा वाढली आहे तिला ते कधीच पटणार नाही याची आईला खात्री होती.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

2 thoughts on “मला माझी वर्जिनिटी सांभाळायची होती, पण…”

  1. लेख छान आह साधारण 90 टक्के समाज मानसिकतेचे प्रतिनिधीत्व करते, परंतु 10 टक्के असेही आहेत की, त्यांचा स्त्रिया नी केवळ पैसा, संपत्ती यांचे कडे, पाहून उपभोग घेवून, किंवा 2 ते 3 अफेअर करून धोके दिले आहेत, आणि होत आहेत. ते पुरुष यांच्या सारख्या वर्षा पुरणाला बळी पडून, त्यांना आयुष्य भर असे राज कठीण दगड प्रमाणे लपवून ठेवतात.हे नाकारता येत नाही

  2. sreechya virginity la samajhane khupach mahtwa dile aahe,
    purushala hai sagala lagu hot nahi ,
    aaplya samajha pramane
    kuthe ekhada sharirik bhagala itake important dene kadachit aapale aayushya viskalit karun takte ,
    tevha streene swatacha vichar karawa.pudhil aayushya sathi

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!