रोज स्वतःशी पॉझिटिव्ह बोलल्यानंतर आपल्या जीवनात कमालीचा फरक पडतो.
मयुरी महेंद्र महाजन
आपण सर्वच रोजच स्वतःशी बोलतो, आपण स्वतःशी कोणत्या पद्धतीने बोलतो ,हे नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही, पण आपण स्वतःशी जे काही बोलतो ,त्या विचारसरणीला जर आपण पॉझिटिव्ह लेव्हल वरती घेऊन गेलो, तर आपण स्वतःच आपल्या आयुष्यात एक वेगळ्याच आनंदाची अनुभूती घ्याल, कारण रोज स्वतः शी पॉझिटीव्ह बोलल्यानंतर आपल्या जीवनात कमालीचा फरक पडतो,
आपले जे belive सिस्टम आहे ते आपल्या विचारांवर ती काम करते, या सिस्टीमचा जर आपण बारकाईने विचार केलात, अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल, ज्या विचाराला आपण रोज खतपाणी घालतो, तेच विचार आपल्या पुढे belive सिस्टिमद्वारे घडत जातात, त्यामुळे आपण स्वतःला रोज पाँझिटिव्ह बोलण्याची सवय लावून घेतली, तर तो बदल आपण स्वतःचं अनुभवालं यात शंका नाही,
खरं म्हणजे विचारसरणीचे मुख्य दोन भाग आहेत ,यात एक सकारात्मक आणि दुसरा नकारात्मक, या दोघांमध्ये कायम द्वधं युद्ध सुरू असते, पण या दोघं विचारसरणीचा खरा प्राणेता ठरतो ते म्हणजे आपले बिलीव सिस्टम, आपल्या विश्वासाची प्रक्रिया ज्या गोष्टींच्या विचाराला आपण विश्वासाची श्रेणी देतो, तोच विचार आयुष्यात घडण्याची संभावना तितकीच जास्त असते, आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, त्या विश्वासाची प्रक्रिया काम करते ते आपल्या विचारांनीचं, जीवन जगताना जे आपल्याला अनुभव आलेले असतील, तसी आपली विश्वासाची प्रक्रिया गुढ होत गेलेली असते, कोणत्याही गोष्टीला आपण दोन पद्धतीने अनुभवतो, म्हणजे सकारात्मक किंवा नकारात्मक ,विचारांची मालिका पॉझिटिव्ह way ने काम करते, तेव्हा जीवनाचा फ्लो आनंदाचा एकदम हॅप्पी happy असतो,
बऱ्याच जणांना प्रश्न असतो, फक्त आपण स्वतः पॉझिटिव असून काय उपयोग वातावरण आणि त्यातील माणसे तर कायम निगेटिव्ह विचारांनी भरलेली आहेत, त्याचा तर आपल्यावर परिणाम होतोच ना, मग स्वतःला कसे पाँझिटिव्ह बोलावे ,तर मला सांगायला आवडेल ,आपण दुसर्या कुणाच्याही विचारांवर ती किंबहुना त्या व्यक्तींवरही नियंत्रण ठेवू शकत नाही, आपण आपल्या विचारांचा कंट्रोल ठरवू शकतो, आपल्या विचारांवर ती आपण आपला कंट्रोल करू शकतो, आणि ते करण्यासाठी आपल्याला स्वतःशी पॉझिटिव सकारात्मकपणे बोलणे गरजेचे आहे,
त्यासाठी आपण एका विचाराने सुरू करू शकतो, जसे की रोज पॉझिटिव्ह विचार करण्यासाठी आपण स्वतःशी काय काय बोलतो ,कोणत्या पद्धतीने बोलतो, आणि ते बोलण्या मागचे कारण काय आहे, हे आपण शोधायला हवे, त्याचा बारकाईने अभ्यास करायला हवा, आणि ते पाँझिटिव्ह लेव्हल वरती आणण्यासाठी आपण जेव्हाही स्वतःशी बोलत असू , तेव्हा पॉझिटिव्ह सिंबाँल लावूया, विचारांना सकारात्मक तेची दिशा देऊया, आणि सुरुवातीला करताना थोडं अवघड जाईल,पण जसे जसे आपण ते करायला घेऊ आणि त्याचा होणारा कमालीचा बदल आपल्याला जाणवत जाईलं, तसतशी ती आपली सवय जडत जाईलं,
आता बोलण्यात आणि करण्यात फरक असतो ,कारण आयुष्याच्या चढ उतारां प्रमाणे कधी कधी परिस्थिती इतकी विकोपाला जाणारी असते, की स्वतःला कितीही समजावण्याचा प्रयत्न केला, तरी ओढवलेली परिस्थिती निराशेच्या गर्तेत घेऊन जाते, आणि त्यात नकारात्मक विचार माणसाला आपसूकच वेढा घालू लागतात, परंतु आपली सवय जर स्वतःशी पाँझिटिव्ह बोलण्याची असेल, तर मात्र आपण परिस्थितीचे भांडवल न करता परिस्थितीलाच आपला मोहरा बनवून त्यावर मात करण्याची ताकद ठेवतो, ते फक्त आपल्या सकारात्मक विचारांच्या जोरावरती ,बघा ना सारखीच परिस्थिती ओढवलेली असताना एक त्यातून तारुण उरतो ,तर दुसरा बुडून जातो ,असे का?? कारण असे म्हणतात , परिस्थिती कितीही कठीण आली तरी त्यातून “कोई बीखर जाता है, तो कोई निखर जाता है” त्यातून आपण काय घेतो हे महत्त्वाचे आहे,
ज्यांना आपल्या विचारांची ताकद आजमावयाची आहे, त्यांनी नक्की करून बघा, आपल्या विचारांची ताकदचं ठरवते ,आपण कुठे असावे, त्यासाठी आपण काय काम करतो, हे महत्त्वाचे नाही, पण त्या कामाला आपण उद्या कुठे नेऊन ठेवतो, हे अत्यंत महत्त्वाचे आहे, आपल्या विचारांना कायम रोज खतपाणी घाला ,कारण नेगेटिव्ह विचार हे वाढत्या गाजरा गवतासारखे आहेत ,तर पॉझिटिव्ह विचार हे पेरलेल्या बीजासारखे आहेत, त्याची वाढ हळूहळू होईलं, पण जेव्हा ते फुलेल, बहरेल, तेव्हा जीवनातला तो बदल अनुभवण्या सारखा असेलं, म्हणून संयमाने काम करायला हवं ,चुकीच्या वाटेने वेगाने जाण्यापेक्षा योग्य वाटणे हळूहळू जाणे कधीही चांगलेच असते….
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

खूप सुंदर आणि सकारात्मक
Good🥇
मस्त
Good