Skip to content

मागचा त्रास सोडून जेव्हा पुढचं जगायला शिकाल, तेव्हा बरंच चांगलं होण्याची शक्यता वाढेल.

मागचा त्रास सोडून जेव्हा पुढचं जगायला शिकाल, तेव्हा बरंच चांगलं होण्याची शक्यता वाढेल.


मेराज बागवान


भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ ह्यात आयुष्याचे चक्र फिरत असते. पण ह्या तिन्ही काळांमध्ये, महत्वाचा असतो तो वर्तमानकाळ. ज्यामध्ये माणूस आजकाल फारसा जगत नाहीये.तो एक तर भूतकाळात रमून जात आहे, नाहीतर मग भविष्याची स्वप्ने रंगवत आहे.माणूस आज भूतकाळ वारंवार उगाळत बसत आहे ,नाहीतर मग भविष्यायाची चिंता करीत बसत आहे. पण खरा गरजेचा आहे तो वर्तमानकाळ.कारण, मागचा त्रास सोडून जेव्हा पुढचं जगायला शिकाल, तेव्हा बरंच चांगलं होण्याची शक्यता वाढेल.

त्रास कोणाला चुकलेला नाही.प्रत्येकाच्या आयुष्यात कोणता ना कोणता त्रास आहेच. कोणी विविध आजारांनी ग्रासलेले आहे,कोणी करिअर च्या समस्येत आहे, कोणी आर्थिक संकटात आहे तर कोणी नातेसंबंधांमुळे त्रस्त आहे.पण हे त्रास कायम नाहीत.त्रास जरी संपलेले दिसत नसले तरी देखील , त्रासांच्या प्रकारात बदल होत जातो.म्हणजेच कोणता एकच त्रास कायम नसतो.कधी कधी त्रास संपत नाहीये असे जेव्हा वाटते तेंव्हा एकच प्रभावी गोष्ट आपल्या हातात उरते .ती म्हणजे, ‘तो त्रास सोडून, पुढचे आयुष्य जगायला शिकणे’.आणि हा उपाय करणे गरजेचे आहे, कारण जुने त्रास सोडून दिल्यामुळे , दुसरं बरेच चांगले होण्याची शक्यता वाढते.

मनुष्य प्राण्याची एक मानसिकता असते.ती म्हणजे , स्वतःच्या बाबतीत जे काही वाईट घडले आहे आणि त्यामुळे त्याला जो काही त्रास झालेला आहे, तो वारंवार उगाळत बसणे. सतत तोच तो विचार करणे .एखादी गोष्ट घडून गेल्यानंतर देखील त्याच गोष्टीवर पुन्हा पुन्हा चर्चा करणे.पण यामुळे होते काय, घडून गेलेली गोष्ट बदलत नाही.कारण तो ‘भूतकाळ’ असतो.आणि म्हणूनच त्याचा वर्तमानात विचार न करणे गरजेचे असते.आणि सतत असेच होत राहिले तर , समोर घडणाऱ्या अनेक चांगल्या गोष्टी देखील माणूस ‘मिस करतो’.म्हणूनच मागचे त्रास विसरणे गरजेचे आहे, नवीन गोष्टींचे स्वागत करण्यासाठी.

कितीही काहीही झाले तरी, आयुष्यात कोणतीच गोष्ट , कोणताच त्रास कायम नसतो.पण अनेकदा मन हे वास्तव स्वीकारत नाही.का तर त्या मनाला कुठे ना कुठे असे वाटत असते की , ‘एवढं तरी माझ्या मनासारखे घडू दे.मला जे वाटत होते ते वास्तवात होऊ दे’.आणि मग ही अपेक्षा मनात घर करू लागते आणि मन आहे तिथेच ‘स्टक’ होते.पण हे असेच जर आपण विचार करीत राहिलो तर नवीन असे काही घडणारच नाही आणि आपण स्वतःला आणि स्वतःच्या आयुष्याला पुढच्या वळणावरती घेऊन जाऊ शकणार नाही.

