Skip to content

लोकांनी जसं तुम्हाला वागवलंय तसंच पुन्हा त्यांना वागवून स्वतःचं कॅरेक्टर खराब होऊ देऊ नका.

लोकांनी जसं तुम्हाला वागवलंय तसंच पुन्हा त्यांना वागवून स्वतःचं कॅरेक्टर खराब होऊ देऊ नका.


काव्या धनंजय गगनग्रास

(समुपदेशक)


“विनय सोड यार कश्याला डोक्यात राग घेऊन बसतो, तुला माहित आहे ना ती मुल कशी आहेत, ती सुधारणार नाहीत उगाच तु त्यांच्या सारखं वागून स्वतःची इमेज का खराब करून घेतोस? चल सोड आपण कॅन्टीन मध्ये जाऊन चहा पिऊ, चल.” राज विनयला समजावत होता. “अरे राज तु मला सांगतोय, ते पण त्यांच्यासाठी.

कॉलेजमध्ये एडमिशन घेतल्यापासून त्यांनी मला कसं वागवलय तू देखील पाहिलं आहेस. तरी तू मला समजावतोय.” विनय वैतागत बोलला. “विनय मी तुला समजावतो आहे कारण तू माझा मित्र आहेस. अगदी जवळचा. आणि कोणत्याही मित्राला आपल्या मित्राचं चांगल व्हावं असच वाटणार. तुला आता जे काही वाटत आहे, तुझा राग, मनात येणारी सुडाची भावना हे सर्व या क्षणापुरत आहे, आवेगात आलेल आहे. यातून तू काही केलस तर त्यातून तुझ नुकसान आहे.

समोरचा काहीतरी वागतो म्हणून आपण पण त्याच पातळीवर जाऊन वागणं याला काय अर्थ आहे सांग? आपल्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये काय फरक राहिला? आणि तुझ चुकीचं वागणं त्यांचाच फायदा करून देणार आहे. कारण त्यांना तेच हवं आहे की तू सर्वांसमोर चुकीचं ठराव. त्यामुळे अस वागणं म्हणजे जवळपास त्यांच्या रिमोट वर तू चालण्यासारखे आहे.

आपल्यावर अन्याय होत असेल तर तो सहन करावा अस मी म्हणत नाही. पण त्याला प्रतिकार करायचा तर समोरच्या माणसाला प्रमाणे वागून, भांडाभांडी करून होत नाही. ही पद्धत नाही. वेगळ्या पद्धतीने पण अन्याय रोखता येतो. त्यासाठी आपली इमेज खराब होईल अस वागायची काही गरज नसते. समजलं का?” विनय ने तोंड वाकडं केल व हो म्हणाला. “आता तू सांगतोस म्हणजे खरच असणार. तू कधी मला चुकीचं सांगितल आहे जे आता सांगशील. चला चहा प्यायला.”

विनय आणि राज खूप चांगले मित्र होते. अगदी भाऊ वाटावे असे. दोघेही एकत्रच एकाच कॉलेजमध्ये शिकायला होते. त्यांची ओळख मैत्री म्हणजे एक कथाच होती. नवीन ॲडमिशन होती. विनय पण नवीन नवीन आला होता. आणि जसं कॉलेज मध्ये अनेकदा होत. Ragging. सिनियर मुल नवीन मुलांना त्रास देणे, त्यांच्याकडून काहीही करून घेणे अशी काम करतात. त्यात जर एखादा मुलगा मुलगी शांत असेल, विरोध करणारा नसेल तर अजूनच बर होत. विनय काहीसा तसाच होता. तो आलेलाच मुळात वेगळ्या वातावरणातून. त्याला इतक्या मोठ्या कॉलेज मध्ये एडमिशन मिळणं, हे अस वातावरण सर्वच नवीन होत.

कॉलेजच्या पहिल्याच दिवशी त्याच्या सोबत काही मुलांनी दादागिरी केली, त्याला काही काही करायला लावलं. कोणीही त्याच्या मदतीला आल नाही कारण कोणाचीही हिम्मत नव्हती त्या मुलांच्या विरोधात जायची. एकटा राज त्याच्या मदतीला आला. तो पण विनयचा सिनियर होता पण नवीन आलेल्या मुलांना त्रास देणं आपल्या मोठ होण्याचा गैरफायदा घेणं अस त्याने कधीच केल नाही.

