माझ्या अस्वस्थ होण्याचं कारण माझी बायको होती, हे मला फार उशिराने कळालं.
अपर्णा कुलकर्णी
प्रताप त्याच्या आवडत्या जागी जाऊन निवांत बसला होता. आज त्याचे मन पुन्हा अस्वस्थ झाले होते. तेच शांत करण्यासाठी तो टेकडीवर येऊन बसला होता अगदी शांत डोळे मिटून. प्रमिला सोबत प्रताप नेहमी इथे येऊन बसत असे. दोघानाही इथे खूप शांतता मिळत असे. त्यामुळे दोघांचीही ही टेकडी म्हणजे आवडते ठिकाण होते. प्रतापला आज सगळे जुने क्षण आठवत होते. तसा तसा तो जास्तच अस्वस्थ होत होता.
प्रमिला आणि प्रताप लग्नबंधनात अडकून वर्ष झालेले होते. दोघांचे लग्न अगदी रीतसर घरच्यांच्या पसंतीने पार पाडलेले होते. प्रताप मोठ्या कंपनीत मॅनेजर पदावर नोकरी करत होता तर प्रमिला अकाउंट म्हणून काम करत होती. दोघांचा संसार सुखात चालू होता. पण प्रताप जरा अव्यक्त होता. अव्यक्त म्हणण्यापेक्षा स्वतःच्या भावना तो पटकन व्यक्त करत नसे आणि अगदी याच्या उलट प्रमीलाचा स्वभाव होता. पण यामुळे त्यांच्यात कधीही वाद झाले नाहीत. उलट प्रतपला तिची बडबड ऐकणे आवडत असे. त्याला नेहमीच तिच्या पटकन व्यक्त होणाऱ्या सभावाचे कौतुक वाटत असे.
एकदा घरात प्रमिलाचे तिच्या सासू सोबत भांडण झाले. तिच्या सासूबाई जरा कंजूस होत्या आणि घरात स्वयंपाक करताना सामानाचे मोजमाप करत असत. प्रमिला ला घरातील कामे आटपून नोकरीसाठी जावे लागत असे त्यात यांची रोजची कटकट तिला कधी कधी असह्य होत असे. त्यामुळे एकदा ती सासू बईना म्हणाली, मी जे पैसे कमावते त्यातून तुम्हाला आज वापरलेले सामान आणून देईन. यावर त्या खूपच भडकल्या होत्या आणि प्रतापल बोलावून सगळा प्रकार सांगितला होता. यावर प्रमिला ला साथ द्यायची सोडून प्रताप ने ही आईचीच बाजू घेतल्यामुळे प्रमिला खूप चिडली होती आणि डबा न घेताच ऑफिस मध्ये निघून गेली होती.
त्या दिवशी प्रताप चे कोणत्याच कामात लक्ष लागले नाही आणि टिफीन समोर असूनही त्याने जेवण केले नाही. पण या बाबतीत तो प्रमिलाशी काहीच बोलू शकला नाही. असे प्रकार वारंवार होत असत आणि हल्ली प्रमिला ने दुर्लक्ष करायचे ठरवले असल्याने सासू बाई एकट्याच बडबडत असत पण त्यांची बडबड मात्र कमी झाली नव्हती.
एकदा प्रताप चांगलाच आजारी पडला होता त्यावेळी प्रमिला ने रजा घेऊन त्याची काळजी घेतली होती. पण शेवटी प्रमिला ही एक माणूस होती. घरातील सगळी कामे आणि प्रताप ची सेवा यामुळे दिवसभर ती दमून जात असे. त्यामुळे एकदा तिला उठायला उशीर झाला तर त्याच गोष्टीवर बोट ठेवून सासू बाई खूप बोलल्या आणि प्रताप सगळे बघत बसला त्यामुळे प्रमिला त्याच्यावर खूप चिडली.
म्हणाली त्या तुमच्या आई आहेत याची मला कल्पना आहे पण कधीच तुम्ही त्यांना एका शब्दाने काही बोलत नाही आणि त्या मात्र वाटेल तेंव्हा मला काहीही बोलून दुखावतात ते तुम्ही निवांत पने कसे बघू शकता. जसे तुमचे आई वर प्रेम आहे तसे बायको वर नाही का ?? निदान मी बरोबर असेल तेंव्हा तरी माझी बाजू शांत पने आईसमोर मांडत चला. त्या दिवशी पण प्रताप खूप अस्वस्थ होता. त्याला स्वतःची लाज वाटत होती पण तरीही त्याने तोंडातून शब्द काढला नाही.
संसाराची अशीच वीस वर्षे उलटली. प्रमिला ला आज यायला उशीर होणार म्हणून तिने कळवून पण प्रताप तिची वेड्यासारखी वाट बघत होता. तेवढ्यात कोणाच्यातरी फोन येतो आणि प्रमीलाचा अपघात झाल्याचे सांगतो. प्रतापच्या पायाखालची जमीनच सरकते आणि तो तडक हॉस्पिटल मध्ये जातो. पण दुर्दैवाने प्रमिलाने शेवटचा श्वास घेतलेला असतो.
सगळ्या घटना त्याच्या समोरून पटकन जातात आणि त्याच्या डोळ्यातून आसवे बाहेर पडतात. प्रमिला अशी कशी अर्ध्यात सोडून गेलीस तू मला ?? तुझ्याविना हे आयुष्य जगणे कठीण झाले आहे. तू माझा श्वास होतीस आणि तोच निघून गेला आहे. माज तुझ्यावर खूप जास्त प्रेम होते, तुला काहीही झालेलं मला कधीच सहन झालं नाही. तुझ्या आयुष्याची वीस वर्षे तू मला दिलीस. कधी रडत, कधी उपाशी रहात तर कधी आनंदाने झेलत आलीस सगळं. जेंव्हा तुला खूप त्रास व्हायचा तेंव्हा तू तो भडाभडा बोलून व्यक्त केलास पण मी , मी मात्र तुला कधीच काहीच बोलू शकलो नाही प्रमिला.
पण आज तुला सांगतो प्रमिला, तुला आई जेंव्हा जेंव्हा बोलत होती आणि त्याचा त्रास तू स्वतःला करून घेत होतीस ना ?? त्याही पेक्षा तो त्रास मला होत होता प्रमिला. सुरुवातीला याचे कारण मला समजले नाही पण माझ्या अस्वस्थ होण्या मागे तू म्हणजेच तुझ्यावरच प्रेम आहे हे मला खूप उशिराने समजले प्रमिला. तुला बोलून दाखवायचे मात्र राहून गेले प्रमिला, आज हे ऐकायला तू हवी होतीस.

खुप्प छान
Chhan lekh hota, bhavana avyakta karnarya jodidarabaddal ajun lekh wachayla awadtil. Ase lekh ayushyatil na vyakta honarya lokanche man janayla faar madat karatat. Dhanyawaad!
Mast chan chan
*अतिशय सुरेख, अजून जरा सविस्तरपणे लिहलं असता तर चांगले झाला असता.*