कोणाचीही साथ मिळाली नाही, तरी पुढे चालत रहा!
सौ. मिनल वरपे
एखादी गोष्ट साध्य करायची असेल तर ज्याप्रमाणे वेळेची आणि वयाची अट नसते अगदी त्यासोबतच आपल्याला सगळ्यांनी असावं आपल्या प्रत्येक गोष्टीत, ध्येयात प्रत्येकाची साथ असावी , प्रत्येकाचा पाठिंबा असावा अशी अपेक्षा सुद्धा नसावी.
आपण जे काही करतो त्यामधे आपल्या विचारांना, कृतीला प्रत्येक व्यक्ती सकारात्मकतेने घेईल असा विचार करण्यापेक्षा आपण आपल्याला जे ध्येय साध्य करायचं आहे त्याबद्दल स्वतःच सकारात्मक राहणे जास्त गरजेचे असते.
आज जे आपल्याला साथ देत आहेत जर उद्या किंवा अगदी पुढच्या क्षणाला त्यांचे विचार बदलले तर आपण एकटे पडतो, आपल्यातील हिम्मत कमी होते, एकाकीपणा आपल्याला जाणवायला लागतो आणि आपल्या ध्येयाबददल आपण अगदी सहजच विचलित होत असतो.
आपल्यावर अशी एक वेळ येते जेव्हा खूप जवळचे वाटणारे, आपल्याला नेहमी साथ देणारे आपल्याला अगदी महत्त्वाच्या वेळी साथ सोडतात.आणि त्यावेळी आपल्याला पुढे जाण्याची हिंमत उरत नाही.
याच कारण म्हणजे आपल्याला आपली ध्येय मिळवण्यासाठी ज्या बळाची गरज असते ते बळ आपण स्वतःमध्ये न शोधता दुसऱ्यांच्या शब्दात, पाठिंब्यातच शोधत असतो. मी हे केलं तर काय होणार, मी अस करायला पाहिजे की नाही, माझा उद्देश काय आहे, माझी क्षमता काय आहे, मला माझं ध्येय साध्य करायला जमेल की नाही….
मुळात ह्या सर्व प्रश्नांची उत्तर आपण आपल्याला जास्त चांगल्या प्रकारे देऊ शकतो पण स्वतःवर विश्वास न दाखवता आपण इतरांकडून या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळवण्याचा प्रयत्न करतो आणि तिथेच आपण किती दुबळे आहोत हे सिद्ध करतो.
जर आपण स्वतःवरच पूर्ण विश्वास दाखवला.. तर आपल्यातील कलागुणांना सर्वात आधी आपणच प्रोत्साहन देऊ शकतो.. आपल्यातील क्षमता ओळखण्यासाठी आपल्याला इतरांची गरज नाही पडणार.. आपणच आपल्या क्षमता कुठपर्यंत आहेत हे ठरवू शकतो.. फक्त त्यासाठी आपण आपल्याला वेळ दिला पाहिजे.. स्वतःशी संवाद केला पाहिजे.. तेव्हाच आपल्यातील आत्मविश्वास वाढणार…
मग आपल्या यशाच्या वाटेत कितीही अडथळे आले तरी आपल्याला स्वतःलाच स्वतःचा आधार होता येईल.. कोणत्याही क्षणाला मी एकटा पडलो आहे या भावनेने आपण कधीच डगमगणार नाही.. उलट आपल्यातील कमतरता आपणच शोधून त्यामधे बदल करू शकतो.
आणि म्हणूनच कायम आपल्याला पाठिंबा देणारे किंवा ज्यांच्याकडून आपण साथ देण्याची अपेक्षा ठेवतो अशा सर्वांबाबतीत एकच गोष्ट लक्षात ठेवायची की आलात तर तुमच्याबरोबर पुढे जाणार आणि जर तुम्ही साथ दिली नाहीत , सोबत नसाल तर तुमच्या शिवाय पुढे जाणार पण कोणी साथ देत नाही म्हणून माघार घेणार नाही..
स्वतःवर जास्त विश्वास दाखवून जास्तीत जास्त प्रयत्न करून प्रत्येक प्रश्न स्वतःलाच विचारून आणि त्याच उत्तर स्वतःकडूनच मिळवून मी पुढे जाणार…
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

या लेखाबद्दल तुमचे खूप खूप आभार…. मला जे. सुचत नव्हतं तुम्ही मला अचुक मार्गदर्शन केलं
खुप सुंदर, प्रेरणादायी विचार 👌
Very good..
Jabrdast
खूपच छान 👌🏻👌🏻👌🏻👌🏻🙏
Very very nice & great this thought.
Khup Chan
Khup chan .Ani sundar
👍