फार विचारी आणि हुशार असा तो मुलगा होता. जी मुल त्रास द्यायची ती त्याच्या वाट्याला कधी जात नसतं. कारण राज जरी दादागिरी करत नसला तरी नीट शब्दात चुकीच्या गोष्टीला कसं थांबवावं हे त्याला माहीत होत. आता तोच विनयच्या बाजूने झाला त्यामुळे त्या मुलांना कारणच मिळालं विनयला अजून त्रास द्यायचं. कारण राज शेवटी सारखा त्याच्या सोबत असणार नव्हता. काही दिवस ती मुल गप्प बसली. विनय पण आता कॉलेज मध्ये रुळला होता.

अभ्यासात हुशार, कल्चलर ॲक्टिव्हिटीस मध्ये पुढे त्यामुळे त्याला बाकीची मुल ओळखू लागली आणि चांगल्या नावाने ओळखू लागली. या सिनियरस्ना मुल मान देत होती ते भीतीपोटी. विनय मात्र सर्वांचा लाडका होता आणि महत्त्वाचं म्हणजे त्याला ही मुल काही ना काही त्रास द्यायचीच पण त्याच्यावर काही परिणाम होत नव्हता आणि राज, तो मोठ्या भावासारखा त्याच्या सोबत असायचा. हळू हळू या मुलांची भीती कमी होत चालली. म्हणून त्यांनी विनयच नाव खराब करायचं ठरवलं.

सुरवातीला विनय लक्ष देत नव्हता पण आता सर्व त्याच्या मर्यादे पलीकडे गेलेलं होत. तो कॉलेज मध्ये येऊन आता दोन वर्ष झालेली होती. तरी अस वागणं त्याच्या वाट्याला यावं याच त्याला वाईट देखील वाटत होत व राग देखील येत होता. तो त्या मुलांशी कधी समोरा समोर भांडायला देखील गेला नाही पण आता त्याची वरचेवर चिडचिड व्हायची, तो पटकन रंगवायचा, त्याला त्यांना मारावस वाटत होत.

म्हणूनच राज त्याला समजावत होता. तो एकच होता जो त्याला कोणतही चुकीचं काम करण्यापासून थांबवु शकत होता. कारण विनय त्याचच ऐकत असे. त्याला आपण अनोळखी असताना राजने जी मदत केली होती ती अजूनही लक्षात होती. त्यामुळे त्याची राज वर एक प्रकारे श्रद्धा होती. आणि तो वयाने मोठा, शांत स्वभावाचा त्यामुळे तो जे सांगेल ते बरोबर असणार अशी त्याची खात्री असायची. आजही त्याने जेव्हा सांगितल तेव्हा त्याने ते ऐकलं व त्याला जाणीव देखील झाली की आपण अस वागून आपलंच नुकसान होऊ शकत.

सुदैवाने विनय कडे राज सारखा मित्र होता. पण आपल्याकडे दर वेळी असेलच अस नाही. तेव्हा आपल्यालाच आपला मित्र आपला चांगल्या, विवेकी विचारांचा साथीदार व्हावं लागतं. जेव्हा आपल्याशी कोणी चुकीचं वागत तेव्हा राग येणं स्वभाविक आहे, कोणालाच हे आवडत नाही की आपल्यासोबत दुसऱ्याने चुकीचं वागावं.

पण म्हणून तो तसा वागला याचा सूड म्हणून आपण पण तसच वागावं अस होत नाही. यात आपण आपलं नुकसान करून घेतो. आपण स्वतःच अस वेगळं व्यक्तित्व ठेवतच नाही. आपण पण त्याच्यासारखे होतो. आणि तेच त्यांना अपेक्षित असत. समोरच्या व्यक्तीची हार तेव्हाच होते जेव्हा आपण त्यांच्यासारखं वागत नाही, आपण दुर्लक्ष करायला शिकतो. हे दुर्लक्ष करण, त्यांच्या वागण्याचा त्रास, फरकच न पडुन घेणं हेच त्यांना दिलेलं उत्तर असेल ज्यातून आपलं कमी नुकसान आणि त्यांची हार होईल. कारण शांतता कधी कधी शब्दाहून खूप बोलून जाते.


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!