म्हणूनच ‘डिटयाच’ व्हायला शिकणे गरजेचे आहे.मागे जो त्रास झाला त्यावर चर्चा करण्यापेक्षा, त्या त्रासाने मला ‘बळकट आणि दणकट बनविले.अनेक गोष्टी शिकविल्या, ज्याचा उपयोग मला पुढील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी होईल.मी पूर्वीपेक्षा आणखीन जास्त सतर्क, सावध राहील.विश्वास काळजीपूर्वक ठेवेन.सारासार विवेकबुद्धी आणि जिथे जिथे गरजेचा आहे तिथे तिथे व्यावहारिक दृष्टिकोन जागृत ठेवेन.’ असा जर का विचार ठेवला तर नक्कीच आयुष्याकडे बघण्याचा एक नवीन दृष्टिकोन मिळेल.एक नवी सकारात्मकता मिळेल.आणि ह्याचा परिणाम म्हणूनच नवीन चांगल्या गोष्टी घडून येण्याची शक्यता वाढेल.

मला त्रास आहे, ताण आहे, मानसिक समस्या आहे. असे अनेकदा बरेच जण म्हणत असतात. पण त्यावर उपाय मात्र करताना खूप कमी जण दिसतात. समस्या ,त्रास आहे असे म्हणणे म्हणजेच ‘आयुष्याकडे तक्रारी करणे’.पण मागच्या त्रासात स्वतःला किती काळ गुंतवून ठेवायचे हे इतरांवर नाही तर स्वतःवर अवलंबून असते. आणि जेव्हा तुम्ही मागच्या तक्रारीनमधून बाहेत पडाला, तेव्हा आपोआपच मागचे त्रास अस्पष्ट होतील आणि पुढील नवीन चांगल्या गोष्टी स्पष्ट दिसू लागतील.गरज आहे ती दृष्टिकोन बदलण्याची.कारण, अनेकदा आपल्या त्रासाचे निराकरण आपल्या स्वतःच्याच हातात असते.आपण फक्त मागच्याच गोष्टीत अडकून पडल्यामुळे पुढचे काहीच दिसत नसते.

‘काही त्रास सोडून दिले की सुटतात. फक्त ते सोडता आले पाहिजेत.’ काळ कधीच थांबत नाही.मग आपण देखील त्या काळाबरोबर चालत राहिले पाहिजे.तुम्ही म्हणाल, हे सगळं लिहायला, वाचायला छान आणि सोपे आहे, पण प्रत्यक्षात नाही.पण तुम्हाला सांगू, ‘सर्व काही शक्य असते. फक्त भावनिक समतोल साधता आला पाहिजे.सोडून द्यायला शिकले पहिजे.चुका सुधारता आल्या पाहिजेत, स्वतःमध्ये बदल करता आला पाहिजे आणि वर्तमानात जगता आले पाहिजे.मला ह्या त्रासातून बाहेर पडायचे आहे हे मनाशी पक्के केले पाहिजे.’

आणि हे सरावाने शक्य आहे.त्यासाठी स्वतःवर नियंत्रण असणे जरुरी आहे.स्वतःवर विश्वास ठेवणे गरजेचे आहे.त्या निसर्गावर, त्या नियतीवर आणि त्या विधात्यावर विश्वास असणे गरजेचे आहे.कारण तो आपल्याला नेहमीच भरभरून देत असतो, पण आपल्यालाच ते नीट सांभाळता येत नाही.तो आपले नेहमीच चांगले चिंतीत असतो.

काही गोष्टी मनासारख्या घडल्या नाहीत म्हणून त्रास करून नाही घ्यायचा.त्या गोष्टींपेक्षा देखील इतर जास्त चांगल्या गोष्टी पूढे नेहमी तुमची वाट पाहत असतात.गरज असते ती मागचे सारे विसरून पुढे जाण्याची.

काळजी घ्या…. आरोग्य जपा….सर्व छानच आहे!!!!


मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

8 thoughts on “मागचा त्रास सोडून जेव्हा पुढचं जगायला शिकाल, तेव्हा बरंच चांगलं होण्याची शक्यता वाढेल.”

  1. भुतकाळात ज्या लोकांनी आपल्याला खूप त्रास, मनस्ताप दिला, ज्यांच्या मुळे खुप यातना भोगल्या, सामाजिक बदनामी झाली असेल आणि आता बऱ्याच वर्षांनी आपली स्वतःची मुलं जर अशा लोकांशी लग्न करून नाते जोडू पाहत असतील तर आपण काय भूमिका घ्यावी

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!